Search

समस्या सोडवायला शिकवणे

समस्या सोडवणे हे एक महत्त्वाचे जीवन कौशल्य आहे. किशोरवयीन मुलांनी ते शिकले पाहिजे. आपल्या मुलामध्ये हे कौशल्य विकसित होण्यासाठी आपण त्याचा घरी सराव करू शकतो.

प्रत्येकाला दररोज समस्या सोडवाव्या लागतात परंतु त्यासाठी लागणारी कौशल्ये आपल्याला जन्मजात प्राप्त झालेली नसतता. ती शिकावी लागतात.

समस्या सोडवताना खालील गोष्टी करणे फायद्याचे ठरते:

  • ऐकणे आणि शांतपणे विचार करणे
  • पर्यायांचा विचार करणे आणि इतरांची मते आणि गरजांचा आदर करणे
  • विधायक उपाय शोधणे आणि कधी कधी तडजोड करणे.

जीवन कौशल्ये आयुष्याभर उपयोगी पडतात - सामाजिक जीवनात आणि कामाच्या ठिकाणी त्यांना फार महत्त्व असते.

समस्या सोडविणे : सहा पायर्‍या

बर्‍याचदा आपण बोलून आणि तडजोड करून समस्या सोडवू शकतो.

आपल्याला समस्येचे निराकरण करता येत नसते तेव्हा समस्या सोडवण्याच्या खालील सहा पायर्‍या उपयोगी पडतात. स्वतःच्या व मुलांच्या बहुतेक सर्व समस्या सोडविण्यासाठी आपण त्यांचा वापर करू शकतो -

समस्येचे निराकरण करताना ही कौशल्ये वापरण्याचा वस्तुपाठ आपण घरीच घालून दिला तर मुले स्वतःच्या अडचणी किंवा इतरांबरोबरच्या संघर्षातून वाट काढताना ही कौशल्ये वापरण्याची जास्त शक्यता असते. मतभेद मिटवताना, भांडणे सोडवताना किंवा जेव्हा मुलाला उपलब्ध पर्यायांमधून निवडणे किंवा निर्णय घेणे कठीण जात असेल तेव्हा या पायर्‍या तुम्ही वापरू शकता.

प्रक्रियेतील पायर्‍या.

1. समस्या ओळखा

समस्या नेमकी काय आहे ते निश्चित करणे ही समस्या सोडवण्याची पहिली पायरी आहे. त्यामुळे प्रत्येक जण सारख्याच मुद्दयाकडे समस्या म्हणून बघत आहात का हे लक्षात येते. त्यानंतर ती समस्या सोडवण्याजोगी बनण्यासाठी ती स्पष्ट शब्दात मांडणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ:

  • गेल्या दोनवेळा तू बाहेर गेलास तेव्हा तू काही न सांगता गेलास. कधी येणार हे कळवायला पण फोन केला नाहीस.
  • 'आधी न विचारता तू इतरांच्या बर्‍याच गोष्टी वापरत आहेस.'
  • 'एकाच दिवशी तुला दोन मैत्रिणींच्या वाढदिवसाला बोलावले आहे आणि तुला दोन्ही ठिकाणी जायचे आहे.'
  • ‘पुढच्या आठवड्यात तुझ्या दोन विषयांची परीक्षा आहे.

भावना किंवा व्यक्ती नव्हे तर समस्येवर लक्ष केंद्रित करा. उदाहरणार्थ, ' तुला उशीर होतो तेव्हा घरी साधा एक फोन करायचा एवढं तुला समजत नाही? असे बोचरे बोलू नका. त्यामुळे तो बचावात्मक पवित्रा घेईल. यातून बाहेर कसे पडायचे हे त्याला कळणार नाही त्यामुळे हताश होईल.

तुला मित्रांसोबत बाहेर जाता येईल आणि आम्हाला तुझी काळजी वाटणार नाही यासाठी आपल्याला काहीतरी मार्ग काढला पाहिजे एवढेच आमचे म्हणणे आहे. मला खात्री आहे यातून काहीतरी मार्ग निघेल असे तुम्ही संगितले तर तो बचावात्मक पवित्रा घेणार नाही, संवाद शक्य होईल, मार्ग निघेल.

