Search

पालकत्वाची धोरणे

पौगंडावस्थेचा काळ हा किशोरवयीन मुलांसाठी आणि पालकांसाठी ही एक गोंधळवणारा असू शकतो. ही वर्ष कठीण असली तरी याच काळात तुम्ही मुलांना घडवून एक चांगला नागरिक बनविण्यासाठी प्रयत्न करू शकता. तुम्हाला असे वाटू शकते की या दिवसांमध्ये मुलांवर तुमचा प्रभाव नाहीये, परंतु किशोरांचे वर्तन हे त्यांचे पालकांशी असलेलल्या जवळकीच्या नात्यावर अवलंबून असते.

किशोरवयीन मुले आणि त्यांचे पालक यांच्यात असलेले चांगले संबंध किशोरवयीन विद्यार्थ्यांना अधिक शैक्षणिक यश आणि आनंद मिळवून देतात त्याउलट, कमकुवत किंवा विवादित पालक / किशोरवयीन संबंध हे लवकर लैंगिक क्रिया, मादक पदार्थ आणि दारू यांचा वापर, हिंसेमध्ये सहभाग आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांशी संबंधित असतो.किशोरवयीन मुलांचे पालकत्व करताना महत्वाची गोष्ट म्हणजे नातेसंबंधांवर लक्ष केंद्रीत करणे. शिक्षा करण्यामुळे मुले आपल्या पासून दुरावतात आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात घडणार्‍य गोष्टींची माहीत मिळणे अवघड होते ज्यामुळे चांगले पालक बनण्यामध्ये अडचणी येतात. किशोरवयीन मुलांशी प्रेमाने वागणे हे फायदेशीर आहे.

● प्रेम दाखवा

पौगंडावस्थेतील मुलांकडे सकारात्मक दृष्टीने लक्ष देणे आवश्यक आहे. आपल्या किशोरवयीन मुलांबरोबर वेळ घालावा ज्यामुळे तुम्हाला त्यांची काळजी आहे हे दिसेल. तुमची किशोरवयीन मुलं बोलत असतील तेव्हा त्यांचे ऐका, आणि त्यांच्या भावनांचा आदर करा. आपण त्यांच्यावर किती प्रेम करतो हे त्यांना माहीत आहे असे गृहीत धरू नका.

जर तुमच्या किशोरवयीन मुलांना तुमच्या जवळीकतेत रस नसला तर त्यासाठी प्रयत्न करत रहा. नियमितपणे जेवण एकत्र करणे हा जोडून राहण्यासाठीचा एक चांगला मार्ग असू शकतो. अजून उत्तम मार्ग म्हणजे, आपल्याबरोबर जेवण तयार करण्यासाठी किशोरांना बरोबर घ्या. तुम्हाला किशोरवयीनशी बोलताना काही वेळेस अडचणी येत असतील तर त्यांना विचार करण्यासाठी वेळ द्या. एकमेकांच्या जवळ असण्याने संवाद होण्याची शक्यता वाढते.

हे लक्षात ठेवा की बिनशर्त प्रेमाचा अर्थ बिनशर्त मान्यता असा होत नाही. . आपण आपल्या किशोरवयीन मुलांना त्यांच्या वर्तनामुळे त्यांच्यावरील प्रेमामध्ये काही फरक पडणार नाही असे दर्शवून शिस्त लावू शकता. वैयक्तिक टिका करण्या पेक्षा किशोरवयीन एखादी गोष्ट चांगली करत असतील तर त्याविषयी बोला.

● वाजवी अपेक्षा ठेवा

किशोरवयीन मुलं पालकांच्या अपेक्षेनुसार किंवा त्यापेक्षा कमी गोष्टी करण्याकडे कल असतो, म्हणून आपल्या अपेक्षांना उच्च ठेवा. उच्च गुण मिळविणे यासारख्या यशावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्या किशोरवयीन मुलाने दयाळू, विचारशील, आदरणीय, प्रामाणिक आणि उदार असावे अशी अपेक्षा बाळगा. 

