किशोरवयीन आणि तरुण मुलांमधील तणाव
तणाव आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतो. १३-१८ वर्षे या काळात आपण वेगवान शारीरिक आणि भावनिक बदलांमधून जात असतो. अभ्यास, समवयस्कांशी बदललेले संबंध, शाळा/महाविद्यालयात आवश्यक असलेल्या नवीन क्षमता प्राप्त करणे, करिअर घडवणे इत्यादी इतर आव्हानांचा देखील तरुणांना सामना करावा लागू शकतो. स्वतःची लैंगिक ओळख, अवास्तव कौटुंबिक अपेक्षा, व्यसन, समाज माध्यमे अशा अनेक दबावांना त्यांना तोंड द्यावे लागते. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याचा आणि लग्न करून स्थायिक होण्याचा अतिरिक्त भार असतो. ज्या प्रकारे तरुण लोक या तणावाचा सामना करतात त्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर लक्षणीय असा अल्प आणि दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो.

तणाव आणि चिंता सारखे नाहीत!
तणाव म्हणजे नेमकं काय?
सोप्या भाषेत सांगायचे तर तुम्हाला ताण जाणवत आहे म्हणजे तुमचे शरीर वास्तविक किंवा कल्पित धमक्यांपासून, लढा किंवा पळा असा प्रतिसाद देऊन स्वतःचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहे. तयारीनिशी, परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तणाव आपल्याला मदत करतो असे देखील म्हणता येईल. उदाहरणार्थ, नोकरीसाठी मुलाखत देताना तणाव जाणवत असतो म्हणून आपण आपले सर्व लक्ष केंद्रीत करतो व सतर्क होतो. ताण हा प्रत्येकवेळी खलनायक नसून फायदेशीर देखील असू शकतो.
तणाव हा अस्वस्थतेसारखाच असतो असा चुकीचा विचार करण्याकडे आपला कल असतो. पण, दोघांमध्ये काही फरक आहेत. सामान्यतः काही विशिष्ठ घटनेमुळे तणाव येतो. उदाहरणार्थ, काम संपवण्याची अंतिम मुदत, मित्राशी भांडण इ. त्या घटनेसंदर्भातील आपल्या भावना अस्वस्थता निर्माण करतात आणि ती अस्वस्थता बराच काळ राहते.

पौगंडावस्थेदरम्यान ताण निर्माण करणारे घटक (स्ट्रेसर्स/माइंड स्पेस बग्स)
तुम्हाला त्रास देणार्या, वैताग आणणार्या असंख्य गोष्टी असू शकतात.
- परीक्षा आणि शाळेच्या अपेक्षा
- शाळेत चांगली कामगिरी करण्यासाठी पालकांकडून अपेक्षा आणि दबाव
- आपल्या स्वतःच्या स्वतःकडून अपेक्षा, आपली नाती आणि सामाजिक संबंध
ताण निर्माण करणारे घटक (स्ट्रेसर्स)
सामाजिक संवाद
तुमचा मित्र whatsapp चॅटमध्ये तुमच्याकडे दुर्लक्ष करतोय आणि त्याचा ताण जाणवून तुम्ही सारखा मोबाइल तपासून बघत आहात का? त्यामुळे आपला दिवस फुकट गेला असे तुम्हाला वाटते आहे का? ह्या आणि यासारख्या अनेक छोट्या गोष्टींचा तुम्हाला 'बरे वाटण्यावर' परिणाम होऊ शकतो.
अशा परिस्थितीत, आपण प्रथम एका विश्वासार्ह आणि जवळच्या मित्र/मैत्रिणीकडे वळावे. जो/जी निःपक्षपाती दृष्टिकोनातून परिस्थितीकडे बघू शकेल आणि तुम्हाला तुमची मनःशांती परत मिळवण्यास मदत करेल. कधीकधी, तुम्हाला मित्राशी बोलावेसे वाटत नसेल किंवा त्याचा सल्ला आपल्या तणावाची पातळी कमी करण्यास उपयोगी पडेल असे वाटत नसेल तर तुम्ही माइंड इटवर आमच्याशी संपर्क साधू शकता.
- दादागिरी (बुलिइंग)
सामाजिक संवाद आनंददायी, कंटाळवाणे किंवा अगदी भयंकर देखील असू शकतात. ते सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतात.