2. मुळात याला समस्या का म्हणायचे याचा विचार करा.

विशिष्ट समस्या नेमकी कशामुळे निर्माण होत आहे हे तुमच्या व मुलाच्या लक्षात आले तर त्याचा फायदा होईल. त्यासाठी खालील प्रश्नांची उत्तरे शोधता येतील.

  • तुझ्यासाठी हे इतके महत्त्वाचे का आहे?
  • तुला याची गरज का आहे ?
  • काय होईल असं तुला वाटतं.
  • वाईटात वाईट काय घडेल?
  • तू कशामुळे अस्वस्थ आहेस ?

भांडणे किंवा वादविवाद न करता एकमेकांचे म्हणणे ऐकण्याचा प्रयत्न करा. आपल्या मुलाचे नेमके काय चाललेय हे समजून घेण्याची ही संधी आहे. 'मला असं वाटतं', 'माझं असं मत आहे', 'माझी गरज समजून घ्या' अशी त्याची परिस्थिती व दृष्टीकोन स्पष्ट करणारी वाक्ये वाक्ये वापरण्यासाठी त्याला प्रोत्साहन द्या. तुम्ही स्वतः देखील ही वाक्ये वापरुन समभाषण कातरा म्हणजे तुमचं दृष्टीकोन त्याला समजू शकेल. तुम्हाला कसली काळजी वाटते, का वाटते याबद्दल स्पष्टपणे बोला. दोषारोप करणे टाळा.

3. समस्येच्या संभाव्य उत्तरांविषयी मंथन करा

समस्येचे निराकरण करू शकणार्‍या सर्व संभाव्य मार्गांची यादी तयार करा. शहाणे आणि अतरंगी असे दोन्ही पर्याय काढा. या टप्प्यावर पर्याय चूक बरोबर ठरवणे किंवा त्यावर वादविवाद टाळा.

तुमच्या मुलाला तोडगे सुचवण्यात अडचण येत असेल तर तुम्ही स्वतः काही पर्याय सुचवा. सुरुवातील काहीतरी मजेशीर पर्याय सुचवून तुम्ही वातावरण हलके करू शकता. मजेदार किंवा वेगळे पर्याय अधिक उपयुक्त ठरू शकतात. दोघे मिळून किमान पाच संभाव्य मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा.

सर्व शक्यता लिहून ठेवा.

4. समस्येचे निराकरण करणे

प्रत्येक उपायाच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू लक्षात घ्या. पहिल्यांदा फायदे लक्षात घ्या व नंतर कमतरता लक्षात घ्या. यामुळे, आपल्या सूचनांवर टीका केली जातेय असे कोणालाही वाटणार नाही.

उपायाशी निगडीत फायद्या तोटयांची यादी केल्यानंतर ज्या पर्यायाचे तोटे फायद्यापेक्षा अधिक आहेत त्यांच्यावर फुली मारा. आता प्रत्येक उपायला शून्य ते दहा असे क्रमांक द्या. जो उपाय कमीत कमी प्रभावी आहे त्याला शून्य क्रमांक द्या व सर्वात चांगल्या उपायाला दहा क्रमांक द्या. सगळ्यात प्रभावी उपाय निवडायला आपल्याला याची मदत होईल.

तुम्ही निवडलेला उपाय आमलात आणण्यासारखा हवा आणि त्याने समस्येचे निराकरण व्हायला हवे.

जर तुम्हाला एकही प्रभावी उपाय सापडला नाही तर परत तिसर्‍या पायरीवर जा आणि इतर काही भिन्न उपाय शोधा. इतर लोकांशी बोलूनपण काही नवीन पर्याय शोधण्यास मदत होऊ शकते.

कधीकधी तुम्हाला दोघांनाही शंभर टक्के पटेल असा उपाय सापडणार नाही परंतु तडजोड करून तुम्ही दोघांनाही पटेल असा उपाय निवडू शकता.