जेव्हा आपण दररोजच्या गोष्टींचा विचार करतो तेव्हा हे लक्षात ठेवला पाहिजे की कुमारवयीन मुलांना यशाच्या माध्यमातून आत्मविश्वास मिळतो, जो त्यांना पुढील आव्हानासाठी तयार करू शकतो. आपल्या किशोरवयीन मुलांनी अधिक कठीण परिस्थिति हाताळताणा त्यांना आधार द्या आणि तो किंवा ती काय हाताळू शकतात हे ठरवण्यासाठी मदत करा. जर तुमचे किशोरवयीन मुलं परिस्थिति हाताळताणा कमी पडले तर सकारात्मक प्रतिसाद द्या आणि त्याला किंवा तिला यातून बाहेर येण्यासाठी व पुन्हा प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहित करा. शेवटच्या निकालापेक्षा आपल्या किशोरवयीन मुलांच्या प्रयत्नांचे कौतुक करणे अधिक महत्वाचे आहे.

● नियम आणि परिणाम ठरवा.

शिस्त म्हणजे शिक्षा देणे किवा धाकात ठेवणे हे नसून शिकण्याची प्रक्रिया आहे. आपल्या किशोरवयीन मुलांनी चांगले वागावे यासाठी प्रोत्साहित करणे, घरात, शाळेत किंवा इतर कोणत्याही ठिकाणी कोणते वर्तन स्विकारहार्य आहे व कोणते नाही यावर त्यांच्या बरोबर चर्चा करा. परिणाम ठरवताना:

  • काळाची मर्यादा ठरविणे टाळा. तुमचे किशोरवयीन मुलं मर्यादेकडे आव्हान म्हणून बघू शकते.
  • स्पष्ट आणि मुद्देसुद व्हा. आपल्या किशोरवयीन मुलास उशीर यायचे नाही असे सांगण्यापेक्षा घरात येण्याची वेळ ठरवा. नियम लहान व मुद्देसूद असावेत. तुमचे परिणाम हे आवड व कृती याशी जोडा.
  • निर्णय समजावून सांगा. किशोरवयीन मुलं नियम पाळण्याची अधिक शक्यता असते जेव्हा त्यांना त्याचा उद्देश समजलेला असतो. त्यांच्या सुरक्षिततेसाठी नियम बनविले आहेत हे कळल्यानंतर विरोध होण्याची शक्यता कमी होते.
  • वाजवी / समजूतदार व्हा. किशोरवयीन पाळू शकणार नाहीत असे नियम बनविणे टाळा. आस्थाव्यस्थ असणार्‍या मुलांना लगेच बेडरूम नीटनेटके राहावे यासाठी सांगणे हे त्यांना अडचणीत टाकू शकते.
  • लवचिक व्हा. आपल्या किशोरवयीन मुलाने अधिक जबाबदारी घेतल्यावर त्यांना स्वातंत्र्य द्या. जर तुमच्या किशोरवयीन मुलीने योग्य निर्णय घेतला नाही तर अधिक प्रतिबंध लावा.

परिणामांची अंमलबजावणी करताना, आपल्या किशोरवयीन मुला-मुलीची निंदा करण्यापेक्षा त्यांच्या वर्तनाची करा. आपल्या किशोरवयीन मुलांना त्याच्या चुका किंवा त्याच्या उणीवांबद्दल व्याख्यान देणे टाळा, ज्यामुळे तुम्ही चुकीचे आहात हे सिद्ध करण्यासाठी ते प्रवृत्त करतील. उपहासात्मक, अपमानजनक किंवा अनादर करणार्‍या आवाजात बोलू नका. आपल्या किशोरवयीनाचे लाजिरवणे क्षण त्यांच्यामध्ये लज्जास्पद भावना उत्पन्न करू शकतात, त्यामुळे तो किंवा ती बचावात्मक होऊ शकतात, आणि त्यांना त्यांनी काय चुकीचे केले आहे ह्याचा विचार करण्यापासून विचलित करू शकतात. बोलण्या पूर्वी विचार करा तुम्ही जे विचारणार आहात ते खरे, आवश्यक आहे पूर्वीच्या अनुभवावर आधारित नाहीये.

