Search

परिस्थितीचा सामना करताना (कोपिंग)

जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला सांगते की ती परिस्थितीला सामोरी जात आहे, तेव्हा आपण हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की कठीण परिस्थितीत ताण आणि तीव्र भावनांनाचे व्यवस्थापन करण्यासाठी उपयोगी पडणार्‍या कोणतेही वर्तन कोपिंग या सदरात मोडते आणि ते एक अत्यंत महत्त्वाचे जीवन कौशल्य आहे.

 सकारात्मक सामना?

सकारात्मक पद्धतीने परिस्थितीचा मुकाबला करण्याच्या रणनीतीमुळे दीर्घकालीन फायदा होतो. त्यामुळे वाढलेली लवचिकता आणि कल्याणाची भावना आपल्याला बराच काल उपयोगी पडते. तर मुकाबला करण्याची नकारात्मक रणनीती सहसा केवळ अल्पावधीसाठी समस्येवरून आपले लक्ष विचलित करते. उदाहरणार्थ, ड्रग्ज आणि अल्कोहोल वापरल्याने तुम्हाला येत असलेल्या कठीण भावनांपासून तुम्हाला काही काळ तात्पुरता आराम मिळू शकतो, परंतु या धोरणावर अवलंबून राहण्यामुळे पदार्थांवर अवलंबित्व निर्माण होऊन व्यसन लागू शकते. म्हणूनच आपले दीर्घकालीन कल्याण किंवा लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला सामना करण्याच्या सकारात्मक कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

लवचिक व्हा... स्वतःचा आपले सुपरहिरो व्हा!

कठीण परिस्थितीतून पुन्हा उठून उभे राहण्याची क्षमता म्हणजे लवचिकता किंवा सुपरपॉवर

तुमचे व्यक्तिमत्त्व लवचिक आहे असे केव्हा म्हणता येईल?
जेव्हा तुम्ही...

  • प्रतिकूल परिस्थितीचा सामना करता
  • त्यांच्या अनुभवातून शिकता
  • जीवनातील आव्हानांचा आत्मविश्वासाने सामना करता.

एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व लवचिक आहे की नाही हे ठरवण्यासाठी मानसशास्त्रज्ञांच्या मते पुढील काही घटक महत्त्वाचे आहेत.

  • सकारात्मक दृष्टिकोन
  • आशावाद
  • भावनांचे नियमन करण्याची क्षमता
  • अपयशाकडे शिकण्याची संधी मानणे

लवचिक व्यक्तिमत्त्वाची किशोरवयीन मुले पुढील परिस्थितीत त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असतात:

  • शारीरिक आजार
  • शाळा बदलणे
  • प्राथमिक शाळेतून हायस्कूलमध्ये प्रवेश
  • अभ्यास आणि परीक्षेचे व्यवस्थापन  
  • कौटुंबिक परिस्थितीतील बदल (वेगळे होणे आणि घटस्फोट)
  • मित्रांचे गट बदलणे
  • समवयीन मुलांसोबतची भांडणे.
  • कुटुंबाशी संघर्ष
  • नुकसान आणि दु: ख

सकारात्मक मुकाबला कौशल्यांचा सराव करून लवचिकता शिकवता येते. 

उपरोक्त प्रतिमा आणि मीम्स आपल्याला महामारीची आठवण देतात.

कोविड -१९ साथीचा आपल्या जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. या काळात तीव्र भावना आणि तणाव निर्माण करणार्‍या अभूतपूर्व आव्हानांना लहान थोर सर्वाच सामोरे गेले व पुन्हा कधीही तशी परिस्थिती ओढवू शकते ही जाणीव आपल्या मनात जागी आहे.

