Search

किशोरवयीनांना दुखं हाताळण्यासाठी मदत करणे

पालक व प्रौढ हे किशोरवयीन मुलांना शोकाकुल परिस्थिती मध्ये ऐकणे व शिकणे या प्रक्रियेत सोबत करू शकतात आणि किशोरांना शिक्षकाची भूमिका बजवू देणे. 

शोक करण्याचे कोणतेही "बरोबर" आणि "चुकीचे" मार्ग नाहीत. काहीवेळा प्रौढ लोक “बरोबर” किंवा “चुकीचे” दु: ख व्यक्त करण्याचे मार्ग यावर तीव्र मते व्यक्त करतात

दुखं हा आयुष्याचा टाळू न शकणारा भाग आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे . आपण काहीही केले तरी दुख आपल्या वाट्याला येतेच. जवळच्या व्यक्तिला गमावल्या नंतर दुखं होण नैसर्गिक असले तरी आपल्याकडे शोक व्यक्त करण्याच्या प्रक्रियेबद्दल निराशावादी दृष्टीकोण आहे. कित्येकांना तरुण वयात असे शिकवले जाते की “नकारात्मक” भावना व्यक्त करणे चुकीचे आहे, ज्यामुळे शोकाची प्रक्रिया अधिक कठीण होते. बर्‍याच जणांना, किशोरवयीनतेमध्ये प्रथम दु: खाचा अनुभव येतो जेव्हा त्यांची सामना करण्याची कौशल्ये विकसित होत असतात, विशेषत: १ ते १८ या वयोगटामध्ये. आयुष्याच्या या टप्प्यात, जेव्हा शारीरिक व मानसिक वाढ होत असते. असे दुखद प्रसंगामुळे स्वतः ची ओळख व स्वतः चा शोध घेणे अवघड होते.

किशोरवयीनांचे मृत्यू कडे बघण्याचे व हाताळण्याचे मार्ग

जेव्हा माझ्या पालकांनी माझा भाऊ व मला सांगितले की आमचा पाळीव प्राणी टॉमीचे अचानक निधन झाले आहे, तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया मी गुडघे टेकले व रडायला लागलो. तेव्हा मी १६ वर्षाचा होतो व मला दुखं कसे हाताळावे याचा अनुभव होता. पण हे दुखं वेगळे होते. माझ्या पाळीव प्राण्याबरोबर माझी जवळीक होती आणि त्याचा मृत्यू अनपेक्षित होता.

एकाच वेळी माझ्या मनात प्रचंड उदासीनता, गोंधळ, धक्का, अविश्वास आणि क्रोधाची एक लाट मनात निर्माण झाली होती, परंतु मी फक्त एक गोष्ट करू शकत होतो ती म्हणजे रडणे. आणि मी खूप रडलो.

  • किशोरवयीन मुलांचा दुखद घटनांकडे बघण्याचा दृष्टीकोण व हाताळण्याची पद्धत वेगवेगळी असते. शोक हाताळण्यासाठी कोणतीही साचेबंद पद्धत नाही. आपण सर्वजण आपल्या आयुष्या मध्ये वेगवेगळ्या दुखद घटनांना सामोरे जात असतो परंतु पौगंडावस्था सामान्यत: एक टप्पा असतो जेव्हा आपण प्रथम नुकसान सहन करतो.
  • किशोरांना परिस्थितीची जाणीव असते, परंतु त्यांना कसे तोंड द्यावे हे माहित नसते. बर्‍याच पौगंडावस्थेतील मुलांना मृत्यूची संकल्पना समजून घेण्याची प्रौढ समज असते परंतु त्यामध्ये अनुभव, सामना करण्याची कौशल्ये किंवा प्रौढ व्यक्तीचे वर्तन नसते. अशा स्वरुपाच्या तीव्र दुखाच्या भावनांचा सामना करण्याचा अनुभव नसतो, त्यामुळे बरेच जणांना स्वतःची काळजी कशी घ्यावी हे कळत नाही. 
  • पालक, कुटुंब आणि काळजीवाहकांनी किशोरवयीन मुलांसाठी त्यांना वाटत असलेल्या दुखाच्या भावनांची तीव्रता सामान्य करणे महत्वाचे आहे.

