Search

लिंगभाव ओळख

लिंग, लिंगभाव आणि लैंगिकता या गुंतागुंतीच्या संकल्पना आहेत - त्या समजून घेणे हे काळे आणि पांढरे वेगळे ओळखता येण्याइतके सहज आहे असे काही लोकांना वाटते परंतु तसे ते नाही. 

एक महत्त्वाची गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवायला हवी ती अशी की, एखाद्या व्यक्तीचा लैंगिक कल काय आहे यावरून आपण त्या व्यक्तीविषयीचे मत बनवणे योग्य नाही. 

तुम्ही 'तुम्ही' आहात आणि ते छान आहे.

खालील जेंडर युनिकॉर्नचे चित्रा नीट बघा.

तुम्हाला तुम्ही एक पुरुष आहात असे वाटते? स्त्री आहात असे वाटते ? की इतर काही आहात असे वाटते? तुमची ही भावना हा तुमचा लिंगभाव आहे.आणि कदाचित थोडेसे दुसरे काहीतरी आहात असेही वाटू शकते किंवा आपण यापैकी कोणासारखे देखील नाही असेही तुम्हाला वाटू शकते. लिंगभावाचे रूप किंवा लिंगभाव अभिव्यक्ती : तुमच्या लिंगभावाबद्दल इतर लोकांना जे दिसते त्याला तुमचे लिंगभाव रूप म्हणतात.

इतर लोक तुमच्याकडे कोणत्या नजरेने बघतात? मर्दानी, स्त्रीलिंगी, दोघांसारखे थोडे थोडे, इतर काही किंवा कदाचित त्यांना काहीच अंदाज बांधता नाही -- असं तुमच्याविषयी इतरांना काय काय वाटते ? आपले कपडे, चालणे-बोलणे, वागणे किंवा आपल्या शरीराचा आकार यावर इतरांचे हे वाटणे अवलंबून असते. आपली लिंगभाव अभिव्यक्ती जसे की आपले केस, कपडे, सौंदर्यप्रसाधने यात आपण अधेमधे बादल करू शकतो.

जेव्हा तुम्ही जन्माला आलात, तेव्हा डॉक्टर किंवा दाईने तुमच्या शारीरिक वैशिष्ट्यांवर आधारित लिंग तुम्हाला नियुक्त केले. तुम्ही जसजसे मोठे होता तसतशी तुमची स्वत:च्या लिंगभावाची ओळख डॉक्टरने सांगितलेल्या लिंगापेक्षा वेगळी होऊ शकते. बहुतेक लोक जन्माला येतात तेव्हा त्यांना त्यांच्या बाह्य जननेंद्रियाच्या आधारावर'पुरुष' किंवा 'महिला' हे लिंग नियुक्त केले जाते. काही लोकांचे लिंग, लिंग गुणधर्म, गुणसूत्र किंवा हार्मोन्स थोडे संदिग्ध असतात तेव्हा समाज ज्याला पुरुष किंवा महिला म्हणतो त्या वर्गात ते बसत नाहीत, त्यांना 'इंटरसेक्स' (किंवा इतर काही) म्हणून वर्गीकृत केले जाते.

तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे शारीरिक किंवा लैंगिकरित्या आकर्षित होऊ शकता. त्याला आपण शारीरिक आकर्षण असे म्हणतो. वेगवेगळ्या घटकांमुळे आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल शारीरिक आकर्षण वाटू शकते. त्या व्यक्तीला जन्माच्यावेळी नियुक्त केलेले लिंग, त्या व्यक्तीची लिंगभाव ओळख किंवा लिंगभाव अभिव्यक्ती यापैकी कोणत्याही गोष्टीमुळे आपण एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतो.

भावनिक आकर्षण म्हणजे भावनिक किंवा रोमँटिकरित्या एखाद्याविषयी आकर्षण वाटणे. भावनिक आकर्षण विविध घटकांमधून येऊ शकते. या घटकांमध्ये एखाद्याची लिंगभाव ओळख, लिंगभाव अभिव्यक्ती किंवा जन्मावेळी त्यांना नियुक्त केलेले लिंग यांचा समावेश होतो.

अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्याला शारीरिक आणि भावनिक आकर्षण वाटू शकते. जसे की एखाद्याचे व्यक्तिमत्त्व किंवा आपल्यात व त्या व्यक्तीमध्ये असलेली साम्यस्थळे.

काही लोक त्यांच्याच लिंगाच्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतात. त्यांना आपण समलिंगी म्हणतो (गे आणि लेस्बियन). काही लोक भिन्नलिंगी लोकांकडे आकर्षित होऊ शकतात.

जन्मावेळी तुम्हाला दिलेले लिंग ही एक निश्चित श्रेणी असली तरी तुमची लिंगभाव ओळख आणि लिंग अभिव्यक्ती ही पुल्लिंगी/स्त्रीलिंगी आणि इतर लिंगी अशी प्रवाही आणि बदलणारी असू शकते. ट्रान्सजेंडर लोकांची लिंगभाव ओळख आहे ही त्यांना जन्मावेळी नियुक्त केलेल्या लिंगापेक्षा वेगळी असते.

आशा आहे की जेंडर युनिकॉर्न सारख्या गोष्टींमधून या बद्दलचा गोंधळ मनात असल्यास तो कमी होईल. फक्त लक्षात ठेवा की तुमची लिंग ओळख काय आहे, किंवा तुम्ही कोणाकडे आकर्षित होत आहात याने काही फरक पडत नाही. तुम्ही जसे आहात तसे चांगले आहात. आपण स्वतःला कोणतेही लेबल लावून घेण्याची गरज नाही. तुम्ही फक्त तुम्ही स्वतः आहात.

संबंधित लेख

मुले दिवसातील बराच वेळ शाळेत घालवतात. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. गैरवर्तन आणि...

मराठी
Search