 कोविड -१९ चा प्रसार कमी करण्यासाठी शारीरिक अंतर राखणे आवश्यक आहे, परंतु त्यामुळे आपल्याला अलिप्त आणि एकटे वाटू शकते आणि आपल्यावरील तणाव आणि आपली चिंता वाढू शकते. सकारात्मक पद्धतीने तणाव व चिंतेवार मात करायला शिकल्यामुळे केवळ तुम्हीच नाही तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे व्यक्तिमत्त्व देखील अधिक लवचिक बनेल.

तणावामुळे खालीलपैकी कोणतीही किंवा सर्व लक्षणे उद्भवू शकतात:

  • भीती, राग, दुःख, चिंता, सुन्नपणा किंवा निराशा या भावना
  • भूक, ऊर्जा, इच्छा आणि आवडींमध्ये बदल
  • एकाग्रता आणि निर्णय घेण्यात अडचण
  • झोपण्यात अडचण किंवा दुःस्वप्न
  • शारीरिक प्रतिक्रिया, जसे की डोकेदुखी, शरीर दुखणे, पोट समस्या, आणि त्वचेवर पुरळ
  • दीर्घकालीन आरोग्य समस्या किंवा बिघाड
  • मानसिक आरोग्य स्थिती बिघडणे
  • तंबाखू, अल्कोहोल आणि इतर पदार्थांचा वाढता वापर

स्वतः बाबत जास्त कठोर होऊ नका. महामारी दरम्यान तणाव, चिंता, दुःख आणि चिंता वाटणे स्वाभाविक आहे हे ध्यानात ठेवा. खालील मार्ग वापरुन तुम्ही स्वतःच्या, इतरांच्या आणि तुमच्या आजूबाजूच्या समुदायाच्या तणावाचे व्यवस्थापन करू शकता.

तणावाचा सामना करण्याचे चांगले मार्ग (तणावाचा दुवा) 

  • माज माध्यमांवरील बातम्यांसकट बातम्या पाहणे, वाचणे किंवा ऐकणे यातून विश्रांती घ्या. माहिती देणे चांगले आहे, परंतु साथीच्या आजाराबद्दल सतत ऐकण्यातून अस्वस्थता वाढते. दिवसातून फक्त दोन वेळा बातम्या समजून घेण्याचा आणि फोन, टीव्ही, संगणकाच्या स्क्रीनवरून काही काळ दूर राहण्याचा विचार करा.
  • आपल्या शरीराची काळजी घ्या.
  • दीर्घ श्वास घ्या, शारेराला ताण द्या किंवा ध्यान करा.
  • निरोगी, संतुलित जेवण खाण्याचा प्रयत्न करा..
  • नियमित व्यायाम करा.
  • भरपूर झोप घ्या.
  • जास्त मद्य, तंबाखू आणि इतर अमली पदार्थांचा वापर टाळा..
  • नियमित प्रतिबंधात्मक उपाय सुरू ठेवा (जसे लसीकरण, आरोग्य तपासणी इ.)
  • आराम करण्यासाठी वेळ काढा.
  • तुम्हाला आवडणाऱ्या इतर काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करा.
  • इतरांच्या संपर्कात रहा.तुमचा विश्वास आहे अशा लोकांशी तुमच्या चिंता आणि तुम्हाला कसे वाटते याबद्दल बोला.
  • आपल्या समुदायाशी किंवा आपल्या धर्माशी निगडित संस्थांशी जोडून घ्या. शारीरिक दूरी राखण्याचे उपाय चालू असताना, ऑनलाइन, समाज माध्यमांद्वारे, फोन किंवा मेलद्वारे कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा.

इतरांना सामोरे जाण्यास मदत करणे

जर तुम्ही स्वतःची चांगली काळजी घेतली तर तुम्ही इतरांची काळजी घेण्यासाठी अधिक सज्ज व्हाल.सामाजिक अंतराच्या काळात, आपले मित्र आणि कुटुंबाशी जोडलेले राहणे विशेषतः महत्वाचे आहे. फोन कॉल किंवा व्हिडिओ गप्पांद्वारे इतरांना तणावाचा सामना करण्यास मदत केल्याने तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना कमी एकटेपणा किंवा एकाकी पणा जाणवण्यास मदत होऊ शकते.

