Search

सोशल मिडिया आणि समाज माध्यमांवरील दादागिरी

फेसबुक, ट्विटर, व्हाट्स अप, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, पिंटेरेस्ट, टिकटॉक ही तरुणांची आवडती समाज माध्यमे आहेत.समाज माध्यमे हा तरुणांच्या आयुष्याचा मोठा आणि अविभाज्य भाग आहे. मजा करणे, नवे मित्र मैत्रिणी जोडणे, नाती जोपासणे, स्वतःची स्वतंत्र ओळख घडवणे यासाठी तरुण मुले समाज माध्यमांचा वापर करतात.

गेमिंग चॅट साइट्स हा गेम्स आवडणाऱ्या तरुणांचा इतरांशी संपर्क साधण्याचा आवडता मार्ग असतो.

समाज माध्यमे वापरणे म्हणजे त्या त्या समाज माध्यमाच्या मंचावर आपली सामग्री अपलोड करणे व इतरांनी टाकलेला मजकूर बघणे. यात खालील गोष्टींचा समावेश होतो.

  • ऑनलाइन प्रोफाइल तयार करणे
  • टिप्पणी (comments) करणे किंवा गप्पा मारणे.
  • फोटो आणि व्हिडिओ अपलोड करणे .
  • इतर लोकांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देणे किंवा त्या पोस्ट्स आवडल्याची खूण करणे.
  • काही लेख शेअर करणे.
  • फोटो आणि पोस्ट मध्ये लोकांना टॅग करणे.
  • गेममध्ये बदल करणे आणि ते शेअर करणे.
  • आधीच तयार असणाऱ्या आशयाची मोडतोड करून ते बदलणे आणि ते शेअर करणे.

अनेक समाज माध्यम मंचांवर वयाचे बंधन असते. उदाहरणार्थ, फेसबुक किंवा इन्स्टाग्राम अकाऊंट असण्यासाठी तुम्ही 13 वर्षांचे असणे आवश्यक आहे.

समाज माध्यमे : फायदे

समाज माध्यमे हा अनेक तरुणांच्या सामाजिक आणि सर्जनशील जीवनाचा एक मोठा भाग आहे.

किशोरवयीन आणि तरुण मुले मजा करणे, मैत्री करणे आणि टिकवणे, आवडलेले शेयर करणे स्वतंत्र ओळख घडवणे, नवी नाती जोपासणे यासाठी समाज माध्यमांचा वापर करतात. विशेषत: किशोरवयीन मुलांमध्ये मित्रांशी जोडलं जाण्यासाठी समाजमाध्यमे हा एक महत्त्वाचा भाग असतो.

समाज माध्यमांच्याद्वारे किशोरवयीन मुले त्यांच्या आवडीच्या विषयाशी निगडीत ऑनलाइन जागतिक समुदायांशी जोडून घेऊ शकतात. उदाहरणार्थ, अपंगत्व किंवा विशिष्ट आजार असलेली मुले तसेच LGBTQI मुले , विशिष्ट सांस्कृतिक पार्श्वभूमीतील मुले यांचे वेगवेगळे गट समाजमाध्यमांवर असतात. तसेच समाज माध्यमांवर आपले आवडते गेम्स, टीव्ही मालिका, संगीत किंवा छंद यासारख्या विशिष्ट आवडींबद्दल टिप्पणी, लेखन, फोटो, व्हिडिओ इत्यादि गोष्टी शेअर करून व्यक्त होण्याची संधी असते.

समाज माध्यमांचा वापर करून तरुण मुले अनेक फायदे मिळवू शकतात:

  • माहिती व कौशल्य विकास : सोशल मीडियावर नवीन गोष्टी शोधणे आणि प्रयोग करणे याचा मुलांना ज्ञानार्जनासाठी उपयोग होऊ शकतो. काही कौशल्ये देखील विकसित होऊ शकतात.
  • सहयोगात्मक शिक्षण: याद्वारे किशोरवयीन मुले शाळेच्या माध्यमातून औपचारिकपणे किंवा गटांच्या माध्यमांतून अनौपचारिकपणे शैक्षणिक सामुग्री शेयर करू शकतात.
  • सर्जनशीलतेचा आविष्कार : प्रोफाइल पृष्ठे, फोटो आणि व्हिडिओ इत्यादी बदल करण्यासाठी तरुण त्यांची सर्जनशीलता वापरू शकतात.
  • मानसिक आरोग्य: समाज माध्यमामुळे कुटुंब विस्तारित होते. आपण मित्रांशी जोडले जातो. स्थानिक आणि जागतिक ऑनलाइन समुदायांमध्ये आपण भाग घेऊ शकतो. यामुळे आपण कुठंतरी जोडलेले आहोत आणि आपले अस्तित्व आहे ही भावना मनात निर्माण होऊ शकते.