आपल्या किशोरवयीन मुलांना मदत करण्यासाठी विशेष लक्ष देणे आणि काळजीपूर्वक पावले उचलणे महत्वाचे आहे:

  • काही जन निष्काळजीपणे किंवा बेपर्वा वागू शकतात. रागाच्या भरात वागणे हे ज्या किशोरांनामध्ये योग्य वागण्याची कौशल्ये नसतात त्यांच्या मध्ये दिसते. जास्त करून हा राग घरातील व्यक्ती किंवा समवयस्क मित्र यांच्यावर व्यक्त होतो. काही मुलं अती आवेगपूर्ण किंवा अविवेकी वागतात जसे की, मादक पदार्थांचे सेवन, शाळेमध्ये भांडणं आणि अधिक व्यक्तींबरोबर लैंगिक संबंध.

किशोरवयामध्ये वेगवेगळे बदल होत असतात यामध्ये जर पालक, भावंड, मित्र किंवा इतर जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्यास त्याचा खूप मोठा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतो. जर त्याकडे दुर्लक्ष केले तर किशोरवयीन बहुतेकदा प्रौढांचे लक्ष वेधण्यासाठी इतर मार्ग शोधतात, जरी त्यामुळे स्वतःचे किंवा इतरांचे नुकसान होणार असले. किशोरवयीन मुलं जरी चांगली दिसत असली तरी त्यांच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

  • त्यांच्या बरोबर वास्तविक संवाद होणे खूप गरजेचे आहे. ते जर कृती करत असतील तर तुम्हाला हे त्यांना योग्य भाषेत सांगता आले पाहिजे की हे कशामुळे होत आहे हे तुम्हाला माहीत आहे, ते असे वागू शकत नाहीत परंतु काही कारणांमुळे त्यांच्या कडून असे घडत आहे हे तुम्ही समजू शकता. प्रौढ लोकांना सुद्धा यातून जावे लागते याची आठवण करून द्या- परंतु हे योग्य नाही. 

त्याऐवजी त्यांच्याबरोबर दररोज बोलण्यासाठी वेळ काढा अगदी लहान संवाद सुद्धा महत्वाचा आहे, प्रिय व्यक्तींन बद्दल, त्यांना काय वाटते आणि व्यक्ती किंवा प्राणी ज्याचा मृत्यू झाला आहे त्यांच्या काही आठवणी त्यांनी आपल्या आयुष्यावर किंवा जीवनावर सकारात्मक मार्गाने कसा प्रभाव पाडला याविषयी किंवा अलीकडील घटनेने त्यांची कशी आठवण करून दिली.