● नियमांचा प्राधान्य क्रम ठरवा

नियमांची सातत्याने अंमलबजावणी करणे महत्वाचे आहे, परंतु कधी कधी त्यामध्ये खंड पडू शकतो जसे की गृहपाठ करणे, झोपण्याची वेळ. नियमांचा प्राधान्य क्रम ठरवल्यामुळे आपल्या किशोरवयीनास बोलणी करण्याचा आणि तडजोडीचा सराव करण्याची संधी मिळेल.

तथापि, आपण किती माघार घेण्यास तयार आहात याबद्दल आधी विचार करा. आपल्या लढाया सुज्ञपणे निवडा. आपल्या किशोरवयीन मुलाच्या सुरक्षिततेसाठी लागू केलेल्या बंधनांविषयी, जसे की मादक पदार्थांचा गैरवापर, लैंगिक क्रिया आणि बेपर्वाईने वाहन चालविणे याविषयी तडजोड करू नका. आपण तंबाखू, मद्यपान किंवा इतर अमली पदार्थांचा वापर सहन करणार नाही हे आपल्या किशोरवयीन मुलाला माहित आहे याची खात्री करुन घ्या.

● चांगले उदाहरण ठेवा

किशोरवयीन मुले त्यांचे पालकांकडे बघून कसे वागायचे शिकतात. शब्दां पेक्षा तुमच्या कृतीतून जास्त कळते. सकारात्मक मार्गांनी तणावाचा सामना कसा करायचा आणि लवचिक असावे हे मुलांना दाखवा. त्यांच्या पुढे चांगले उधारण ठेवा आणि मुलं आपोआपच तुमचे अनुकरण करतील.

पालकांसाठी काही अतिरिक्त सकारात्मक सूचनांमध्ये हे समाविष्ट आहे:

  • ➔ मुलांना थोडी मुक्तता द्या.

किशोरांना त्यांची स्वत: ची ओळख प्रस्थापित करण्यासाठी संधी देणे, त्यांना अधिक स्वातंत्र्य देणे हे समाजामध्ये त्यांचे स्थान निर्माण करण्यासाठी गरजेचे आहे. 

  •  ➔ सक्रिय आणि साजेसे पालक बना

आपला मुलगा किंवा मुलगी मोठी होत आहेत आणि त्यांना अधिक स्वातंत्र्य हवे आहे हे लक्षात घेतले पाहिजे. परंतु आपली मुले कोठे जात आहेत, कोणाबरोबर जातायत आणि काय करत आहेत हे विचारण्यास घाबरू नका. आपल्या मुलांचे मित्र आणि त्यांचे पालक यांना जाणून घ्या जेणेकरून तुम्हाला घडणार्‍य सर्व गोष्टी कळतील.

ज्या मुलांबद्दल तुम्हाला काही प्रश्न आहेत त्यांना भेटण्यासाठी मदत होईल. जेव्हा पौगंडावस्थेतील मुले त्यांच्या पालकांशी कशी वागतात हे जेव्हा मुलं बघतात तेव्हा ते त्यांना चांगल्या पद्धतीने समजू शकतात.

  • चर्चा करा 

किशोरांना वया प्रमाणे योग्य स्वायत्तता दिली पाहिजे, विशेषकरून जर त्यांचे वर्तन चांगले असेल, परंतु ते कोठे आहेत हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. हे जबाबदार पालकत्वाचा एक भाग आहे. गरज असेल तर संध्याकाळी फोन करून ते कुठे आहेत हे सांगावे. परंतु हे मुलांवर अवलंबून आहे ते किती जबाबदार आहेत.

