सुपरहिरो हे गोष्टीत अथवा सिनेमा मध्ये छान वाटतात पण खऱ्या आयुष्यात आपण एवढे ताकदवान नसतो. आपण सगळेच जगण्याच्या रोजच्या धावपळीत थकतो किंवा काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर भावनेच्या ओझ्याखाली दबले जातो. आपले मन भरून येते.जर ह्या सगळ्या गोष्टींचे प्रमाण जास्तअसेल आणि तुम्ही ह्या सगळ्याचा सामना करायला कमी पडत आहात असे तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही मदतीसाठी हाक दिली पाहिजे. तुम्हाला मानसोपचारतज्ज्ञ किंवा समुपदेशकाच्या मदतीची गरज आहे की नाही हे ठरवता यावे यासाठी पुढे काही महत्वाची लक्षणे दिली आहेत.
महत्वाची / धोक्याची लक्षणे
ही लक्षणे आढळल्यास तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या परिवारासाठी तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. या स्वरुपाच्या त्रासाबद्दल कुटुंबातील सदस्यांनी व मित्रांनी एकमेकांशी, डॉक्टरांशी व समुपदेशकांशी बोलणे नेहमीच फायद्याचे ठरू शकते. तुम्हाला खालील लक्षणे आणि स्वभावातल्या फरकावर लक्ष देणे आवश्यक आहे:
- शैक्षणिक कामगिरी अचानक खालावणे अथवा अभ्यासात लक्ष न लागणे.
- खूप प्रयत्न करूनही शालेय परीक्षेत कमी गुण मिळणे.
- गंभीर चिंता किंवा भीती किंवा शाळेत जाण्याची इच्छा नसणे. तणाव असणे आणि खेळात किंवा इतर कामांमध्ये भाग न घेणे.
- वारंवार शारीरिक तक्रारी (उदा. डोकेदुखी, अंगदुखी)
- झोप आणि / किंवा खाण्याच्या सवयींमध्ये बदल जाणवणे.
- शाळेत किंवा घरात लक्ष केंद्रित करण्यास अत्यंत त्रास जाणवणे.
- अनेक जणांशी लैंगिक संबंध ठेवणे.
- निरंतर, दीर्घकाळापर्यंत नकारात्मक मनःस्थिती आणि मनोवृत्ती दाखविणारे नैराश्य, त्यासोबत भूक न लागणे, झोप न येणे व प्रसंगी आत्महत्त्येचे विचार येणे अशी गंभीर लक्षणे.
- मनःस्थितीत होणारे तीव्र बदल
- शाळेत अथवा लोकांमध्ये मिसळताना तीव्र चिंता अथवा भीती वाटणे.
- जेव्हा ताणतणाव किंवा परिस्थितीशी सामना करणे कठीण असते तेव्हा वारंवार मद्यपान करणे आणि / किंवा ड्रग्ज / तंबाखू / गुटका ह्या व्यसनांच्या आहारी जाणे.
तुम्ही काय करू शकता?
तुम्ही एकटे नाही!
- संवाद साधा: आपल्याला वारंवार त्रासदायक विचार किंवालक्षणे जाणवत असल्यासआपण त्वरित एखाद्या समुपदेशकाशी संपर्क साधणे आवश्यक आहे किंवा तुम्ही कुटुंबातील एखाद्या विश्वासू सदस्याशी, मित्राशी किंवा सहकार्याशी तुमच्या त्रासाबद्दल संवाद साधा. आर्थिक कारणांमुळेकिंवा मदत घेताना येणाऱ्या खर्चामुळे आपणास अडचणी असतील तरआपण आपल्या शहरातील अथवा राष्ट्रीय हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकतो. या हेल्पलाइन बर्याचदा विना शुल्क असतात आणिआपले विचार कसे स्थिर करावे यावर आपल्याला त्वरित मार्गदर्शन मिळू शकते.
- ध्यानात घ्या की हा पण एक आजारच आहे: हे समजून घ्या की मानसिकआजार देखील आपल्या इतरआजारांप्रमाणेचआहेत आणि त्यामुळे स्वत: ला वेगळं करण्याची किंवा त्याची लाज वाटण्याची गरज नाही. त्याऐवजी, आपण आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. हे समजून घ्या आणि ह्या आजारावर तत्परतेने उपचार घ्या.
आजारातून बरे होण्याचा काळ: खरं सांगायचे तर मानासिक आजारातून बरे होणे ही काही एका फटक्यात होणारी गोष्ट नाही, ह्यासाठी तुम्ही स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे, स्वतःबद्दल सहानुभूती दाखवणे, शारीरिकआणि मानसिक व्यायाम या दोन्ही गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनविणे गरजेचे आहे आणि आपल्याला त्रास देणाऱ्या विचारांशी लढता आले पाहिजे. ह्या सगळ्याला थोडा वेळ लागू शकतो पण तुम्ही तेवढे महत्वाचे नक्कीच आहात.
आत्महत्त्येचा धोका
आपल्याला मानसिक आजार आहे याचा बऱ्याच वेळा लोकांना अंदाजही येत नाही. काहीतरी चुकतय हे कळत असते पण त्यावर काय उपाय आहेत ह्याची जाणीव नसते. जगभरात अंदाजे ८,००,००० लोक दरवर्षी आत्महत्त्या करून आपले जीवन गमावतात म्हणजे अंदाजे ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्त्येमुळे आपला जीव गमावते . १५ ते २९ वयोगटातील तरुणांमध्ये मृत्यूचे मुख्य कारण म्हणजे आत्महत्त्या आहे.