  • बर्‍याच भावना येऊ शकतात. काही किशोरवयीन हे प्रौढांसारखे त्यांच्या भावना व्यक्त करू शकतात तर काहींना त्या व्यक्त करताना अडचणी येतात. काही किशोरवयीन हे त्यांच्या भावना लपवू शकतात पण त्याचा पुढील काळात वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.
  • किशोरांना मित्रांचा पाठिंबा नसेल तर जवळची व्यक्ती गेलेल्याचे दुख पचविणे खूप अवघड होऊ शकते.काही किशोरवयीन त्याच्यावरती बोलणे टाळतात, तर काहींना झालेले नुकसानामुळे शांत राहणं दबावात्मक वाटते. प्रौढांनी मुलांना मनात येणार्‍या भावना बोलून दाखविल्या पाहिजेत हे समजावले सांगावे हा परिस्थितीला तोंड देण्याचा सगळ्यात चांगला मार्ग आहे, जेव्हा त्यांना मित्रांचा पाठिंबा नसेल.
  • अचानक झालेल्या मृत्यूचा अनुभव घेणार्‍या किशोरवयीन मुलांमध्ये अविश्वास व बधिरपणा येणं हे सामान्य आहे. कोणाचं आयुष्य किती आहे हे सांगणे अशक्य आहे आणि कोणी अमर होऊन जन्माला आलेले नाही, हे जरी माहीत असले तरी अचानक झालेल्या मृत्यूला सामोरे जाणे अधिक त्रासदायक असते.
  • हे देखील लक्षात घेणे महत्वाचे आहे की गेलेल्या व्यक्तीचे किशोरवयीनच्या आयुष्यातील महत्व यानुसार निर्माण होणार्‍या भावना ह्या वेगवेगळ्या असतात. उदा. जवळच्या मित्राने आत्महत्या केल्यामुळे किशोरवयीना कदाचित उदास आणि दिवसभर झोपावेसे वाटू शकते. दुसरीकडे शिक्षकाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांना वाईट वाटेल परंतु बाकी इतर गोष्टींवर परिणाम होणार नाही.
  • शोकास्पद परिस्थितीमध्ये किशोरांना त्यांच्या विश्वासाबद्दल प्रश्न पडू शकतात किंवा त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलू शकतो. मी खोटे बोलणार नाही, टॉमीला गमावल्यानंतर मला देवाचा खूप राग आला होता. माझ्या कुटूंबासाठी महत्वाच्या असणार्‍या जीवाला का आमच्या पासून दूर केलं? हा प्रश्न मी तो गेल्यानंतर कित्येक महिने विचारला. पण मला लवकरच कळले की रागावणे ठीक आहे. जीवनाच्या अर्थाबद्दल आश्चर्यचकित होणे ठीक आहे. आपल्याला असणार्‍या अमरत्वाच्या ज्ञानास व विश्वासास आव्हान दिले पाहिजे हे ठीक आहे.
  • एक प्रौढ म्हणून, जीवनाच्या बाबतीत मुक्त चर्चा करण्यास परवानगी द्या.जर आपण धार्मिक असल्यास त्यांच्या विश्वासाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार राहा. आपण धार्मिक नसल्यास “जीवनाचा अर्थ काय आहे?” यासारख्या तात्विक प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार राहा.
  • काही किशोरांना प्रिय व्यक्ती गमावल्यानंतर स्वत:ला समजणे कठीण होऊ शकते. उदाहरणार्थ, एखादे भावंड गेल्यामुळे किशोरवयीन व्यक्तीला आपण कमी महत्वाचे आहे असे वाटू शकते. या परिस्थितीत, किशोरांना त्यांच्या दु: खामध्ये एकटे वाटत असल्यास त्यांना त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले आहे असे वाटू शकते. जर आपण पालक असाल तर आपल्या दु: खाच्या प्रक्रियेत किशोरवयीन मुलांना सहभागी करून घ्या ज्यामुळे त्यांना सुरक्षित, आपलं कोणी तरी ऐकते आणि आपलं कुटुंब मजबूत आहे असे वाटेल- अशा कठीण काळात सुद्धा.
  • ते पटकन शिकणारे नसतील. किशोरवयीनांची स्वतंत्र असण्याची गरज ही पालकां पेक्षा वेगळी असल्यामुळे कुटुंबातील प्रौढ सदस्यांकडून मिळणारा पाठिंबा ते पटकन घेणार नाहीत. काहीजणांना असे वाटते की मोठं होणे म्हणजे कमी असुरक्षित असणं होय. जरी त्यांना या दुखद प्रसंगाला सामोरे जाण्याबद्दल आशा वाटत नसली तरी त्यांच्या पालकांपासून स्वतंत्र होण्याच्या तीव्र इच्छेमुळे, किशोरवयीन मुलं नेहमीच असे म्हणतात की ठीक आहे, बरा आहे. जर किशोरवयीन मुलांनी त्यांचे पालक या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करीत आहेत असे पहिले तर त्यांना काळजी वाटू शकते ज्याच्यामुळे मोठ्यां सारखी भूमिका पार पाडण्याचा दबाव त्यांच्यावर येऊ शकतो. जरी आपन स्वत:च्या वेगळ्या मार्गाने दु: ख व्यक्त करणे योग्य आहे, तरीही स्वत: ची काळजी घेताना मुलाची काळजी घेणे ही प्रौढ व्यक्तीचीही जबाबदारी आहे.
  • स्वत: ची काळजी घेणे महत्वाचे आहे आणि बरेच किशोरवयीन आता हे शिकत आहेत. अशा वेळी स्वतःची काळजी घेणे किती महत्वाचे आहे हे आपण स्वत: च्या काळजी घेण्याच्या कृतीतून, याची उदाहरणे देऊन सांगू शकतो. याव्यतिरिक्त, एकत्रितपणे स्वत: ची काळजी घेण्याची कृती करण्याचा विचार करा. प्रौढ व्यक्तींनी किशोरवयीनांना हे जाणवून दिले पाहिजे की आयुष्यात त्यांच्यावर अशी वेळ येवू शकते जेव्हा त्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी दुसर्‍या कोणावर तरी अवलंबून राहावे लागेल. आणि ते अगदी ठीक आहे.
  • ते कुटुंबातून बाजूला जाऊ शकतात. किशोरांना कदाचित असेही वाटेल की मित्रांसोबत जास्त वेळ घालवणे किंवा कुटुंबापासून स्वत: ला दूर ठेवणे हा झालेल्या नुकसानीतून बाहेर पडण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे.

