Search

समस्यांचे निराकरण किंवा अडचणी सोडवणे

जीवनात आणि कामात समस्या येत राहतात. समस्या सोडविण्याचा मार्ग जरी आपल्याला लगेच सुचला नाही तरी समस्या कशामुळे निर्माण झाली याबद्दल विचार करून आपण सुरुवात करू शकतो. शांतपणे आपल्या तर्कबुद्धीचा वापर करून आपण काही चांगले उपाय शोधू शकतो. समस्या हा आयुष्याचा भाग आहेत. अगदी आपला फोन बंद पडण्यापासून ते कामाच्या ठिकाणी एखाद्या त्रासलेल्या ग्राहकाशी व्यवहार करण्यापर्यन्त अनेक छोट्या मोठ्या समस्या आयुष्यात नेहमी असणार आहेत. स्पष्ट विचार करून, तर्काच्या आधारे परिस्थितीकडे बघण्याच्या पद्धतीला समस्या सोडवणे असे म्हणतात. कोणत्याही समस्येचे निराकरण करण्याचा हा एक चांगला मार्ग असू शकतो

परीक्षेदरम्यान, जरी तुम्हाला उत्तर माहित नसले तरी, तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेली सर्व माहिती समजली आहे याची खात्री करण्यासाठी समस्या किंवा प्रश्न अनेक वेळा वाचा. तार्किकदृष्ट्या त्या प्रश्नावर विचार करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काय विचारले जात आहे? तर्क काय सांगतो आहे ? जर तुम्हाला एकापेक्षा जास्त उपाय सुचले , तर तुम्हाला कोणता उपाय जास्त योग्य वाटतो आणि का? जर तुम्हाला अद्याप उत्तर माहित नसेल, तर पुढील समस्येवर जा , ती सोडवा आणि परत आधीच्या समस्येकडे या. नव्याने पुन्हा ही जुनी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.

शाळा/महाविद्यालय किंवा कामामध्ये तुम्हाला भेडसावणाऱ्या अनेक समस्या सोडवताना प्रेरणा, आत्मविश्वास, स्व-व्यवस्थापन आणि गट कार्य (टीम वर्क) या चार मुख्य जीवन कौशल्यांचा उपयोग होऊ शकतो. समस्या माणसांशी संबंधित असल्यास तुमचे संभाषण कौशल्य देखील उपयोगी पडू शकते.

आयुष्यात तुम्हाला येणारी कोणतीही समस्या उदाहरणादाखल घ्या आणि स्वतःला पुढील प्रश्न विचारा.

  • पूर्व तयारी करून किंवा नियोजनबद्ध रीतीने या समस्येला सामोरे जाणे उपयोगी पडू शकेल का?
  • समस्येला एकट्याने तोंड देण्यापेक्षा जोडीने किंवा गट म्हणून समस्येला सामोरे जाणे फायद्याचे ठरेल का?
  • समस्येचा सामना करणे आणि तिच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघणे यासाठी आपल्याला प्रेरणा कशी मिळेल?
  • तुम्ही भावनेपेक्षा बुद्धीने विचार करून समस्येवर उत्तरे शोधू शकता का? (या पद्धतीने उत्तरे शोधणे अधिक सोपे जाते.)

शाळेत आणि कामाच्या ठिकाणी समस्या सोडवण्याची कौशल्ये जोपासण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या माहितीची मदत होईल:

  • परिस्थितीचे आणि माहितीचे मूल्यमापन करा आणि त्यांचे हाताळता येतील अशा छोट्या छोट्या तुकड्यात विभाजन करा.
  • समस्येकडे नव्या दृष्टिकोनातून पहा. त्यातील अवघड आव्हानांपेक्षा शक्य असलेल्या उपायांवर लक्ष केंद्रित करा.
  • माहिती आणि तर्कशास्त्रावर आधारित निर्णय घेण्याचे कौशल्य जोपासा. फक्त भावनांवर विसंबून निर्णय घेऊ नका.
  • स्वतःमध्ये असलेले सामर्थ्य आणि कौशल्ये शोधा, जी कदाचित तुम्हाला आधी कधीही माहित नसतील.
  • प्रत्येक समस्येतून शिका आणि अधिक सजग व्हा.
  • प्रत्येक वेळी तुमच्या वरिष्ठ व्यक्तीला हे कळू द्या की तुम्ही व्यवहारी, सर्जनशील, लवचिक आहात आणि तुमच्यावर अवलंबून राहणे सुरक्षित आहे.