मानसिक आरोग्याच्या चिंता ... आता कृती करा !:

  • जर तुम्ही सामना करण्यास धडपडत असाल तर मदत मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत. सलग अनेक दिवस तुमच्या दैनंदिन कामकाजात अडथळा येत असल्यास तुमच्या आरोग्य कर्मचार्‍याला फोन करा.
  • अत्यंत तणावाच्या काळात, लोकांना आत्महत्येचे विचार येऊ शकतात. आत्महत्या टाळता येण्यासारखी आहे आणि मदत उपलब्ध आहे. आत्महत्येचा धोका, हा धोका ओळखण्यासाठीची चिन्हे आणि जर तुम्हाला स्वतःमध्ये किंवा मित्रामध्ये किंवा प्रिय व्यक्तीमध्ये ही चिन्हे दिसली तर प्रतिसाद कसा द्यावा याबद्दल अधिक माहिती येथे मिळू शकते.
  • संकटकाळात विनामूल्य उपलब्ध असलेली गोपनीय माध्यमे तुम्हाला किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीला तुमच्या भागातील कुशल, प्रशिक्षित समुपदेशकाशी जोडण्यात मदत करू शकतात.

जर तुम्ही संकटात असाल तर त्वरित मदत घ्या:

BREAKUPS : प्रेमभंग

प्रेमभंग किंवा ब्रेकअप होणे केव्हाही सोपे नसते. जरी तुम्ही स्वतः ते नाते तोडले असेल तरी.

सर्वप्रथम, अनेक भावनांना सामोरे जावे लागते. त्यातील काही भावना इतर वेळेपेक्षा जास्त टिकतात. प्रेमभंगामधून सावरण्यासाठी तुम्ही काही अल्पकालीन तर काही दीर्घकालीन पावले उचलू शकता जेणेकरून भविष्यात तुम्हाला निरोगी, विश्वासार्ह नातेसंबंध जोपासता येतील. यात स्वतः सोबतचे नाते देखील आले.

बरे होण्याची पहिली पायरी: आपल्या भावना व्यक्त करा.

आपल्या भावना व्यक्त करणे ही बरे होण्याची पहिली पायरी आहे.  शोक करण्याच्या प्रक्रियेत चढ -उतार येऊ शकतात आणि आपण एका क्षणी दुःख आणि दुसऱ्या क्षणी राग अनुभवू शकता. काही लोकांना कदाचित सुटकेची भावना देखील अनुभवास येऊ शकते.

स्वतःच्या भावनांचा स्वीकार करा.

 

ब्रेकअपमुळे असंख्य भाव-भावना निर्माण होऊ शकतात. ब्रेकअपनंतर खालील भावना जाणवणे अगदी स्वाभाविक आहे. जसे की:

  • स्वीकृती (विशेषतः ब्रेकअप झाल्यानंतर लगेच
  • सुटका
  • धक्का
  • ब्रेक अप झाला आहे हे मान्य करण्यास नकार
  • दु:ख
  • झिडकारले गेल्याची भावना
  • वेदना
  • विश्वासघात
  • भीती
  • लाज
  • दुःख

तुमची दुसरी पायरी: या अल्पकालीन पायर्‍या वापरून बघा.

आपल्या भावनांवर काम करणे ही ब्रेकअपचा सामना करण्याची पहिली पायरी आहे.

सुरुवातीला कठीण वाटेल पण स्वतःची भावनिक, मानसिक आणि शारीरिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही ब्रेकअपनंतर तातडीने खालील पावले उचलावीशी वाटतील:

पुन्हा 'स्वतःला' शोधा

जेव्हा तुम्ही नातेसंबंधात असता, विशेषतः दीर्घकालीन, तेव्हा स्वतःला विसरणे सोपे असू शकते. नात्यातून बाहेर पडण्याच्या सकारात्मक बाजूंवर लगेच लक्ष केंद्रीत करणे कठीण जाऊ शकते, परंतु आत्मशोधनाची संधी म्हणून तुम्ही या वेळेचा स्वीकार करू शकता.