हायस्कूलमध्ये असताना राज नावाच्या माझ्या मित्राने आत्महत्या केली होती. काही दिवस अविश्वासात राहिल्यानंतर, माझे मित्रदेखील माझा आधार गट बनले कारण त्यांनीही नुकसान सहन केले होते. पालकांशी बोलावे असे मला वाटले नाही जरी त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले होते.

मुद्दा असा आहे की, कुटुंबापासून दूर जाणे आणि मित्रांसमवेत जास्त वेळ घालवणे ही दु:खात असताना करण्याची एक सामान्य गोष्ट आहे. 

किशोरांना दुःखाला सामोरे जाण्यासाठीचे मार्ग

  • प्रत्येकजण पौगंडावस्थेतून जातो, प्रत्येकजण वेगळा असतो, तरीही काहीवेळा पौगंडावस्थेमध्ये यशस्वी लढा देण्यासाठी कशी मदत करावी हे जाणून घेणे कठीण असते. प्रौढांप्रमाणेच किशोर देखील एकमेकांपेक्षा भिन्न असतात आणि त्यांचे सामोरे जाण्याचे मार्ग हे वेगवेगळे असतात. काहीजण स्वत: ला आराम देण्यासाठी ओरडतात तर काही जण शांत राहून किंवा विनोदाने सामोरे जातात.
  • किशोरांना कशामुळे चांगले वाटते हे आपण शोधायला हवे. जर तो मृत व्यक्तीचा आवडता चित्रपट पुन्हा पुन्हा पाहत असेल तर तो चित्रपट पुन्हा पुन्हा पहाणे चांगले आहे. किशोरांना नुकसान सहन करण्यास मदत करण्याचे बरेच मार्ग आहेत; आपणास कोणता मार्ग सर्वात प्रभावी आहे हे शोधून काढावे लागेल.
  • त्यांच्या जीवनात सर्वसामान्य परिषतीती कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. किशोरवयीनांना विधी, सण आणि दैनंदिन नित्यक्रम चालू ठवावे असे वाटते. जर पौगंडावस्थेतील मुलं तुमचे मूल नसून तुमच्या मुलाचा मित्र असेल तर त्याला रात्रीचे जेवण करण्यासाठी किंवा रात्री रहाण्यासाठी बोलवत रहा. नेहमीच्या गोष्टी करत राहिल्यामुळे किशोरवयीन मुलांना सामान्य वाटते. शोक करणार्‍या किशोरवयीन मुलांना “विशेष वागणूक” दिल्याने त्यांना जास्त ताण येतो, आपण कुटुंबाचाच भाग आहोत असे न वाटता बाहेरील कोणीतरी असल्यासारखे वाटते
  • त्यांना जास्त ताण येतो, आपण कुटुंबाचाच भाग आहोत असे न वाटता बाहेरील कोणीतरी असल्यासारखे वाटते मोठ्यांचे अनुसरण केले जाते. जरी मृत व्यक्ती ही मित्र किंवा कुटुंबातील सदस्य असले तरी दुखाच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या सोबत असणे महत्वाचे आहे. त्यांना शोकाच्या प्रक्रियेविषयी निर्देशित करू नका. त्याऐवजी, तुम्ही त्यांच्या सोबत रहा. दिग्दर्शक होण्यापेक्षा सोबती होणे अधिक प्रभावी आहे कारण किशोरांना हे जाणवते की ज्याप्रमाणे भावना येत आहेत त्या येणं ठीक आहे. सगळ्यात चांगले म्हणजे किशोरांना दुखद स्थिती हाताळण्यासाठी वेळ देणं.
  • त्यांना मित्रांसह वेळ घालवू द्या. बरेच किशोरवयीन मुले त्यांच्या मित्रांना भावना व्यक्त करण्याचा मार्ग म्हणून वापरतात. किशोरवयीन मुलांमध्ये हे आश्चर्यकारकपणे सामान्य आहे कारण ते पालकांवर अवलंबून न राहता स्वतंत्र होण्याच्या टप्प्यावर आहेत. याव्यतिरिक्त, मित्रांसमवेत वेळ घालवल्यामुळे शोक झालेल्या किशोरांना दररोजचे वेळापत्रक सुरळीत ठेवण्यासाठी मदत होते ज्यामुळे त्यांचे मार्क स्थिर राहू शकतात व मन शांत राहील.
  • दुसरीकडे, अधिक कौटुंबिक- किशोरवयीनांना मित्रांसोबत बाहेर जाण्याऐवजी कुटुंबासमवेत वेळ घालवणे आवडते. लक्षात ठेवा- प्रत्येकजण वेगळा आहे. काही किशोरवयीन मित्रांच्याबरोबर साहय देणार्‍य गटाचा आनंद घेतात. जर अशी स्थिती असेल तर मित्रांच्या ग्रुपला सहाय्य गटाकडे नेण्यासारख्या सोप्या कृती किशोरवयीन मुलांना आपण त्यांच्यासाठी असल्याचे दर्शविते आणि आपण त्यांना पाठिंबा देतोय हे दिसते.
  • प्रामाणिक रहा परंतु भाषेबाबत सावधगिरी बाळगा 