कामाच्या ठिकाणी समस्या सोडवण्याचे कौशल्य

कामात अडचण येते, तेव्हा या पाच पायऱ्यांचा वापर करून तुम्ही ती समस्या सोडवू शकता.

  1. समस्येचे वर्णन करा आणि समस्येची व्याख्या करा.
  2. सद्य परिस्थितीत काय बरोबर आणि काय चूक आहे याचे विश्लेषण करा.
  3. समस्येची संभाव्य कारणे ओळखा.
  4. सर्वात जास्त संभाव्य कारण ओळखा आणि त्याबद्दल खात्री करून घ्या.
  5. समस्येचे निराकरण करण्यासाठी कृती करा.

तुम्ही पूर्वी काही समस्यांवरचे उपाय शोधले असतील, तसेच तुम्हाला तुमच्या कामाचा पूर्वी कधीतरी अभिमान वाटला असेल. त्यावेळी काय चांगले झाले आणि काय चुकले याचा विचार करण्याचा प्रयत्न करा. आपण हे करण्यासाठी स्टार पद्धत वापरू शकतो.

समस्या सोडवण्याची कौशल्ये कशी जोपासावी आणि त्यात सुधारणा कशी करावी?

समस्या सोडवण्याची कौशल्ये जोपासण्यासाठी उपयुक्त असे काही उपक्रम पुढे दिले आहेत:

तुमच्या आवडीच्या समस्या निवडा.

जर तुम्हाला व्हिडिओ गेम, बोर्ड गेम किंवा सुडोकू सारखे 'मनाचे' खेळ आवडत असतील तर रणनीती आखून, नियोजन करून आणि प्रयोग, चाचणी आणि त्रुटीचा विचार करून तर्कशुद्ध मार्गाने ज्या समस्या सोडवणे शक्य आहे अशा समस्या तुम्हाला सोडवायला आवडतील.

लक्षात ठेवा की समस्या शारीरिक आणि मानसिक असू शकतात

तुम्हाला तुमच्या हातांनी काम करायला आवडते का? कार देखभाल, शिवणकाम, प्लंबिंग आणि हस्तकला ही शारीरिक कामाची काही उदाहरणे आहेत ज्यात समस्या सोडवायला लागतात.

नोकरीच्या ठिकाणच्या मुलाखती

आपण भूतकाळातील समस्यांना कसे सामोरे गेले हे ऐकण्यासाठी मुलाखतकारांना नेहमीच रस असतो. तुम्ही सोडवलेल्या किंवा मात केलेल्या समस्येचे उदाहरण सांगण्यास तुम्हाला मुलाखतीत सांगितले जाऊ शकते.IDEAL पद्धत वापरून त्यांना तुमच्या मागील शाळा, काम किंवा जीवनातील अनुभवाचे उदाहरण द्या.

I- Identifying the problem - समस्या ओळखा.
D - Define the problem - समस्येची व्याख्या करा.
E - Examine the option - समस्या अभ्यासा.
A- Act on a plan - कृती करा.
L- Look at the consequences- परिणामांकडे बघा.

समस्या सोडवणे हे जीवन कौशल्य आहे. ते अनुभवाने वाढते.आपण कामातील किंवा शिक्षणामधील समस्यांकडे शांतपणे, साकल्याने पाहू शकू अशा बर्‍याच संधी आपल्याला जीवनात मिळतात.


स्वतःची चाचणी घ्या!

तुम्ही खालील प्रश्नांचा विचार करू शकता का ते पहा. वास्तवातील उदाहरणे घेणे आपल्या उपयोगाचे आहे. आपल्या स्वतःच्या जीवनातील आणि कामाच्या ठिकाणच्या अनुभवाची उदाहरणे घेणे देखील फायदेशीर ठरते.
  1. नोकरी देणार्‍या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून समस्या सोडवण्याची कौशल्ये का महत्त्वाची आहेत?
  2. तुम्ही तुमची समस्या सोडवण्याची कौशल्ये कशी विकसित करू शकता? एक उदाहरण द्या.
  3. तुम्ही चांगले संवाद कौशल्य कसे दाखवू शकता? एक उदाहरण द्या.
  4. तुम्ही तुमचे समस्या सोडवण्याचे कौशल्य एखाद्या संभाव्य व्यक्तीला किंवा मुलाखतकाराला कसे दाखवू शकता?

संबंधित लेख

मुले दिवसातील बराच वेळ शाळेत घालवतात. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. गैरवर्तन आणि...

मराठी
Search