Search

तरुणांना त्यांच्या मानसिक आरोग्य संदर्भात वाटणारी काळजी ध्यानात घेणे

मुले दिवसातील बराच वेळ शाळेत घालवतात. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. गैरवर्तन आणि मनोविकार यातील फरक शिक्षकांना माहीत असणे आवश्यक आहे. मनोविकारांकडे बघण्याचा शिक्षकाचा दृष्टीकोन कसा आहे, त्याला/ तिला मनोविकार या विषयाची पुरेशी जाण आहे का? तसेच मनोविकार असलेल्या विद्यार्थ्याला मदत करताना शिक्षकाला कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते या मुद्द्यांचा मनोविकारग्रस्त विद्यार्थी यशस्वी होण्यावर परिणाम होतो. मानसिक आरोग्य आणि शैक्षणिक कामगिरी यांचा परस्परांशी थेट संबंध आहे.

नैराश्य, अवधान अस्थिरता, अवधान अस्थिरतेमुळे येणारी अतिचंचलता, चिंता, स्वमग्नता, मंत्रचळ, आघातानंतरचा तणाव, टोरेट सिण्ड्रोम, आपोझिशनल डीफायंट डिसऑर्डर, आचरण विकार, व्यसनाधीनता आणि खाण्याशी निगडित विकार हे काही विद्यार्थ्यामध्ये सामान्यतः आढळून येणारे मनोविकार आहेत.

वर्गात शिकवताना मुलांमध्ये पुढील लक्षणे दिसल्यास लक्ष द्या:

  • जे विद्यार्थी तासाला सगळा वेळ झोपतात, ठराविक वेळी, बराच वेळ रडतात किंवा ज्यांचे डोळे पाणावल्यासारखे वाटतात किंवा डोळ्यातून पाणी आले नाही तरी दुःखी किंवा उदास असतात ती नैराश्य किंवा चिंता या मनोविकाराने बाधित असू शकतात.
  • स्वतःची आराम-स्थिती (कंफर्ट झोन) सोडावा लागेल या भीतीने ते शाळेत गैरहजर राहतात. यावेळी ते घरात फक्त झोपून राहतात.
  • अवधान अस्थिरता (अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर) किंवा अवधान अस्थिरतेमुळे येणारी अतिचंचलता (अॅटेन्शन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर) विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये ठळकपणे जाणवणे. खूप चळवळ करणे किंवा एका जागी स्थिर बसणे न जमणे, सारखी जागा सोडून उठणे आणि हातातल्या कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाणे
  • खाण्याशी निगडीत विकार शाळेत लक्षात येणे तितके सोपे नाही. खाण्याच्या विकाराने ग्रस्त असलेल्या विद्यार्थ्याला शिकताना बर्‍याच अडचणी येऊ शकतात.खाण्याशी निगडीत विकारांची लक्षणे खाण्याच्या अनारोग्याकरक सवयींपुरती मर्यादित नसतात. एकटे एकटे राहणे, वजन कमी होणे किंवा कमी झालेले वजन लपवण्यासाठी मुद्दाम ढगाळ कपडे घालणे या लक्षणांकडे देखील लक्ष द्यावे.
  • मादक पदार्थांचा गैरवापर हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बहुतेक वेळा, मादक पदार्थाचे सेवन करणार्‍या विद्यार्थ्याच्या वर्तनात लक्षणीय बदल दिसतात. जीभ जड होणे, झोक जाणे, झोपून पडणे किंवा जास्त चंचल व चळवळे बनणे अशा अस्वाभाविक गोष्टी नजरेस येतात.

मनोविकार असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक कशी मदत करू शकतात?

कोणतीही कृती करण्यापूर्वी शिक्षकांनी मनोविकारची लक्षणे कोणती? आणि विद्यार्थ्यांमधील मनोविकारांची लक्षणे कशी ओळखावी? याची स्वतः माहिती घेतली पाहिजे आणि इतरांना देखील ती माहिती सांगितली पाहिजे. मुलांना सुरक्षित वाटेल असे वातावरण वर्गात निर्माण करणे, तब्येत चांगली राखण्याचे कौतुक करणे, मानसिक आरोग्याच्या सोयी वापरण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करणे अशा काही गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत. प्रत्येक मनोविकाराची काही भावनिक आणि वर्तनात्मक लक्षणे असतात; विद्यार्थ्याच्या वर्तनातील मनोविकाराची चिन्हे आणि लक्षणे ओळखता आली तर शिक्षक त्यांच्या आयुष्यात खूप मोठा फरक पाडू शकतात.

सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील होण्यासाठी शिक्षक स्वतःला घडवू शकतात. विद्यार्थ्यांनी उपलब्ध असलेली जास्तीत जास्त मदत घ्यावी यासाठी ते विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत काम करून त्यांना जागृत करू शकतात.