गुंडगिरी हे नकारात्मक सामाजिक परस्परसंवादाचे उदाहरण आहे. गुंडगिरी ही कधीच समर्थनीय नसते. भांडण किंवा वादविवाद म्हणजे गुंडगिरी नाही. कोणाचा द्वेष करणे किंवा एखादी व्यक्ती न आवडणे म्हणजे गुंडगिरी नाही. एखादी व्यक्ती किंवा लोकांचा गट वारंवार आणि हेतुपुरस्सर शब्द आणि कृती वापरून दुसऱ्या व्यक्तीच्या स्वास्थ्याला हानी पोहोचवतात तेव्हा त्याला गुंडगिरी म्हणतात.
गुंडगिरी कुठेही घडू शकते, शाळा, बाग, फोन आणि इतरत्र कुठेही. महत्त्वाची पायरी तुम्हाला गुंडगिरीचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या विश्वासातील एखाद्या व्यक्तीशी, कुटुंबीय किंवा मित्रांशी त्याबद्दल बोलले पाहिजे.
परीक्षा आणि शाळेच्या अपेक्षा
शाळेत आपल्याला मित्र मिळतात, आपण नवीन गोष्टी शिकतो तसेच शाळेतील परीक्षेचा विचार तणाव देखील निर्माण करू शकतो. परीक्षेदरम्यान तुमचा मेंदू गोठतो आणि आपल्याला काहीच आठवत नाही असे तुम्हाला वाटते का? परीक्षेच्या वेळी तुम्हाला शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ वाटते का?
तुम्ही हा ताण कमी करण्याच्या काही पद्धती वापरू शकता: तणावाकडे वेगळ्या नजरेने बघा. त्याचे कारण ओळखा. तुम्हाला फक्त वेळेचे नीट व्यवस्थापन करून अभ्यास करायचा आहे. स्वतःला पुरेसा वेळ द्या. तुम्ही अभ्यास केला आहे आणि तुम्ही परीक्षेचा सामना करू शकता याची याची स्वतः ला सतत आठवण करून द्या.
परीक्षेचा ताण कसा दिसतो?
तणावाच्या काही लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहे:
- गोंधळल्यासारखे वाटते
- मित्रांशी संपर्क तुटतो
- मूडी आणि निरुत्साही वाटते
- निर्णय घेण्यात अडचण येते
- सतत भावनाविवश होणे.
- काहीही करण्याची प्रेरणा नसते
- झोपायला किंवा अंथरुणावरुन उठायला नको वाटते
- ताणलेले स्नायू किंवा डोकेदुखी
- पोट खराब होते किंवा आजारी वाटते
- चुळबुळणे, नखे चावणे, दात खाणे
लोक परीक्षेचा ताण का अनुभवतात?
- नापास व्हायची भीती वाटते
- अभ्यास झालेला नाही असे वाटते
- एकदम चांगले गुण मिळवायचे असतात
- अभ्यासाला जास्त वेळ मिळालेला नसतो
- एवढेच मार्क मिळाले पाहिजेत असा आग्रह असतो
- आपल्याला चांगले गुण मिळतील असे वाटत नसते
- अभ्यासाचा विषय न समजणे
- चांगले गुण मिळवण्यासाठी कुटुंबाकडून दबाव असणे
- इतरांशी स्पर्धा करण्याची गरज वाटणे
- आयुयाष्यात ताण निर्माण करणार्या इतर गोष्टी घडत असणे
अभ्यासाची तयारी
अभ्यासाच्या चांगल्या सवयी लावण्यास अजूनही उशीर झालेला नाही. येथे काही उपयुक्त कल्पना आहेत:
विचलित न होता अभ्यास करण्यासाठी शांत जागा शोधा.
तुमची अभ्यासाची जागा सेट करा. आपण खूप गोंधळलेले नाही याची खात्री करा आणि आवश्यक असलेले सर्वकाही समान तुमच्यासोबत बाळगा.
परीक्षेबद्दल शक्य तितकी माहिती करून घ्या जेणेकरून तुम्ही तयारी करू शकाल.
काय चाचणी केली जाईल याची आपल्याला खात्री नसल्यास आपल्या शिक्षकांना विचारा.
माईंड मॅप्स (mind maps) बनवायला शिका आणि त्यांचा वापर कल्पना आणि विचार गोळा करण्यासाठी करा, महत्वाचे दुवे लक्षात ठेवण्यासाठी चमकदार रंग वापरा.