तुम्हाला कोणत्या ठिकाणांना भेट द्यायची किंवा काय खाऊन बघायची बर्‍याच दिवसांपासून इच्छा होती पण ते जमले नव्हते? त्या गोष्टी करायची ही वेळ आहे.

व्यावसायिक समुपदेशक शोधण्याचा विचार करा

याला टॉक थेरपी असेही म्हणतात, मानसोपचारतज्ज्ञाबरोबरच्या सत्रांमध्ये आपल्याला आपल्या भावनांचा धांडोळा घेता येतो आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे मार्गही ध्यानात येतात. नातेसंबंधांशी निगडित समस्यांचे व्यवस्थापन या विषयात माहिर असलेल्या समुपदेशकचा विचार करा.

सामाजिकदृष्ट्या सक्रिय रहा

कधीकधी, ब्रेकअपचे दुःख इतके तीव्र असू शकते की आपण एकटे राहू लागतो. मानवी नातेसंबंधात कुटुंबीय व मित्रांच्या गटासोबत व त्यातील एकेका व्यक्तीसोबत वेळ घालवणे महत्त्वाचे असते. या नाजूक काळात स्वत: ला एकटे न ठेवण्याचा प्रयत्न करा.

तुमच्या जवळच्या लोकांकडे तुम्ही मन मोकळे करू शकता आणि तुम्हाला हे देखील जाणवते की आपल्यापाशी नेहमी प्रेम करणारे व आपल्याला आधार देणारे लोक आहेत. आत्ता सामाजिक संबंधांशी निगडित कौशल्ये बळकट केली तर त्याचा भविष्यात रोमँटिक संबंधांशी निगडित कौशल्ये बळकट होण्यास देखील उपयोग होतो. तज्ञांचा असा विश्वास आहे की सामाजिक जीवनाचा आपली उदासीनता कमी करण्याशी आणि आपल्याला दीर्घायुषी करण्याशी जवळचा संबंध आहे.

राहण्याच्या व्यवस्थेची पुनर्रचना:

कधीकधी, ब्रेकअप नंतर एक किंवा दोन्हीही व्यक्ती पूर्वीच्या सामायिक जागेतून बाहेर पडतात.दोघांना मुले असली किंवा त्यांच्याकडे पाळीव प्राणी असले तर जागा बदलण्याच्या ताणात भर पडते.

तसेच, हे सर्व करताना आर्थिक बाबींचा ताण येऊ शकतो. अशावेळी तुमची राहण्याची व्यवस्था होईपर्यंत जवळच्या व्यक्तींची मदत मागण्यास कचरू नका.

पायरी 3: दीर्घकालीन उपायांवर लक्ष केंद्रित करा.

दीर्घकालीन विचार करता, ब्रेकअपमधून सहीसलामत सावरणे हे बहुतेकदा खालील घटकांवर अवलंबून असते:

आपले मानसिक आरोग्य

दु: ख ही एक प्रक्रिया आहे आणि ते कमी व्हायला निश्चित किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. ब्रेकअपनंतर कदाचित शोक करण्यासाठी तुम्हाला थोडा जास्त वेळ लागेल.

तुमच्या नवीन आयुष्यातील बदललेल्या परिस्थितीचा विचार करणे हे तुमच्या सर्वांगीण मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे.

सामाजिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्रीय राहून तुम्ही ब्रेकअप दरम्यान तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घेऊ शकता. यामुळे तुम्हाला होत असलेल्या वेदना आणि नैराश्य नैराश्य कमी होण्यास मदत होऊ शकते.

