Search

संरक्षणात्मक घटक आणि जोखमीचे घटक

जोखमीचे घटक तुम्हाला अडचणी कडे घेऊन जातात. संरक्षणात्मक घटक तुमचे समस्येपासून संरक्षण करतात.मानसिक आरोग्याच्या समस्या या कधीही एका जोखमीच्या घटकाचा परिणाम नसतात, त्या जटिल समस्या असतात. असेही घडू शकते की, जोखमीच्या अनेक घटकांना तोंड दिलेली एखादी व्यक्ती त्यामानाने कमी जोखमीच्या आयुष्याला सामोरे गेलेल्या व्यक्तीपेक्षा समस्यांचा अधिक चांगल्या प्रकारे सामना करू शकते. तणाव, वेदना आणि जोखमीचा प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगवेगळा असतो हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

सामान्य जोखीम घटक


जैव-शारीरिक घटक 

  • मानसिक आरोग्य समस्यांचा कौटुंबिक इतिहास
  • गर्भधारणा किंवा जन्मादरम्यानची गुंतागुंत
  • मेंदूच्या दुखापतीचा वैयक्तिक इतिहास
  • दीर्घकालीन आजार जसे की कर्करोग किंवा मधुमेह, विशेषत: हायपोथायरॉईडीझम किंवा मेंदूशी संबंधित
  • मद्यपान आणि मादक पदार्थांचे सेवन
  • पोषक आहार व झोप यांचा अभाव


मानसशास्त्रीय घटक

  • तणावपूर्ण परिस्थिती, जसे की आर्थिक समस्या, एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू, तुटलेली नाती, शाळा बदलणे, नवीन ठिकाणी जाणे
  • जीवनातील क्लेशकारक अनुभव, जसे की हिंसा, बलात्कार
  • कमी आत्मसन्मान, असमर्थ असल्याची भावना, जीवनाकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन, सामना करण्याची कमकुवत कौशल्ये
  • शैक्षणिक अपयश ज्यामुळे नकार आणि अस्वीकाराचा अनुभव येतो.

 


सामाजिक घटक

  • लहानपणी झालेले दुर्लक्ष किंवा गैरवर्तन
  • अपमानास्पद, हानिकारक मैत्री किंवा नातेसंबंध
  • चांगल्या मैत्रीचा किंवा चांगल्या नात्यांचा अभाव
  • मृत्यु, घटस्फोट किंवा इतर कोणत्याही कारणाने झालेला जवळच्या व्यक्तीचा वियोग
  • गुंडगिरी (एकतर पीडीत व्यक्ती असणे किंवा गुंडगिरी करणारी व्यक्ती असणे)
  • गरीब परिस्थितीत लहानाचे मोठे होणे किंवा गरिबीत जगणे
  • कमकुवत सामाजिक कौशल्ये आणि कमकुवत संवाद कौशल्ये
  • भेदभाव
  • आधार गट आणि संदर्भ सेवांचा अभाव 
 

 

संरक्षणात्मक घटक (Protective Factors)

आपल्या वाढीच्या वयात आपण तरुण होण्याच्या प्रक्रियेला प्रोत्साहन देणारे तसेच त्यात अडथळा आणणारे काही घटक आजूबाजूच्या वातावरणात असतात. आपल्या वाढीच्या प्रक्रीयेला प्रोत्साहन देणार्‍या घटकांना संरक्षणात्मक घटक म्हणतात आणि या प्रक्रीयेमध्ये अडथळा आणणार्‍या घटकांना जोखीम घटक म्हणून संबोधले जाते.

संरक्षणात्मक घटक आणि जोखीम घटक यांची उपस्थिती किंवा अनुपस्थिती तरुणांच्या मानसिक आरोग्यास हातभार लावते. युवकांमधील संरक्षणात्मक आणि जोखीम घटक ओळखणे, जोखीम घटकांना प्रतिबंध करणे तसेच त्यांच्यात सकारात्मक हस्तक्षेप करून तरुणांना मार्गदर्शन करणे महत्वाचे आहे. मानसिक आरोग्याचे प्रश्न कोणत्या दिशेने जातील हे देखील संरक्षणात्मक आणि जोखमीच्या घटकांवर अवलंबून असते.