प्रत्येक अभ्यास सत्रात तुम्हाला काय काम करायचे आहे याची योजना बनवा. मोठी कामे, छोट्या कामांमध्ये विभागा आणि एका वेळी एक काम पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा.
थोड्या थोड्या वेळाने विश्रांती घ्या - या वेळेचा वापर पाणी पिण्यासाठी, खाण्यासाठी किंवा पाळीव प्राण्याबरोबर खेळण्यासाठी करा.
मदत घ्या - जर तुम्ही शिकत असलेल्या एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला अडचण येत असेल तर शिक्षक, मित्र, भावंड किंवा पालकांना मदत करण्याची विनंती करा.
अभ्यास करताना मदत करण्यासाठी टिपा
या क्लुप्त्या आणि युक्त्या वापरून पहा:
दररोजची खायची आणि झोपायची वेळ पक्की करा.
रात्रीची चांगली झोप घ्या. हे आपल्या मेंदूला रिचार्ज करण्यासाठी गरजेचे असते. झोपेमुळे आपण जे शिकलो ते लक्षात ठेवण्यास वेळ मिळतो.
तुम्ही तुमच्या अभ्यासातील एखादे ध्येय गाठल्यावर स्वतःला छोटी शाबासकी द्या - टीव्ही शो पहा किंवा बागेत फेरफटका मारून या.
तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा - मैत्रीविषयक चिंतांमुळे किंवा इतर गोष्टींमुळे स्वतःला विचलित होऊ देऊ नका.
जंक फूड टाळा - यामुळे काही काळ खूप उत्साही वाटेल पण नंतर तुम्हाला थकल्यासारखे वाटेल.
संतुलित आहार घ्या - बरीच ताजी फळे, भाज्या, तृणधान्ये, धान्य, विविध प्रकारच्या बिया आणि प्रथिने हे सर्व घटक मेंदूची ऊर्जा पातळी राखण्यासाठी चांगले असतात.
स्वतःला विश्रांतीसाठी वेळ द्या - खोल श्वास घेणे, ध्यान करणे किंवा संगीत ऐकणे अशा प्रकारची विश्रांती घ्या.
एनर्जी ड्रिंक्स कमी करा. त्याऐवजी भरपूर पाणी प्या!
पालकांच्या अपेक्षांना सामोरे जाणे
तुमच्या आयुष्यासाठी तुमचे पालक आणि तुमच्या मनात वेगवेगळी ध्येये आहेत का? हा विषय अनेकदा वाद आणि तणाव निर्माण करतो का?
यावर त्वरित उपाय नाही, परंतु काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि तुमच्या आणि तुमच्या पालकांमधील संवादाचे मार्ग खुले ठेवले पाहिजेत.
तुम्ही महत्त्वाचे आहात हे ध्यानात ठेवा. तुमच्या आयुष्याला स्वतःचे असे मूल्य आहे. तुमच्या जीवनाचे ध्येय आणि तुमच्या स्वतःकडून असलेल्या अपेक्षा काय आहेत यावर ते मूल्य अवलंबून नाही. स्वतःबाबत जास्त कठोर होऊ नका. हे देखील समजून घ्या की प्रत्येकवेळी तसे दिसत नसले तरी पालकांना मुलांच्या आवडीनिवडी माहीत असतात.
खालील मुद्दे लक्षात ठेवा:
त्यांच्याशी संवादाचे मार्ग खुले ठेवण्याचा प्रयत्न करा.
जेव्हा ते मोकळे आणि चांगल्या मूडमध्ये असतील अशी योग्य वेळ निवडा. त्यांना सांगा की तुम्ही त्यांच्या मतांचा आदर करता, परंतु तुमची मते आणि आवडी भिन्न आहेत.
तुम्हाला आयुष्यात काय करायचे आहे हे तुम्हाला माहीत नसल्यास, तुम्ही त्यांना तसे सांगा आणि तुमच्या मनातील ही भीती त्यांच्यासमोर व्यक्त करा.
तुमचे म्हणणे स्वीकारण्यासाठी त्यांना बराच वेळ लागू शकतो, तरी देखील त्यासाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे.
ही परिस्थिती संतुलित करण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्राशी किंवा विश्वासू व्यक्तीशी बोलू शकता.