स्वत: ची काळजी घेण्याची तंत्रे

Self-care is always important, especially post-breakup. The adage that you “need to take care of yourself in order to take care of others,” definitely applies to interpersonal relationships. By investing time in self-care long term, you’ll build a healthy relationship with yourself that will then transfer over to your relationships.

विश्वास पुन्हा स्थापित करणे

स्वत: ची काळजी नेहमीच महत्वाची असते, विशेषत: ब्रेकअपनंतर. "इतरांची काळजी घेण्यासाठी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे" हे म्हणणे परस्पर संबंधांना निश्चितपणे लागू होते.

स्वत: ची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ देऊन तुम्ही स्वतःशी एक निरोगी नाते जोपासले तर त्याचा तुमच्या इतर नात्यांवर परिणाम होईल.

तुम्ही नवीन संबंध कसे हाताळू शकता?

काही लोकांना, नवीन नातेसंबंध प्रस्थापित करून ब्रेकअपची वेदना कमी करण्याचा मोह होतो. तथापि, "रिबाउंडिंग" नेहमीच शहाणपणाचे नसते, कारण ते आपल्या नवीन नात्यावर नकारात्मक परिणाम करू शकते.

पुढे जाण्यापूर्वी स्वतःला दुःख करण्यासाठी आणि आपल्या भावनांवर पूर्णपणे प्रक्रिया करण्यासाठी पुरेसा वेळ द्या. ही वेळ अर्थातच व्यक्तीपरत्वे बदलू शकते.

तर, तुम्ही यातून काय शिकलात ?

  • तुमचा ब्रेकअप एकतर्फी असो किंवा परस्पर, नातेसंबंध संपवणे ही कधीच सोपी प्रक्रिया नसते.
  • उच्च तणाव किंवा दुःखाच्या क्षणांमध्ये, हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की आपल्या जीवनाचा हा टप्पा शेवटी पूर्ण होईल. हे देखील लक्षात ठेवा की बहुतेक लोक त्यांच्या आयुष्यात एकदा तरी ब्रेकअपमधून जातात, म्हणून जर तुम्हाला भावनिक समर्थनासाठी मित्र आणि कुटुंबाशी संपर्क साधावासा वाटत असेल तर तुम्ही चांगल्या लोकांत आहात.
  • जर तुम्ही ब्रेकअपचा सामना करणे कठीण होत असेल तर तर तुम्ही समुपदेशकाला भेटायला हवे.
  •  इतर सर्व गोष्टींपेक्षा, स्वतःशी प्रेमाने वागा आणि आपल्या ब्रेकअपच्या प्रक्रीयेला सामोरे जा.

https://www.healthline.com/health/coping-with-break-up#short–term-steps

माणसे कुटुंब, मित्र, आशा आकांक्षा यासाठी जगतात. 

संशोधन असे दर्शवते की जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांकडून पाठिंबा आणि प्रेम मिळते असे वाटते , तेव्हा ते अधिक शांत होऊन त्यांच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करू शकतात. आपल्या विकासात पालकांची सर्वात मोठी भूमिका असते. ते आपल्या मानसिक, शारीरिक, सामाजिक, आर्थिक आणि करिअरच्या घडामोडींमध्ये महत्वाची भूमिका बजावतात .. पण जेव्हा आपले पालक त्यांच्या उच्च अपेक्षेने आपल्यावर दबाव आणतात तेव्हा काय होते? आपण त्यांच्या अपेक्षांना कसे सामोरे जाऊ शकतो?

जेव्हा आपण आपल्या पालकांमुळे येणार्‍या दबावाबद्दल आणि तणावाबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला काय म्हणायचे आहे?

तुम्हाला माहित आहे का की भारतात किशोरवयीन आणि 14 ते 29 वयोगटातील प्रौढांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे?

