तुम्ही कोणत्या लिंगाची व्यक्ती आहात या विषयीच्या तुमची आंतरिक आणि मानसिक भावनेला तुमची स्वतःची लिंगभाव ओळख असे म्हणतात. तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात की दोन्हीही आहात किंवा यापेक्षा वेगळे आहात हे तुम्ही ठरवू शकता. फक्त तुम्हीच तुमची लिंगभाव ओळख ठरवू शकता.
आपण इतर लोकांकडे रोमँटिक आणि लैंगिकदृष्ट्या कसे आकर्षित होतो त्याला आपला लैंगिक कल असे म्हणतात. आपल्या भावनिक, रोमँटिक किंवा लैंगिक आकर्षणाच्या पद्धतीचे वर्णन करण्यासाठी लैंगिक कल हा शब्द वापरला जातो.
लैंगिक प्रवृत्तीमध्ये समान लिंगी व्यक्तीबद्दल (समलैंगिकता), भिन्न लिंगी व्यक्तीबद्दल (विषमलैंगिकता), स्त्री आणि पुरुष दोघांबद्दल (उभयलैंगिकता), सर्व लिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण (पॅनसेक्षुयलिटी / pansexuality) असू शकते किंवा कोणाबद्दलही लैंगिक आकर्षणाचा अभाव (अलैंगिकता) देखील असू शकतो.
- विषमलिंगी: अशा व्यक्तीला फक्त इतर लिंगाच्या व्यक्तींविषयी आकर्षण वाटते.
- समलिंगी: अशा व्यक्तीला फक्त इतर लिंगाच्या व्यक्तींविषयी आकर्षण वाटते.
- उभयलिंगी: अशा व्यक्ती स्त्री आणि पुरुष दोघांकडे आकर्षित होतात. दोघांविषयीही समान तीव्रतेने आकर्षण वाटणे किंवा दोघांकडे ही एकाच वेळी आकर्षित होणे गरजेचे नाही.
- सर्वलिंगी: अशा व्यक्ती सर्व माणसांकडे आकर्षित होऊ शकतात.
- अलैंगिक: अशा व्यक्ती लैंगिकदृष्ट्या कोणत्याही लिंगाच्या व्यक्तीकडे आकर्षित होत नाही. कोणाशी लैंगिक संबंध न ठेवण्याच्या निर्णयापेक्षा किंवा ब्रम्हचर्यापेक्षा हे वेगळे असते.
बऱ्याच लोकांना स्वतःच्या लैंगिक कलाचे ज्ञान काही काळ गेल्यानंतर होते. उदाहरणार्थ, काही मुली उच्च माध्यमिक शाळेत असताना मुलांकडे आकर्षित होतात, नंतर त्यांना त्यांच्या स्वतःच्या लिंगाच्या व्यक्तीकडे, रोमँटिक आणि लैंगिकदृष्ट्या अधिक आकर्षित झाल्याचे लक्षात येते.
लैंगिक कल आणि लिंगओळख समजून घेणे.
लैंगिक कल आणि लिंगओळख ही एकच गोष्ट नाही. तुम्ही ऐकलेल्या काही शब्दांचे अर्थ आपण पाहूया.
- सहयोगी (Ally): जी विषमलिंगी व्यक्ती सर्व लैंगिक ओळखींचे समर्थन करते, सर्व ओळखी साजऱ्या करते, भेदभावपूर्ण टिप्पण्या व इतरांच्या चुकीच्या कृतींना आव्हान देते आणि स्वेच्छेने या पूर्वग्रहांचा शोध घेते तिला सहयोगी असे म्हणतात.
- द्वि (Bi/बाय): "उभयलिंगी" लोकांसाठी हे लघुरूप (शॉर्टफॉर्म) वापरले जाते.
- सिसजेंडर (Cisgender): ज्या व्यक्तीचा लैंगिक कल त्यांना जन्मावेळी मिळालेल्या लिंगाशी जुळतो
- उघड करणे (Coming out): एखाद्याला त्याच्या लैंगिक कलाची जाणीव होणे आणि ती त्याने स्वीकारणे आणि इतरांना त्याबद्दल सांगणे.
- समलिंगी: एक पुरुष किंवा स्त्री (एकतर cisgender किंवा transgender) जी फक्त किंवा जवळजवळ फक्त समान लिंग असलेल्यांकडे आकर्षित होते अशा व्यक्तीला समलिंगी व्यक्ती (Homosexual) असे म्हणतात. बऱ्याचदा हा शब्द फक्त पुरुषांच्या संदर्भात वापरला जातो.
- लिंगभाव ओळख: आपण स्वतः पुरुष, स्त्री, दोन्हीही, किंवा इतर काही आहोत अशी आपली आंतरिक भावना आपल्या जन्मावेळी नियुक्त केलेल्या लिंगाशी आपली लिंगभाव ओळख जुळतेच असं नाही.
- लेस्बियन: एक स्त्री (एकतर cisgender किंवा transgender) जी प्रामुख्याने स्त्रीकडे आकर्षित होते.
- LGBT2Q+: लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्वीअर या सगळ्या समुदायासाठी विकसित होत असलेले संक्षिप्त रूप.