जैव-शारीरिक घटक 

  • आरोग्यदायी आहार, व्यायाम
  • शारीरिक विकासाचे टप्पे (उदा.पौगंडावस्था) वेळेवर गाठणे
  • पुरेशी झोप
  • आपल्या वाढीसाठी आवश्यक पोषक घटक मिळण्यासाठी फळे, भाज्या, धान्य, प्रथिनयुक्त पदार्थ आणि दुग्धजन्य पदार्थ या पाच अन्न गटांमधून योग्य अन्न आणि पेयाची निवड करणे.


मानसशास्त्रीय घटक

  • पालकांचा आधार, मदतीची खात्री आणि शिस्त
  • घर, शाळा आणि कामाच्या ठिकाणी नियमांचे पालन
  • स्वतःच्या भावनांवर ताबा
  • जुळवून घेण्याचे आणि समस्या सोडविण्याचे कौशल्य
  • आत्मनिर्भरतेची/ सक्षम असण्याची भावना
  • आशावाद
  • सकारात्मक आत्म-संबंध/ स्वतःबद्दल चांगले वाटणे
  • स्वतःच्या रंग रूपाचा स्वीकार
 


सामाजिक घटक

  • मैत्री करण्याची व इतरांशी जुळवून घेण्याची क्षमता
  • मित्र आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध
  • कुटुंबाचा आधार वाटेल असे संबंध
  • सांघिक खेळ, क्लब, सामाजिक उपक्रम, धार्मिक कार्यक्रम इ. कार्यक्रमात सहभाग
  • आर्थिक सुरक्षा
  • डॉक्टर, समुपदेशक यासारख्या सहाय्यक सेवांची उपलब्धता

ज्या जैविक, मानसशास्त्रीय, कौटुंबिक किंवा सामाजिक (समवयस्क आणि सांस्कृतिक घटकांसाहित) घटकांमुळे आयुष्यात अडचणी येण्याची शक्यता कमी होते किंवा ज्यांच्यामुळे जोखीम घटकांचा नकारात्मक प्रभाव कमी होतो अशा घटकांना संरक्षक घटक असे म्हणतात.1 

ज्या जैविक, मानसशास्त्रीय, कौटुंबिक किंवा सामाजिक (समवयस्क आणि सांस्कृतिक घटकांसाहित) स्तरावरील जे घटक आणि गुणधर्म समस्येची व्याप्ती वाढवतात त्यांना जोखीम घटक असे म्हणतात.2 

तरुण, कुटुंब, समवयस्क, समुदाय आणि समाज या पाच विभागांशी निगडीत संरक्षणात्मक घटक आणि जोखीम घटकांची उदाहरणे खालील तक्त्यामध्ये दिलेली आहेत.

पौगंडावस्थेतील मानसिक, भावनिक आणि वर्तणुकीच्या विकारांसाठी जोखीम आणि संरक्षणात्मक घटक

 

जोखीम घटक

    विभाग

संरक्षण घटक

  • स्त्री लिंग
  • लवकर तारुण्यात पदार्पण  
  • कठीण स्वभाव. लवचिकतेचा आभाव, कमी सकारात्मक मूड, एकाग्रतेचा अभाव, हवे ते न मिळाल्यास होणारा त्रागा.
  • कमी आत्मसन्मान, अक्षम असल्याची भावना. नकारात्मक शैली
  • चिंता
  • निम्न-स्तरीय उदासीनतेची लक्षणे आणि सततचे सौम्य नैराश्य ( डिस्थिमिया)
  • मानवी संबंधांबद्दलची असुरक्षितता
  • कमकुवत सामाजिक कौशल्ये: संप्रेषण आणि समस्या सोडवण्याची कमकुवत कौशल्ये
  • मान्यता, स्वीकार आणि सामाजिक समर्थनाची तीव्र गरज
  • कमी स्वाभिमान
  • लाजाळूपणा
  • बालपणातील भावनिक समस्या
  • आचारासंबंधीचे विकार
  • अमली पदार्थांविषयी चांगले मत
  • बंडखोरपणा
  • तंबाकू, गुटखा, दारू यांचा लहान वयातील वापर
  • कायदा मोडणारे वर्तन
  • मेंदूची दुखापत
  • गांजासारख्या पदार्थांचा वापर 
  • मेंदुसाठी विषारी असलेल्या शिसे किंवा पारा यासारख्या पदार्थांचा लहान वयातील संपर्क