1) मुलांवर मानसिक परिणाम

किशोरवयीन आणि प्रौढांमध्ये सर्वाधिक आत्महत्या करण्याचे प्रमाण भारतात आहे! परीक्षेतील अपयश हे देशातील आत्महत्येच्या पहिल्या 10 कारणांपैकी एक आहे तर कौटुंबिक समस्या पहिल्या तीनमध्ये येतात. या शोकांतिकेची सामान्य कारणे म्हणजे परीक्षांमध्ये अपयश, उच्च अपेक्षा आणि पालकांकडून येणारा दबाव. 

जेथे मुलांच्या मनात आत्महत्त्येचा विचार येत नाही तेथे देखील पालक की ज्यांच्यावर मुलाची काळजी घ्यायची आणि निगा रखायची जबाबदारी आहे त्यांच्या दबावामुळे मानसिक आरोग्याच्या इतर अनेक समस्या निर्माण होतात व तारुण्य आणि प्रौढत्वाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्या प्रगट होतात.

2) अष्टपैलू मुले

भारतात खेळ आणि मनोरंजन या क्षेत्रांची उच्च उत्पन्न असलेले व्यवसाय म्हणून प्रतिमा तयार होत असल्यामुळे बहुतेक लोकांनी आपले लक्ष या क्षेत्रांकडे वळवले आहे. 

बहुतांश पालक अजूनही अभ्यासात चमकण्याची अपेक्षा बाजूला सरू शकत नाहीत. प्रत्येक क्षेत्रातील अपरिहार्य स्पर्धेमुळे, पालक आपल्या मुलांना अष्टपैलू बनण्यास प्रवृत्त करतात, परिणामी मुले बळी पडतात.

3) शैक्षणिक वि क्रीडा वि कला

 
डिस्लेक्सिया सारख्या शिक्षण अक्षमता ओळखण्यात अपयश आणि शैक्षणिक अपयश हाच जीवनाचा शेवट असल्याचे मानणे ही आधुनिक पालकत्व आणि शिक्षण पद्धतीची दोन सर्वात मोठी अपयशे आहेत.

मुलांची वाढ होण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी खेळ आणि शारीरिक क्रिया आवश्यक आहेत. या उपक्रमांसाठी मुलांच्या प्रोत्साहन देण्याऐवजी , स्पर्धात्मक पालक मुलांची इतरांशी तुलना करतात आणि त्यांना स्वतःची लाज वाटावी अशी परिस्थिती निर्माण करतात.

नृत्य, कला, संगीत, क्रीडा आणि इतर क्रियाकलाप मुलांच्या सर्जनशीलतेला प्रेरणा देण्यासाठी उत्कृष्ट पर्याय आहेत. ते त्यांना एकाग्रता , शिस्त आणि गटात काम करायला शिकवतात. दुर्दैवाने, पालकांच्या दबावामुळे या आनंददायक क्रियाकलापांना स्पर्धात्मक कार्यक्रमांमध्ये बदलले आहे ज्यामुळे मुलांवर प्रचंड ताण आला आहे.

पालकांच्या दबावाला सामोरे जाण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