आपण तणावाचा सामना करू शकत नसल्याचे चेतावणी सिग्नल्स
काही काळ चिंता किंवा निद्रानाश यांचा त्रास झाला तरी सुदैवाने आपण बहुतेक वेळा ताणतणावांचा सामना करू शकतो. परंतु जेव्हा त्रास वाढतो तेव्हा आपण आपल्या भावनांचा मागोवा घेणे आवश्यक असते.
खालील ट्रॅक-ओ-मीटर सारणीवर एक धावती नजर टाका आणि त्यापैकि कोणते वर्णन तुमच्या सद्यस्थितीतील भावनेचे सर्वात योग्य वर्णन करते ते पहा:
तुमचे / तुमची... | स्तंभ १ | स्तंभ २ | स्तंभ ३ |
भावना | अधीरता / चिडचिड | राग / नैराश्य | आक्रमक / स्व-नियंत्रणाबाहेर |
हालचाल | विशेष हालचाल नाही | नेहमी थकलेले आणि कोणत्याही उपक्रमात सहभागी न होणे | Avoiding activities/ feeling unwell |
विचार | भारावलेले | हताशा | Depressed/ suicidal |
सामाजिक जीवन | सामान्यपेक्षा जास्त घरी राहणे पसंत करणे | सर्वांशी चिडचिड होणे | लोकांना टाळणे आणि एकाकी राहणे |
कामगिरी | कामे पुढे ढकलणे / कामे विसरणे | सामान्यपेक्षा जास्त काम करायची इच्छा नसणे | काम करू न शकणे/ काहीच करता येत नसणे |
झोप | झोप येण्यास त्रास होणे | अशांत आणि अस्वस्थ झोप | खूप जास्त किंवा खूप कमी झोप येणे. |
स्तंभ १ मधील वर्णन जर तुमच्या स्थितीला लागू होते असे तुम्हाला वाटत असेल तर ताण दूर करण्याचे वेगवेगळे मार्ग (स्ट्रेस बस्टर्स) वापरून तुम्ही ही परिस्थिती हाताळू शकता. ताण दूर करण्याचा तुम्हाला सोयिस्कर वाटेल असा मार्ग निवडा. पण जर परिस्थिती यापेक्षा वेगळी असेल तर तुम्हाला कोणाशी तरी बोलण्याची गरज आहे. तुम्ही एखाद्या विश्वासू मित्राशी बोलू शकता किंवा इमोशनल फर्स्ट-ऐड ची मदत घेऊ शकतात
ताण विरेचक (स्ट्रेस बस्टर्स)
जेव्हा तुमचा मेंदू तुम्हाला असे संदेश देईल की, तुम्हाला बरं वाटत नाहीये आणि ही अस्वस्थतेची भावना दूर होण्यासाठी काहीतरी करायला हवे तेव्हा पुढील गोष्टी करा:
- ध्यानधारणा (मेडिटेशन)
- हालचाल
- विश्रांती घ्या / झोपा
- स्वतःला वेळ द्या
- मित्रांसोबत वेळ घालवा

झोप ही ताण विरेचक म्हणून कशी काम करते याची माहिती घेऊ. आपल्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे. जोपर्यंत आपल्याला झोपेसाठी तळमळत रात्र काढावी लागत नाही तोपर्यंत आपण झोपेला गृहीत धरतो.
झोपेचा दर्जा सुधारण्यासाठी आपण पुढील गोष्टी करू शकतो:
- झोप ही ताण विरेचक म्हणून कशी काम करते याची माहिती घेऊ. आपल्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे. जोपर्यंत आपल्याला झोपेसाठी तळमळत रात्र काढावी लागत नाही तोपर्यंत आपण झोपेला गृहीत धरतो. झोपेचा दर्जा सुधारण्यासाठी आपण पुढील गोष्टी करू शकतो.
- झोपेची तयारी करण्यासाठी थोडा वेळ घ्या. अर्धा तास पुरेसा आहे. तुमचं फोन किंवा संगणक बाजूला ठेवा, तुम्हाला शांत करणारे संगीत लावा. काही वाचायचे असेल तर हलकेफुलके काहीतरी वाचा. शरीराला हलकासा ताण द्या (स्ट्रेचिंग), ध्यान करून मन शांत करण्याचा प्रयत्न करा.