- क्वीअर: "क्वीअर" चा वापर विषमलिंगी आणि सिसजेन्डर नसलेल्या लोकांच्या श्रेणीसाठी केला जाऊ शकतो. हा शब्द सहसा "LGBT2Q+" चे संक्षिप्त रूप म्हणून वापरला जातो. काही एलजीबीटी लोक या शब्दामुळे नाराज आहेत, परंतु काहींनी पुन्हा हाच शब्द वापरावा असा दावा केला आहे.
- सरळ (Straight) : विषमलिंगी लोकांसाठी हा शब्द वापरला जातो.
- ट्रान्सजेंडर किंवा ट्रान्ससेक्शुअल: ही संज्ञा एका विस्तृत श्रेणीसाठी वापरली जाते. ज्यांचे लिंग आणि/ किंवा लैंगिक अभिव्यक्ती त्यांच्या जन्मवेळच्या लिंगापासून आणि/किंवा त्या लिंगाच्या व्यक्तींसाठी समाजाने नियुक्त केलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक अपेक्षांपेक्षा भिन्न असतात अशा लोकांसाठी ट्रान्सजेंडर किंवा ट्रान्ससेक्शुअल या संज्ञा वापरतात. कधीकधी यासाठी "ट्रान्स" असे संक्षिप्त रूपही वापरले जाते.
लोक त्यांचे लैंगिक कल कसे शोधतात?
बर्याच लोकांना प्रथम त्यांच्या किशोरवयीन वर्षांमध्ये लैंगिक कलाची जाणीव होते. उदाहरणार्थ, तारुण्यात, शाळेत कोणाकडे तरी आकर्षित झाल्यावर पहिल्या प्रेमभावना अनुभवणे सर्वसाधारण आहे.
किशोरवयात समान लिंगाच्या एखाद्यावर "क्रश" निर्माण होणे ही सर्वसामान्य बाब आहे. काही किशोरवयीन मुलं-मुली त्यांच्या स्वतःच्या लिंगाच्या व्यक्तीसोबत लैंगिक प्रयोग करू शकतात. असा किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी, प्रौढपणी समलिंगी व्यक्तीच बनेल असे या सुरुवातीच्या अनुभवांवरून सांगता येत नाही.
काही किशोरवयीन मुलांसाठी, समान लिंगाच्या व्यक्तीचे आकर्षण कमी होत नाही. ते मजबूत होते.
लक्षात ठेवा: तुम्ही एकटे नाही आहात
तुमचा लैंगिक कल किंवा लिंग ओळख काहीही असो, तुमच्यासारखे बरेच लोक आहेत हे तुम्ही समजून घेणे महत्वाचे आहे. त्यापैकी अनेकांना तुमच्यासारख्याच भावना आणि प्रश्न आहेत.
तुम्हाला काय वाटतेय हे समजू शकणार्या व स्वतः तो अनुभव घेतलेल्या लोकांशी बोलणे दिलासादायक आणि उपयुक्त ठरू शकते. आपण स्थानिक किंवा ऑनलाइन गटांद्वारे असे लोक शोधू शकतो. आधार कोठे शोधायचा हे आपल्याला माहित नसल्यास खाली दिलेल्या ठिकाणी तुम्ही आधार शोधू शकता.
- तुमचे डॉक्टर
- तुमचे विश्वासू शिक्षक
- थेरपिस्ट किंवा इतर समुपदेशक
- LGBT2Q+ मित्र किंवा नातेवाईक
- तुमच्या समुदायातील LGBT2Q+ क्लब आणि संस्था
- वेबसाइट आणि ऑनलाइन संस्था
तणाव समजून घेणे आणि त्याचा सामना कसा करावा हे जाणून घेणे का महत्वाचे आहे?
आपण विषमलिंगी नसल्यास, समाजातील भेदभावामुळे आपल्याला खूप अतिरिक्त ताण जाणवू शकतो. नकार, पूर्वग्रह, भीती आणि गोंधळ यामुळे एलजीबीटीक्यू+ समुदायाच्या सदस्यांना दीर्घकालीन ताण येऊ शकतो.
सततचा तणाव हा डोकेदुखी, पचनाच्या तक्रारी, पाठदुखी आणि झोपेचा त्रास यांच्याशी जोडला जाऊ शकतो. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. तुम्हाला आधीच आरोग्याच्या समस्या असल्यास, तणाव आणि चिंता यामुळे त्यात वाढ होऊ शकते. तणावामुळे तुम्ही मूडी किंवा उदास बनू शकता. नैराश्यामुळे आत्महत्या होऊ शकते. नैराश्य असलेली किशोरवयीन मुले आत्महत्या आणि आत्महत्येचा प्रयत्न करण्याची अधिक शक्यता असते.
दीर्घकालीन तणावाखाली असलेले लोक तंबाखू खातात, धूम्रपान करतात, अधिक प्रमाणात दारू पितात आणि इतर उत्तेजक पदार्थ वापरतात. या सवयींमुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात
तणावाचा तुमच्या जीवनावर होणारा परिणाम ओळखणे, तणावाचा सामना कसा करावा हे जाणून घेणे आणि मदत कधी मिळवायची हे जाणून घेणे महत्वाचे आहे.