  • जोखमींविषयी किशोरांशी बोला

 ड्रग्ज, ड्रायव्हिंग किंवा विवाहपूर्व लैंगिक संबंध यामुळे घडणार्‍या सर्वात वाईट गोष्टी आपल्या मुलांना माहीत असणे आवश्यक आहे.

  • अडचणीत असताना काय करायचे याविषयी मुलांना तयार करा. 

किशोरवयीन मुलांबरोबर ते विचित्र किंवा असुरक्षित परिस्थितीमध्ये सापडले तर काय करायचे याविषयी चर्चा करा. जे मुलांना करणे शक्य आहे अशा स्वरूपाचे पर्याय निवडा.

  •  चर्चेसाठी कायम तयार रहा.

चौकशी करु नका, परंतु बोलण्यात रस आहे असे दाखवा. त्यावयात असताना तुमच्या बाबतीत घडलेल्या काही गोष्टी सांगा आणि त्यांच्या विषयी विचारा. शाळा कशी होती? तुमचा दिवस कसा होता? आणखी एक चांगले वाक्य म्हणजे “ आत्ता काय घडले याविषयी बोलावे असे वाटणार नाही” ते का हे मला माहीत आहे.परंतु परत तुला बोलावेसे वाटले तर तू माझ्याकडे ये.

  •  मुलांना दोषी वाटू द्या. 

स्वत: बद्दल चांगले वाटणे हे निरोगी आहे. परंतु लोकांना वाईट वाटते जर त्यांनी कोणाला दुखावले असेल किंवा काही तरी चुकीचे केले असेल. दोषी वाटणे ही निरोगी भावना आहे. जेव्हा मुलांनी काहीतरी चूक केली असेल, तेव्हा त्यांना वाईट वाटेल, दोषी वाटेल अशी आपल्याला आशा असते.

एकत्र घालविण्याची वेळ ठरवा.

प्रत्येक दिवस खात्री करुन पहा. रात्री जेवणानंतर आवाराआवरी करत असताना किंवा झोपायला जाण्या आधी काही मिनिटांचे संभाषण आपल्याला संपर्कात ठेवू शकेल आणि मुक्त संवाद घडू शकेल. दिवसातले 23 तास ते तुम्हाला विसरले तरी रात्री झोपताना संभाषण करण्यासाठी येतील. या छोट्या दैनंदिन संभाषणा व्यतिरिक्त, आपल्या किशोरवयीन मुलांसोबत काहीतरी खास करण्यासाठी नियमितपणे साप्ताहिक वेळ घालविण्यासाठी नियोजन करा, त्यामध्ये फक्त आईस्क्रीमसाठी बाहेर जाणे किंवा एकत्र चालणे याचा सुद्धा समावेश असू शकतो.

शाळे नंतर तिथे असण्याचा प्रयत्न करा

मादक पदार्थांचा वापर आणि लैंगिक संबंधांसाठी सर्वात मोठा धोकादायक वेळ ही विशिष्ट दिवस किंवा रात्र नसून आठवड्यातील रोजची 3 ते 6 ही वेळ आहे. जर शक्य असेल तर कामाची वेळ निश्चित ठेवा. जर आपले मुल मित्रांसोबत असेल तर ते प्रौढांच्या देखरेखीखाली राहील याची खात्री करा मोठ्या भावंडांवर अवलंबून राहू नका.

स्वतःची काळजी घेण्यासाठी प्रोत्साहित करा

स्वत: ची काळजी घेण्यामध्ये रात्रीची झोप आणि चांगला आहार घेणे समाविष्ट आहे.कॉफी घेणे ही वाईट सवय आहे त्यामुळे झोपेवर परिणाम होतो. स्क्रीनचा बराच वेळ, विशेषत: झोपेच्या आधीच्या तासात, मेलाटोनिनचे प्रमाण कमी करते आणि त्यामुळे रात्री मुलांच्या झोपे वर परिणाम होतो.