वैयक्तिक

  • सकारात्मक शारीरिक विकास
  • शैक्षणिक यश / बौद्धिक विकास
  • उच्च आत्मसन्मान
  • स्वतःच्या भावनांवर ताबा
  • जुळवून घेण्याची आणि समस्या सोडविण्याचे कौशल्य
  • समवयस्क मित्रांसोबत दोन किव्हा अधिक बाबींमध्ये सहभाग: शाळा, नोकरी, खेळ, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम
  • पालकांचे नैराश्य
  • मुले व पालक संघर्ष
  • चांगल्या पालकत्वाचा अभाव
  • नकारात्मक कौटुंबिक वातावरण (उदा. कुटुंबातील व्यसनाधीनता)
  • बाल अत्याचार / गैरवर्तन
  • घटस्फोट, एकल-पालक कुटुंब
  • वैवाहिक संघर्ष
  • कौटुंबिक संघर्ष
  • चिंताग्रस्त पालक पालक / वैवाहिक संघर्ष
  • कौटुंबिक संघर्ष (पालक आणि मुले आणि मुलांचा आपापसात)
  • पालकांचे व्यसन, दारू
  • पालकांची बेरोजगारी
  • प्रौढ व्यक्तीच्या मार्गदर्शनाचा अभाव
  • पालकांशी जवळीकीचा अभाव
  • कौटुंबिक बिघाड
  • पालकांचे दुर्लक्ष, उदासीनता
  • स्कीझोफ्रेनियाग्रस्त कुटुंब सदस्य
  • पालकांचे नैराश्य
  • लैंगिक शोषण

कुटुंब

  • कुटुंब आपल्याला रचना, मर्यादा, नियम, देखरेख प्रदान करते. त्यामुळे आपण आपल्या आयुष्याविषयी काही अटकळ बांधू शकतो, नियोजन करू शकतो.
  • कुटुंबातील सदस्यांबरोबरचे आपल्याला आधार देणारे संबंध
  • वर्तन आणि मूल्ये याविषयीच्या स्पष्ट कल्पना
  • समवयस्क व्यक्तींनी सामावून न घेणे
  • तणावपूर्ण घटना
  • निकृष्ट शैक्षणिक कामगिरी
  • गरिबी
  • समुदाय पातळीवरील तणावपूर्ण किंवा क्लेशकारक घटना
  • शालेय स्तरावरील तणावपूर्ण किंवा क्लेशकारक घटना
  • समुदायातील हिंसा
  • शाळेतील हिंसा
  • गरिबी
  • क्लेशकारक घटना
  • शाळेतील अपयश
  • शाळेप्रती बांधिलकीचा अभाव
  • कॉलेजात जायची शक्यता नाही
  • समवयस्क व्यक्तींबरोबर आक्रमक वर्तन
  • व्यसन करणार्‍या मुलांशी मैत्री
  • दारू व व्यसनाला प्रतिष्ठा देणारे सामाजिक नियम.
  • शहरी वातावरण
  • गरिबी
  • वाट चुकलेल्या समवयीन मुलांशी मैत्री
  • जवळची नाती आणि मित्र गमावणे

शाळा, शेजारी आणि समाज

  • कौशल्य आणि आवडींच्या विकासासाठी मार्गदर्शकांची उपस्थिती आणि मदत
  • शाळा आणि समुदायामध्ये सहभागासाठी संधी
  • सकारात्मक निकष
  • वर्तन आणि मूल्ये याविषयीच्या स्पष्ट कल्पना
  • शारीरिक आणि मानसिक सुरक्षा

संबंधित लेख

मुले दिवसातील बराच वेळ शाळेत घालवतात. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. गैरवर्तन आणि...

मराठी
Search