5. उपाय कृतीत आणा

एकदा तुम्ही उपाय नक्की केलात की तो कृतीत कसं उतरवायचा याचे नेमके नियोजन करा. ते लिहून काढा आणि त्यात खालील मुद्द्यांचा समावेश करा:

  • कोण काय करेल?
  • ते हे कधी करतील?
  • उपाय कृतीत आणण्यासाठी काय काय करणे गरजेचे आहे?

उपाय लागू पडला आहे का ते पहाण्यासाठी आपण पुन्हा कधी भेटू शकू याबद्दल बोला.

हा उपाय आमलात आणण्याचा आत्म विषवास आपल्या मुलाला मिळण्यासाठी भूमिका नाट्य (रोल प्ले) किंवा प्रशिक्षणाची आवश्यकता असू शकते. उदाहरणार्थ, जर ती एखाद्या मैत्रिणीबरोबरचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असेल तर ती मैत्रिणीशी काय बोलणार आहे याचा सराव केला तर उपयुक्त ठरेल.

6. समस्या सोडविण्याच्या पद्धतीचे कोणते परिणाम झाले त्याचे मूल्यमापन करा.

एकदा आपल्या मुलीने उपाय आमलात आणला की ते सगळे कसे पार पडले? तिला पुन्हा तो उपाय आमलात आणणे गरजेचे आहे का? आणि त्यासाठी तिला मदत आवश्यक आहे का? हे तपासून पहा.

लक्षात ठेवा उपाय कृतीमध्ये उतरवून त्याचा परिणाम होण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे आणि सर्व उपाय हे कृतीत उतरत नाहीत हे देखील ध्यानात ठेवा. कधीकधी तुम्हाला एकापेक्षा जास्त उपाय वापरुन बघावे लागतील. ठरवल्याप्रमाणे जेव्हा गोष्टी घडत नाहीत तेव्हा परिस्थितीप्रमाणे स्वतःचे नियोजन बदलता येणे हा प्रभावीपणे समस्या सोडविण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे.

आपल्या मुलास पुढील प्रश्न विचारा:

  • कशाचा उपयोग झाला?
  • कशाचा विशेष उपयोग झाला नाही?
  • तू किंवा आपण दोघांनी कोणते बादल केले तर हा उपाय अधिक चांगल्या पद्धतीने आमलात येऊ शकेल असे तुला वाटते?

उपाय काम करत नसल्यास या समस्येचे निराकरण करण्याच्या प्रक्रियेच्या पहिल्या पायरीवर परत जा आणि पुन्हा सुरूवात करा. कदाचित समस्या आपल्याला नीट समजली नसेल किंवा आपण आमलात आणलेला उपाय योग्य नसेल.

जेव्हा संघर्ष ही समस्या असते

पौगंडावस्थेच्या काळात, आपल्या मुलाबरोबर पूर्वीपेक्षा जास्त वेळा संघर्ष होऊ शकतो. अनेक मुद्द्यांबद्दल तुमची मते जुळत नाहीत. तुमचे अनेक बाबतीत मतभेद होऊ शकतात, विशेषतः या वयात मुलांची स्वतंत्र होण्याची प्रक्रिया चालू झालेली असते आणि त्यांना स्वतंत्र होण्याची आस असते त्यामुळे मुले व पालक यांच्यात अनेक मतभेद उद्भवतात.

आपले अधिकार कमी करणे आणि मुलीला अधिक निर्णय स्वातंत्र्य देणे कठीण वाटू शकते. परंतु हे तिच्यासाठी आवश्यक आहे. जबाबदार प्रौढ व्यक्ती होण्याच्या प्रवासाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. समस्या सोडविण्याच्या याच पायर्‍या तुम्ही संघर्षाचे मुद्दे हाताळण्यासाठी वापरू शकता. त्यातून व्हविष्यातील संघर्षाची शक्यता कमी होते.

संबंधित लेख

मुले दिवसातील बराच वेळ शाळेत घालवतात. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. गैरवर्तन आणि...

मराठी
Search