समाज माध्यमे : जोखीम

समाज माध्यमांशी जोडलेल्या जोखमींमध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहे:

  • समाज माध्यमांवर अयोग्य किंवा अस्वस्थ करणारी माहिती असते. जसे की तेथे आपण लिहीलेल्या मजकुरावर किंवा फोटोवर आक्रमक, हिंसक किंवा लैंगिक टिप्पण्या होऊ शकतात.
  • अयोग्य आणि त्रासदायक माहिती, लाजिरवाणे किंवा प्रक्षोभक फोटो अपलोड होऊ शकतात.
  • स्वतःचे किंवा इतरांची वैयक्तिक माहिती, उदाहरणार्थ, फोन नंबर, जन्मतारीख किंवा स्थान, फोटो, व्हिडीओ हे अनोळखी लोकांसोबत शेअर होतात.
  • सायबर धमकी (सायबर बुलिंग)
  • खूप जास्त जाहिराती दिसतात आणि विपणन कंपन्यांना आपला संपर्क क्रमांक जातो.
  • आपली माहिती इतर संस्थांना विकली जाऊ शकते.

जेव्हा ऑनलाइन छळ होतो आणि धमक्या दिल्या जातात तेव्हा त्याला सायबर गुंडगिरी म्हणतात. अशा प्रकारच्या गुंडगिरीला सामोरे जाणे कठीण असू शकते, कारण ती नियंत्रित करणे कठीण असते आणि ती अनेक लोकांपर्यंत पोचते. 

सायबर गुंडगिरी म्हणजे काय? 

सायबर गुंडगिरी म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यास हानी पोहचवण्याच्या हेतूने ऑनलाइन वातावरणात जाणूनबुजून, सतत आणि दुर्भावनापूर्ण शब्द किंवा चित्रांचा वापर करणे. साधारण अकरावी बारावीच्या वयातील मुला-मुलींना याचा सर्वात जास्त धोका संभवतो. अर्थात किशोरावस्थेच्या कोणत्याही टप्प्यावर हे घडू शकते म्हणून जागरूक असणे महत्वाचे आहे.

सायबर धमकी कशी असते?

सायबर धमकी अनेक प्रकारची असते. खाली काही प्रकार दिले आहेत.

  • समाज माध्यमांवर हेतुपुरस्सर हानीकारक मजकूर संदेश, ईमेल किंवा थेट संदेश पाठवणे.
  • ऑनलाइन अफवा किंवा खोटे पसरवणे.
  • अपमानित करण्यासाठी किंवा लाज वाटावी यासाठी फोटो किंवा व्हिडिओ पाठवणे.
  • ऑनलाईन धमक्या देणे.
  • यासाठी बनावट ऑनलाइन प्रोफाइल सेट करतात आणि वापरतात.

गुंडगिरीच्या इतर प्रकारांपेक्षा हे कसे वेगळे आहे?

धमकावणे हे एक असे वर्तन आहे जे हेतुपुरस्सर हानी पोहचवण्याच्या हेतूने केले जाते. सार्वजनिक आणि अनियंत्रित स्वरूपामुळे सायबर धमकी आणखी त्रासदायक ठरू शकते. उदाहरणार्थ:

  • सायबर धमकीमध्ये कोण पाहू किंवा भाग घेऊ शकतो याची कोणतीही मर्यादा नाही.
  • ऑनलाइन शेअर केलेली माहिती काढून टाकणे खूप कठीण असू शकते.
  • गुंड निनावी असू शकतात.
  • शोध इंजिनांद्वारे माहितीमध्ये प्रवेश केला जाऊ शकतो.

तंत्रज्ञान वापरणार्‍या लोकांना या प्रकारच्या गुंडगिरीपासून सुटका करून घेणे अवघड आहे. तरुण मुलांनी प्रत्यक्ष जीवनापेक्षा ऑनलाइन जीवनात एखाद्याला धमकावण्याची शक्यता जास्त असते कारण ऑनलाइन विश्वाचे स्वरूप असे असते की माणूस समोर नसल्याने आपल्या कृतीला आपण जबाबदार आहोत असे त्यांना वाटत नाही.

सायबर धमकीचे काय परिणाम होतात?

किशोरवयीन मुलांवर सायबर धमकीचे परिणाम खालीलप्रमाणे असू शकतात:

  • शाळेतील खालावलेली उपस्थिती आणि कामगिरी.
  • वाढलेला ताण आणि चिंता.
  • एकटेपणा आणि भीतीची भावना.
  • कमी एकाग्रता.
  • नैराश्य
  • कमी आत्मविश्वास आणि स्वाभिमान.
  • काही गंभीर प्रकरणांमध्ये सायबर धमकीमुळे आत्महत्या देखील होऊ शकते.

संबंधित लेख

मुले दिवसातील बराच वेळ शाळेत घालवतात. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. गैरवर्तन आणि...

मराठी
Search