विद्यार्थ्यांनी स्वयंनियमन / आत्मनियमन केले व आरोग्य संपन्न जीवनासाठी काय गरजेचे आहे हे जाणून स्वतःच्या वर्तनात सुधारणा केली तर ते सर्वात उत्तम ठरेल.

विद्यार्थ्यांना मनोविकारांचा सामना करण्यासाठी मदत करताना शिक्षकांनी सरासार विचार करून वेळोवेळी आपले धोरण निवडले पाहिजे. विद्यार्थ्यांना समस्या सोडविण्याचे कौशल्य शिकवणे, त्यांना ध्येय निश्चितीसाठी मदत करणे यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. बाहेरच्यांनी हस्तक्षेप करून परिस्थितीला वळण दिले पाहिजे अशी कठीण परिस्थिती जेव्हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात निर्माण होते तेव्हा विद्यार्थ्याला सामावून घेणारे निवारे त्यांनी तयार केले पाहिजेत.

शिक्षक विद्यार्थ्यांसाठी पुढील सोयी उपलब्ध करून देऊ शकतात.

  • बसण्याची सोय, विशेषतः दरवाज्याजवळ बसण्याची सोय. म्हणजे गरज पडली तर पटकन अल्पविराम (ब्रेक) घेता येईल.
  • वर्गातील मित्र किंवा मैत्रिणीची स्वयंसेवी सहाय्यक म्हणून नेमणूक करणे.
  • शिकवणे, चर्चा यांचे ध्वनीमुद्रण करण्याची परवानगी देणे.
  • दुसऱ्या विद्यार्थ्याच्या नोट्सची फोटोकॉपी काढण्याची परवानगी देणे.
  • शैक्षणिक कामगिरीवर वैयक्तिक अभिप्राय देणे.
  • वेगळ्या प्रकारे मूल्यमापन करणे. उदाहरणार्थ, तोंडी ऐवजी लेखी परीक्षा किंवा लेखी ऐवजी तोंडी परीक्षा.
  • चाचणीसाठी वाढीव वेळ देणे.
  • स्वतंत्र, शांत आणि चित्त विचलित करणार्‍या कोणत्याही गोष्टी नसलेली खोली परीक्षेसाठी उपलब्ध करणे.
  • विशिष्ट परिस्थितीत मूल्यमापनाचे प्रश्न, प्रकल्पाचे विषय, उपक्रम इ. बदलून देणे.
  • तोंडी सादरीकरणाच्या बदल्यात लिखित असाइनमेंट किंवा तोंडी परीक्षा घेणे.
  • Written assignments in lieu of oral presentations or vice versa
  • Extended time to complete assignments

तुमचे मूल्य हे तुम्हाला परीक्षेत मिळालेल्या गुणांवर अवलंबून नाही हे समजण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे. मानसिक आरोग्य हे शैक्षणिक कामगिरी इतकेच महत्त्वाचे आहे आणि शिक्षक देखील त्याला महत्त्व देतात असे विद्यार्थ्यांना वाटले पाहिजे.

सकारात्मक मानसिक आरोग्य जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांना कशी चालना द्यावी?

  • मनोविकारची पूर्वसूचना देणारी चिन्हे ओळखायला शिकणे
  • मानसिक अनारोग्याचे निदान करण्यासाठी विद्यार्थ्याला एखादी चाचणी देण्याची किंवा त्याचे मूल्यमापन करण्याची गरज आहे का हे ठरविण्यासाठी शाळेतील मानसशास्त्रज्ञची मदत घेणे.
  • सामाजिक कौशल्य प्रशिक्षणासह इतर प्रतिबंधात्मक तंत्रांची अंमलबजावणी करणे.
  • विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याबद्दल शिक्षण देणे.
  • एखाद्या क्लेशकारक घटनेनंतर विद्यार्थ्यांसाठी संकट समुपदेशन करणे.
  • शिक्षकांना वर्ग व्यवस्थापन कौशल्य प्रशिक्षण देणे.
  • तुमच्या विद्यार्थ्यांना शाळेतील किंवा समाजातील त्रासदायक घटनांवर चर्चा करण्याची परवानगी द्या
  • विद्यार्थ्यांना त्यांच्या भावनांविषयी बोलण्यास व त्यांच्या भावनांचे वर्णन करण्यास प्रोत्साहन द्या.

vantagepointrecovery.com/students-with-mental-health-disorders/

http://www.washington.edu/doit/academic-accommodations-students-psychiatric-disabilities

https://www.classroommentalhealth.org/working-with-families/

http://www.mentalhealthamerica.net/conditions/childrens-mental-health

संबंधित लेख

शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या गरजा पूर्ण करणे अत्यंत महत्वाचे आहे, कारण दर पाच मुलांपैकी एक, निदान करण्याजोग्या भावनिक...

मराठी
Search