जेव्हा समस्या खूप वाढतात, परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा सर्वात खंबीर व्यक्तीसुद्धा आत्महत्त्येचा विचार करतात. तरीही आत्महत्त्या हे काही त्या परिस्थितीवरील उत्तरअसू शकत नाही. आपण किंवा आपण ओळखत असलेल्या एखाद्याला आत्महत्त्येचा धोका आहे की काय हे कसे ओळखावे? अशा व्यक्तीमध्ये दैनंदिन कामकाजाची आवड कमी होणे, मनःस्थितीचे हेलकावे, वागण्यात अचानक बदल होणे, भूक आणि झोपेच्या पद्धतीत बदल अशी सामान्य लक्षणे आढळतात. एखाद्याच्या मनात असे टोकाचे विचार का निर्माण होतात हे समजणे फार कठीण आहे आणि त्यामुळे हे समजून घेणाऱ्या व्यक्तीलाही फार त्रास, निराशा येऊ शकते आणि ह्या त्रासामुळे त्या व्यक्तीमध्ये अनावश्यक भिती, चिंता, चिडचिडेपणा, मानसिक धक्का अशी लक्षणे दिसू शकतात. ते आत्महत्येचा विचार करू शकतात.
आत्महत्त्येसंदर्भात पुढील लक्षणे आढळल्यास त्वरित मदतीसाठी संपर्क साधा:
स्वत: ला दुखापत करण्याची किंवा आत्महत्त्येची धमकी देणे.
परिस्थितीमध्ये अडकल्याची व कोणताही मार्ग नसल्याची भावना निर्माण होणे.
आत्महत्त्येचे मार्ग शोधणे.
दारू व अमली पदार्थांचा गैरवापर करणे.
स्वत: ला इजा करण्यासाठी विषारीऔषधे, हत्त्यारे मिळविण्याचा प्रयत्न करणे.
मित्र किंवा परीवारापासून अलिप्त रहाणे.
मृत्यू, मरण किंवाआत्महत्त्या याबद्दल बोलणे किंवा लिहिणे.
वागणुकीत नाट्यमय बदल होत रहाणे.
रोजच्या जीवनात उमेद न वाटणे.
जगण्याचे कोणतेही कारण नाही, जीवनात हेतू नाही असे वाटणे.
अनियंत्रित राग किंवा बदला घेण्याची भावना निर्माण होणे.
खूप जास्त किंवा खूप कमी झोप येणे.
बेपर्वा वागणे, धोकादायक व जीवघेण्या गोष्टीमध्ये स्वतःला गुंतवणे.
संन्यासी वृत्ती दाखवणे.
Screening Tool:
If you are stressed or experiencing distress, fill up the scale using the Link:
https://ogg.osu.edu/media/documents/MB%20Stream/who5.pdf
For the well-being scale, a raw score below 13 indicates poor well-being and is an indication for further evaluation for depression/ anxiety. Please reach out to a counsellor/psychiatrist for help.
Helplines for Psychological Distress
- KIRAN – 24×7 Mental Health Helpline by Government
Based in: Pan-India
Provides/Offers: First stage advice, counselling, and references
Availability: 24/7
Helpline Contact: 1800-599-0019
- The Health Collective India
Provides/Offers: City-wise lists of Distress/Suicide Prevention Helplines & Stress-Related Helplines
- iCall – Psychosocial Helpline by Tata Institute of Social Sciences (TISS)
Based in: Pan-India
Provides/Offers: Professional and free counseling over phone, email, or chat
Availability: Monday-Saturday, 8 am to 10 pm
Helpline Contact: 022-25521111
Email Address: icall@tiss.edu
- आसरा –
Based in: Mumbai
Provides/Offers: Free helpline for people in crisis
Availability: 24/7
Helpline Contact: +91 98204 66726
- Cooj
Based in: Goa
Helpline Contact: +91 98225 62522
Email Address: coojtrust@yahoo.co.in
- Samaritans Mumbai
Based in:Mumbai
Provides/Offers: Emotional support for stress, distress, depression, or suicidal thoughts
Helpline Contact: +91 84229 84528, +91 84229 84529, +91 84229 84530
Email Address: talk2samaritans@gmail.com
- स्नेहा फाउंडेशन इंडिया
Based in: Chennai
Provides/Offers: Suicide prevention
Availability: 10 am to 4 pm (all days)
Helpline Contact: +91 44 2464 0050, +91 44 2464 0060
Email Address: help@snehaindia.org
- Parivarthan Counselling, Training & Research Centre
Based in: Bangalore
Provides/Offers: Counselling helpline
Availability: Monday to Friday, 1 pm to 10 pm
Helpline Contact: +917676602602
- Connecting NGO
Based in:Pune
Provides/Offers: Non-judgemental listening service and helpline
Availability: Every day, 12 pm to 8 pm
Helpline Contact: +919922004305, +919922001122
Email Address: distressmailsconnecting@gmail.com
- National Toll-free Drug De-addiction Helpline
Based in: Pan-India
Provides/Offers: Drug de-addiction support
Helpline Contact: 1800-1100-031