- डायरी ठेवायचा प्रयत्न करा. त्यात तुम्हाला अस्वस्थ करणार्या व तुम्हाला आनंदी करणार्या अशा दोन्ही प्रकारच्या बाबींची नोंद करा. जर तुम्हाला याद्या तयार करायला आवडत असेल तर दुसर्या दिवसाच्या कामांची यादी तयार करा.
किशोरवयीन मुले जसजशी मोठी होतात तसतशी त्यांच्या भावना व विचार परिपक्व होतता, आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोण बदलतो आल्याने अनेक गुंते सुटतात, ताणाचा निचरा होतो. परंतु ताण निर्माण करणार्या नवीन गोष्टी देखील निर्माण होत राहतात.
ताण निर्माण करणार्या गोष्टी (ट्रीगर्स) :
- अतिरिक्त काम
- आर्थिक चिंता
- यशस्वी होण्यासाठी दबावयशस्वी होण्यासाठीचा दबाव
- स्पर्धेच्या भावनेमुळे निर्माण होणारा ताण
- परिस्थितीशी जुळवून घेण्याची कमकुवत क्षमता
अतिरिक्त काम
कामाशी संबंधित ताण ही खूप सामान्य बाब आहे. विशेषतः तरुण मुले त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात करत असतात आणि कामाशी निगडीत त्यांच्या आयुष्यावर त्यांचा विशेष ताबा नसतो. हा फक्त वेळेचे व्यवस्थापन करण्याचा मुद्दा नसतो.
आर्थिक चिंता
तरुणवयात नुकतेचा अर्थार्जन सुरू झालेले असते त्यामुळे तरुण आर्थिकदृष्ट्या कमी सुरक्षित असतात. त्यांना त्यांच्या आर्थिक स्थितीशी निगडीत चिंता जाणवत असतात.
यशस्वी होण्यासाठीचा दबाव
या वयात बहुदा यश मिळवण्याची गरज हा तरुणांच्या प्रेरणेचा स्त्रोत असतो. त्यांच्या आत्मसन्मानावर त्यांच्या यशाबद्दलच्या दृष्टीकोनाचा प्रभाव असतो. १८ ते २४ या वयोगटातील ६०% तरूणांवर व २३ ते २४ वर्षे वयोगटातील ४१% तरुणांवर हा यशस्वी होण्याचा ताण असतो. २३ ते २४ वयोगटात हा ताण असलेल्या तरुणांची टक्केवारी कमी झालेली दिसते कारण वाढत्या वयाबरोबर ते हळूहळू त्यांच्या कार्यक्षेत्रात स्थिरावू लागतात.
तरुण मुले जेव्हा त्यांची तुलना इतरांशी करतात तेव्हा त्यांना अधिक ताण जाणवतो असे दिसून आले आहे. १८ ते २४ वयोगटातील जवळपास ४९% तरुणांनी ही चिंता नोंदवली आहे
संदर्भ:
फोर्ब्स | हाऊ 'कीपिंग अप दी जोनसेस' ऑन सोशल मीडिया इज डैमेजिंग एवरीवन्स मेंटल हेल्थ
डॉ. मार्गारेट रुदरफोर्ड | फाईव स्टेप्स टू स्टॉप कंपेरिंग युअरसेल्फ टू अदर्स
वेरीव्हेल माइंड | दी स्ट्रेस ऑफ सोशल कंपॅरिझन
तणावाशी सामना करण्याचे कौशल्य
ताण निर्माण करणार्या घटकांचा (ट्रिगर्स ) तरुणांवर अधिक परिणाम होतो, कारण तणाशी सामना करण्याचे त्यांचे धोरणअजून तयार होत असते. वयाबरोबर तणावाचा सामना करण्याची त्यांची कौशल्ये सुधारतात आणि त्यांचा त्रास कमी होतो. आपल्याला कशामुळे ताण येतो हे त्यांच्या लक्षात येऊ लागते व अशा वेळी उपयोगी पडणारे नातेसंबंधांचे जाळे ते हळूहळू तयार करतात.
मला स्वतःबद्दल काळजी वाटावी अशी परिस्थिती आहे का? / मदत कधी मिळवायची?
आपल्याला तणाव जाणवतोय हे ओळखणे महत्वाचे आहे. आपण तणावग्रस्त आहोत हे मान्य करू तेव्हाच त्याचे उत्तर शोधण्याचा मार्ग आपल्याला सापडेल.
आरोग्यापूर्ण जीवनासाठी स्वतःला पुढील प्रश्न विचारा.