कौटुंबिक भेटी चालू ठेवा

नियमित ठरलेल्या वेळेत घेतल्या जाणार्‍या कौटुंबिक भेटीमध्ये यश, तक्रारी, भावंडांमधील तक्रारी, दिनक्रम आणि कुंटुंबातील सदस्यांसंबंधी कोणत्याही विषयावर चर्चा करण्यासाठी मंच उपलब्ध होतो. काही नियमांची मदत होते. प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळते; एक व्यक्ती एका वेळी बोलते कोणत्याही अडथळया शिवाय; प्रत्येकजण ऐकतो, आणि केवळ सकारात्मक, विधायक प्रतिसाद देणे गरजेचे आहे. मुलांकडून सामील होण्यासाठी विरोध होऊ शकतो त्यामुळे भेटीनंतर पिझा, आइसक्रीम यासारख्या गोष्टींचे आयोजन करा किंवा सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करा किंवा नियमांचे पालन केले जाते की नाही हे बघण्याची जबाबदारी त्यांना द्या. 

  •  मुलांची सुरक्षितता आणि त्यांना कुटुंबाशी जोडलेले ठेवण्यसाठी संगणक सगळ्यांचा वावर ज्या ठिकाणी असेल तेथे ठेवा.

किशोरावयीन मुलं ऑनलाईन काय करतात हे पडताळणे अवघड असते कारण मुलांना पालकांपेक्षा त्यातील जास्त माहिती असते. परंतु संशोधनात असे दिसून आले आहे की जर संगणक सर्वजण असतील अशा जागेत असेल, जिथं आपण जाऊन तो काय करतोय हे बघू शकत असू तर आपण ज्या गोष्टीं बघण्यासाठी विरोध केला आहे अशा गोष्टी बघण्याचा त्याचा मोह कमी होईल. आजकाल मुले सतत ऑनलाइन राहतात, परंतु संगणक जर घरात अशा ठिकाणी असेल जिथे सर्वांचा वावर आहे तर ते कुटुंबाच्या संपर्कात राहू शकतात.

किशोरवयीन मुलांना ते तयार नसताना स्वतंत्र बनविण्यासाठी आग्रह धरू नका

स्वातंत्र व्यक्ती म्हणून तयार होण्याची प्रत्येक किशोरवयीनांची एक वेळ असते. खरे तर स्वातंत्र्यामध्ये इतरांशी जवळचे नातेसंबंध तयार होतात आणि त्यामध्ये बंडखोरीचा समावेश करण्याची कधीही आवश्यकता नसते. आपण त्याला स्वातंत्र्यासाठी ढकलत आहात हे आपल्या मुलासाठी निरोगी नाही - यामुळेच तो त्याच्या वयाच्या मित्रांवर जास्त अवलंबून राहू शकतो. त्याच्या वेळाचा आदर करा.

करार करा आणि आपल्या मुलाला दुरुस्ती करण्यास शिकवा.

जर आपण आपल्या मुलास शिक्षा न देता वाढविले असेल तर नक्कीच त्याची जवळीक तुमच्याशी जास्त असेल. कारण त्यामुळे तो तुमच्यामधील विश्वासला धक्का पोहोचवू इच्छित नाही, तो तुमच्याशी खोटे बोलणार नाही आणि तो सहसा तुमच्या मर्यादेचे उल्लंघन करणार नाही. जर त्याने तसे केले तर तो ते कसे सुधारणार तुमचा विश्वास कसा परत मिळवणार हे त्याला विचारा.

जर आपण आपल्या मुलास शिक्षा देवून वाढवले असेल, आणि आता आपले नियम पाळत नसेल आणि आपल्याशी खोटे बोलत असेल तर?

