Search

मानसिक आरोग्याच्या समस्यांविषयी जागरूकता निर्माण करणे

जवळपास 70% मुलांमधील मानसिक आरोग्याच्या समस्या लवकर हस्तक्षेप केल्यामुळे संबोधित केल्या जाऊ शकतात. मानसिक आरोग्याची समस्या लवकर ध्यानात आली तर आपण त्या समस्येच्या चार पावले पुढे राहण्याची शक्यता वाढते म्हणजेच आपण या समस्यांना तोंड देण्यासाठी तयार राहू शकतो. मनोविकाराने गंभीर रूप धरण करण्याच्या आधी मदत करण्याचे उद्दीष्ट साध्य करायचे असेल तर मनोविकार लवकर ध्यानात येणे आणि त्यात वेळीच हस्तक्षेप करणे महत्त्वाचे आहे.

विद्यार्थ्यांमधील मनोविकार हा एक जटिल मुद्दा असून त्याला तोंड देण्यासाठी पालक, शाळा, आरोग्य सेवा संस्था, डिजिटल व इतर प्रसार माध्यमे यांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत. शाळेमध्ये मानसिक आरोग्यविषयी जागृती करण्यासाठी आणि एकुणातच मानसिक आरोग्याला अवकाश देणारी संस्कृती निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संधी आणि संसाधनांचे आवश्यक पाठबळ दिले पाहिजे. त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संधी, संसाधने आणि त्यांना आवश्यक पाठबळ प्रदान करणे आणि त्यांच्या शाळेत मानसिक आरोग्य जागरूकता वाढविणे आणि एक सकारात्मक मानसिक आरोग्य संस्कृती तयार करणे आवश्यक आहे .

पुढे दिलेले काही मार्ग वापरुन शिक्षक त्यांच्या शाळेत मानसिक आरोग्याविषयी अधिक जागरूकता निर्माण करू शकतात: 
  1. सकारात्मक गोष्टींशी निगडित आत्मसन्मानाला प्रोत्साहन देणे. भांडणे सोडवणे, अपयशाला सामोरे जाणे अशी दैनंदिन शालेय जीवनात आवश्यक असलेली कौशल्ये विकसित करण्यासाठी मदत करणे. निर्णयक्षमता, ठामपणा चिकाटी इ. गुण दाखवणार्‍या वर्तनाला पाठिंबा देऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे.
  2. विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार घेण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि आरोग्यदायी पौष्टिक पदार्थांचे पर्याय सुचवणे. 
  3. चिंता आणि तणाव कमी करण्यासाठीचे मार्ग उपलब्ध करून देणे. व्यायाम, ध्यानधारणा आणि कला ह्या माध्यमातून उत्तम अभिव्यक्ती व विकास साधता येतो आणि विद्यार्थ्यांची ताण हाताळण्याची क्षमता आणि एकूणच मानसिक आरोग्य यावर त्यांचा जादुई परिणाम होतो.
  4. शाळेमध्ये मानसिक आरोग्याला बढावा देणारे धोरणे राबवणे. जसे की भाईगिरीला विरोध करणारे धोरण. 
  5. मानसिक आरोग्यासंदर्भात मुले व पालकांना उपयोगी पडेल अशी माहिती शाळेच्या फलकावर लावणे. उदाहरणार्थ जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाइटवर असलेली महिती. 
  6. मुक्त-द्वार धोरण राबवणे. विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि त्यांना वाटणारी काळजी याबद्दल संवाद करण्याकरता आपण नेहमी उपलब्ध आहोत हे अगदी खुलेपणाने सांगत राहणे. छोट्या छोट्या संवादांत मुलांशी बोलता येईल अशी संधी मिळत असते. त्यावेळी कोणतेही पूर्वग्रह न बाळगता प्रश्न विचारणे व त्या अनुषंगाने त्यांना काय म्हणायचे आहे हे ऐकून घेणे.
  7. विद्यार्थ्यांना निवांतपणा अनुभवता येईल अशा जागा शाळेत तयार करणे. जसे की शांतताघार. 
  8. मानसिक आजाराबद्दलची भीती आणि गैरसमज दूर करण्यास मदत करू शकेल अशी अचूक माहिती देणे. मानसिक आरोग्याबद्दलचे शिक्षण आणि समोरासमोरील संवाद यामुळे मानसिक आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यावर मोठा परिणाम होतो हे ध्यानात आले आहे. 
  9. शाळेच्या परिपाठाच्यावेळी याची चर्चा करणे.
  10. मानसिक आरोग्य दिनासारखे दिवस साजरे करणे म्हणजे हा फक्त त्यांचा नाही तर सगळ्यांचाच प्रश्न आहे हे मुलांच्या ध्यानात येते.
  11. एखाद्या विद्यार्थ्याला गरज असल्यास त्याला शाळेतील समुपदेशक किंवा मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणार्‍या संस्थेशी जोडून देणे.  

संबंधित लेख

मुले दिवसातील बराच वेळ शाळेत घालवतात. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. गैरवर्तन आणि...

मराठी
Search