- मी सहजपणे चिडतो/ चिडते का?
- आजकाल माला बहुतेक वेळा चिंता आणि काळजी वाटते का? तीव्र चिंतेने मी सैरभैर होते का? (पॅनीक अटॅक)
- अनेकदा मी रडायला टेकलेला असतो का? अगदी काही न घडता देखील मला रडू येत राहते का?
- मी इतका अस्वस्थ का आहे?
- मी लक्ष एकाग्र का करू शकत नाहीये?
- मला गर्दीत देखील एकटे का वाटते?
- मला रात्रीची झोप का येत नाही?
- मी नेहमीपेक्षा जास्त मद्यपान आणि धूम्रपान करत आहे का?
- मी वयाने तरुण असलो तरी माझ्या शरीराचे सारखे काहीतरी दुखणे- खुपणे का चालू आहे?
कधीकधी तणाव तुमच्यावर स्वार होतो. विशेषत: जेव्हा तणाव निर्माण करणारी परिस्थिती तशीच राहते आणि समस्या वाढतच जातात. यातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग नाहीये आणि आपण यात अडकलोय असे तुम्हाला वाटू शकते. असे वाटत असेल तर मदत घेणे आवश्यक आहे.
तणाव खूप जास्त होत आहे आणि तुम्ही मदत घेतली पाहिजे याची चिन्हे:
- ताणाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतोय असे तुम्हाला वाटत असेल.
- तुम्हाला इतके हताश वाटते की शाळेत जाणे थांबवावे, पळून जावे किंवा स्वतःला हानी पोहोचवावी असे विचार तुमच्या मनात येतात.
- तुम्हाला उदास, दुःखी वाटते, रडू येते. जगण्यात राम नाही असे वाटते.
- तुमची भूक मरते, झोप लागत नाही.
- ज्याबद्दल तुम्ही इतरांशी बोललात तर तुम्ही विचित्र आहात असे लोकांना वाटेल अशा चिंता, भावना आणि विचार तुम्हाला भेडसावू लागतात.
- तुम्हाला काय करावे हे सांगणारे किंवा विचित्र वागण्यास भाग पडणारे आवाज ऐकू येतात.
- तुम्ही ताण कमी करण्यासाठी दारू किंवा इतर मादक द्रव्ये वापरू लागता.
तणावमुक्तीसाठी कृती योजना!
आपल्याला कशाचातरी ताण आलाय आणि त्याचा त्रास होतोय हे जेव्हा तुमच्या लक्षात येते आणि त्यासाठी कारणीभूत असणारे सर्वसामान्य ट्रीगर्स तुम्ही तपासून बघता तेव्हा ताणाचा सामना करणारे तुम्ही एकटेच नाही हे तुमच्या लक्षात येते आणि तुम्ही एक प्राथमिक कृती आराखडा तयार करू शकता.
परिस्थितीला शांतपणे सामोरे जाता यावे यासाठी तुम्ही खालील गोष्टी करू शकता. स्वतःला सांभाळसाठी तुम्हाला अनेक गोष्टी मदत करू शकता.
- दुःख एकट्याने सोसू नका! एकटेपणामुळे ताणाचा सामना करणे कठीण बनते. आपल्या विश्वासातील व्यक्तीशी बोलल्याने तणावाचा सामना करण्यास आणि ज्या समस्यांमुळे हा ताण उद्भवला आहे त्या समस्या सोडविण्यास मदत होते.
- तुम्हाला ज्यामुळे ताण जाणवतो अशा तुमच्या आयुष्यातील सर्व गोष्टींची यादी बनवा.
- ही यादी एका कागदाच्या तुकड्यावर लिहा.
- यांपैकी प्रत्येक मुद्द्याला सामोरे जाण्यासाठी तुम्ही करू शकता त्या सर्व गोष्टींची यादी करा.
- मनात समस्यांची क्रमवारी लावण्यास याची मदत होऊ शकते. मोठ्या गोंधळापेक्षा एका वेळी एक समस्या हाताळणे सोपे असते.
- विश्रांती घ्या - तुमच्या आवडीची गोष्ट करा.
- तुम्हाला ज्यामुळे आराम मिळतो अशी गोष्ट करा. उदाहरणार्थ संगीत ऐकणे किंवा चित्रपट पहाणे.
- Do some exercise. This produces chemicals in your body called ‘endorphins’ which make you feel good.