“तू या गोष्टीतून कधी बाहेर पडणार आहेस?” असे किशोर दु: खी नसतानाही विचारणे कदाचित चांगला प्रश्न नाही. खरं तर, हा प्रश्न कोणालाही विचारणे टाळायला हवे. हे असभ्य आहे आणि असे दर्शविते की आपल्याला शोकाचा प्रवास किंवा प्रक्रिया मुळीच समजत नाही. सर्वात वाईट म्हणजे, आपण ज्याला ते विचारता त्यास खरोखर ते इजा करु शकते. 

शोकाच्या प्रक्रियेदरम्यान, किशोरवयीन मुलाला ते कसे करीत आहेत हे विचारणे किंवा त्यांना झालेल्या नुकसानाबद्दल बोलायला आवडेल का असे विचारणे हा एक चांगला मार्ग आहे. तरीही - जास्त करू नका. दिवसातून दहा वेळा ते ठीक आहेत का असे विचारून त्यांच्या मनात चिड निर्माण होईल. जेव्हा जेव्हा ते तुमच्याशी बोलू इच्छित असतील तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध आहात हे समजावून सांगा. त्यांच्यावर लक्ष ठेवणे आणि सतत प्रश्न विचारणे हे त्यांना तुमच्या पासून दूर करेल.

  • पालक कर्करोगाने ग्रस्त आहेत असे समजल्यानंतर मृत्यू होणार आहे हे माहीत असताना त्यांना सत्या पासून दूर ठेऊ नका, ते शोधून काढतीलच. म्हणूनच परिस्थिति लपविण्या पेक्षा त्यांना प्रामाणिकपणे सांगणे महत्वाचे आहे.
  • प्रियजनांचा सन्मान करायला हवा अशा कल्पनांसाठी मोकळे रहा. मोकळे रहा आणि किशोरांना त्यांच्याच प्रकारे प्रिय व्यक्तीचा सन्मान करण्याची परवानगी द्या.

मदत कधी मिळवायची.

जर एखादा किशोर तुमच्याकडे मदतीसाठी विचारत असेल तर तुम्ही प्रथम त्यांना मिठी मारा आणि तुम्हाला त्यांचा अभिमान आहे हे सांगा. यामागचे कारण सोपे आहे - बर्‍याच लोकांना, विशेषतः किशोरवयीन लोकांना, त्यांना मदतीची आवश्यकता आहे हे कबूल करण्यास आवडत नाही.

सहाय्य गट हे शोकाच्या प्रकियेशी संघर्ष करणार्‍या किशोरांसाठी उत्कृष्ट पर्याय आहेत. हे गट किशोरवयीनांना ते एकटे नसल्याचे दाखवतात. याव्यतिरिक्त, सहाय्यक गट एखाद्या प्रिय व्यक्तीला हरवल्यानंतर आलेला तान आणि इतर अनेक भावना कमी करण्यास मदत करतात.

मादक पदार्थाचा गैरवापर हे व्यावसायिक मदतीची आवश्यकता आहे हे दर्शविते. दीर्घकालीन अस्वस्थता किंवा झोप, भूक आणि काम करण्याची प्रेरणा यामध्ये बदल होणे हे देखील किशोरवयीन शोक करण्याच्या प्रक्रियेमध्ये संघर्ष करत आहे हे दर्शवितो.

किशोरांनी आत्महत्या करण्याबद्दल किंवा स्वत: ला हानी पोहचवण्याबद्दल बोलल्यास त्यांसाठी त्वरित व्यावसायिक मदत घ्यावी. 

हे लक्षात ठेवले पाहिजे की दु: खाची प्रक्रिया कधीही संपत नाही.

संबंधित लेख

मुले दिवसातील बराच वेळ शाळेत घालवतात. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. गैरवर्तन आणि...

मराठी
Search