जबाबदारी घ्यायला शिकण्यासाठी कधीही उशीर होत नाही परंतु सुरवात करताना त्यांना तुमच्या नात्याला किमत द्यायला हवी. याचा अर्थ असा की आपल्याला त्यांना शिक्षा देणे थांबवावे लागेल आणि त्यांचे ऐकून घेणे त्यांच्याशी जोडून घेण्यास प्रारंभ करणे आवश्यक आहे. बिघडलेल्या गोष्टी सुधारण्यासाठी मार्ग निघू शकतात असा आग्रह धरणे आवश्यक आहे. हे एक अवघड नृत्य करण्यासारखे आहे, कारण शिक्षेमुळे परिस्थिती आणखीनच वाईट होईल, म्हणूनच तिला सुधारण्याची निवड करावी लागेल – असा आग्रह करत आहात. ही शिक्षा नाही - जेव्हा ती गोंधळ करते तेव्हा गोष्टी अधिक चांगले करण्याचा तिच्यासाठी हा एक मार्ग आहे, जे सर्व प्रौढांना करायला शिकण्याची आवश्यकता आहे. परंतु जेव्हा ती आपल्याला संतुष्ट करू इच्छित असेल तेव्हाच तिला हे समजेल, म्हणून जर आपणास संबंध निर्माण करण्यासाठी एकत्र समुपदेशनावर जाण्याची आवश्यकता असेल तर अजिबात संकोच करू नका.

जगात कुठेही असतील तरी त्यांच्या संपर्कात रहा

आपण जर मुलं आपल्यावर अवलंबून आहेत हे स्वीकारले आणि त्यांचा स्वतंत्रपणे होणारा विकास मान्य केले तर ते आपल्या संपर्कात राहतील जरी ते मित्रांच्या प्रभावा खाली असली, कॉलेजला असली आणि स्वताला आवडणार्‍या गोष्टी केल्या.

किशोरवयीन मुलांनी पालकांपेक्षा आपल्या मित्रांसह अधिक वेळ घालवावा हे योग्य आहे, परंतु कुटुंबात चांगले वातावरण असणारी मुले पालकांनी संपर्कात राहण्याच्या केलेल्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद देतात. आणि ज्या पालकांनी मुलांबरोबर चांगले नातेसंबंध तयार केले असतील त्यांना मुलांबरोबर संपर्कात राहण्यासाठी फायदा होतो.

किशोरवयीन मुलांमध्ये पालकांनी आपल्या मुलांची भावनिक आणि नैतिक स्थिती समतोल ठेवणे हे अत्यंत कठीण आहे. मुले कौटुंबा बाहेर जिव्हाळ्याचे नातेसंबंध निर्माण करण्यासाठी प्रयोग करतात, परंतु यशस्वीरित्या ते करणे हे घरातील नातेसंबंधांवर अवलंबून असते. याचा अर्थ असा की 14 वर्षांचा मुलाला जे घरात मिळत नाही ते तो बाहेर मिळविण्याचा प्रयत्न करत असतो.

आपल्या स्वतःवर अवलंबून राहण्यासाठी भावनिकदृष्ट्या तयार होईपर्यंत आपल्या मुलांना भावनिक दृष्ट्या आपल्यावर अवलंबून राहण्यासाठी सांगितले पाहिजे. बर्‍याचदा, आपल्या संस्कृतीत, आपण किशोरांना कुटुंबा बाहेरील लोकांवर अवलंबून ठेवतो ज्यामुळे विपरीत परिणाम होतो. किशोरवयीन लोक अनेकदा स्वत: ला जवळीक मिळवण्याच्या प्रयत्नात राहतात आणि इतर त्यांच्या वयाची मुलं ह्या गोष्टी देण्यासाठी सक्षम नसतता

आजकाल तुम्ही तुमच्या किशोरांच्या जवळच्या व्यक्तींच्या यादीत सर्वात वर नसाल, पण तेथे राहण्यासाठी प्रयत्न करा, तुमचं मुलं तुम्हाला लांब लोटू शकेल हे लक्षात ठेवा. खराब झालेल्या नातेसंबंधाचे लक्षण आहे. हार मानू नका. नाते दुरुस्त करण्याचे प्रयत्न करा.

संबंधित लेख

मुले दिवसातील बराच वेळ शाळेत घालवतात. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. गैरवर्तन आणि...

मराठी
Search