  • तुम्ही आणि बाकीच्यांमध्ये काही अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही एकाच घरात तुमचे आईवडील किंवा आजी -आजोबांसोबत राहत असाल आणि तुम्ही त्यांना दररोज पाहत असाल तर त्यांच्या दबावाला बळी न पडणे कठीण आहे. प्राधान्याने बाहेर जात जा. त्यासाठी लागणारे पैसे वाचवा आणि ते करा.
  • लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या कुटुंबाला खूश करण्याची गरज नाही. हा समाज खोटा आहे की तुमचे कुटुंब हे तुमचे कुटुंब असल्यामुळे तुमचे त्यापैकि प्रत्येकाशी जमलेच पाहिजे. हे गरजेचे नाही. 
  • ठामपणे संवाद साधायला शिका. ठामपणे संवाद साधणे हे तुमच्याकडे असलेल्या सर्वात मौल्यवान सामाजिक कौशल्यांपैकी एक मौल्यवान कौशल्य आहे. हे आपल्याला स्वतःला स्पष्ट, थेट मार्गाने व्यक्त करण्याची अनुमती देते, परंतु इतरांबद्दल आदर ठेऊन आणि कुटुंबातील ज्या सदस्यांना तुमचे वागणे पटत नाही त्यांना सामोरे जाण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. आपला मुद्दा पुढे ठेवायला शिका. आपल्याला काय हवे आहे ते स्पष्ट करा.
  • मदत मागा. प्रत्येक गोष्ट स्वतःच करणे नेहमीच महत्वाचे नसते. तुम्हाला ज्यांच्यासोबत मोकळेपणा वाटेल त्यांच्याकडून तुम्ही मदत, मार्गदर्शन आणि पर्यवेक्षण मागू शकता. हे नेहमीच आपले कुटुंब सदस्य असणे आवश्यक नसते, ते कोणीही असू शकतात -एखादा वयाने मोठा मित्र, मार्गदर्शक, शिक्षक किंवा समुपदेशक.

https://feeljoy.in/blog/stressors/how-to-deal-with-the-stress-caused-by-parental-pressure/

आपण एखाद्या गटाचा भाग असावा असे वाटण्याची इच्छा सामान्य आहे आणि बहुतेक लोकांना कधी ना कधी, विशेषत: किशोर आणि तरुण वयात असे वाटते. 

समवयस्कांचा दबाव म्हणजे गटात सामावले जाण्यासाठी, स्वीकारले जाण्यासाठी व आदराने वागवले जाण्यासाठी आपल्याला काहीतरी करावे लागेल ही भावना, ती हाताळणे कठीण असू शकते. हा दबाव उघड असू शकतो (म्हणजे, मित्र तुम्हाला काही करायला सांगतात ) किंवा कमी थेट (उदा., मित्र जे करत आहेत ते करत नसल्याबद्दल चेष्टा करणे, इतर दारू पीत असतील तर आपण दारू पीत नाही म्हणून बाजूला पडल्यासारखे वाटणे, मित्राने सिगरेट ओढली किंवा गुटखा खाल्ला हे माहित झाल्यावर त्याबद्दल कुतूहल वाटणे) असू शकतो. 

समवयस्कांचा दबाव कधीकधी उपयुक्त ठरू शकतो (उदा., तुमचे मित्र तुमच्यापेक्षा जास्त अभ्यास करत आहेत हे समजल्यावर तुम्ही अधिक परिश्रम घेण्यासाठी प्रवृत्त होणे, तुम्ही मित्रांपेक्षा अधिक दारू पिता हे लक्षात येणे आणि ती कमी करण्याचा निर्णय घेणे), यामुळे ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला खात्री नाही किंवा जी तुम्हाला योग्य वाटत नाही अशा गोष्टी देखील तुम्ही करू शकता.या दबावाला सामोरे जाणे आव्हानात्मक असू शकते, परंतु आपली स्वतःची वैयक्तिक मूल्ये आणि प्राधान्यक्रम ध्यानात ठेऊन समवयस्कांच्या दबावाऐवजी त्या आधारे निर्णय घेणे महत्वाचे आहे.

तुमचे मित्र व सहकार्‍यांचे विचार, मूल्ये, वर्तन व आवडीनिवडी तुमच्यासारखीच असतील तर समवयस्कांचा दबाव हाताळणे फारसे कठीण नसते. परंतु महाविद्यालयात तुम्हाला विविध वृत्ती आणि वर्तनाचे लोक भेटणार. काही वेळा आपली नेमकी परिस्थिती कशी आहे आणि आपण कसे वागायला हवे हे समजणे सोपे जाते तर काही वेळा आपण कसे वागावे याबद्दल मनात गोंधळ निर्माण होतो, समवयस्कांचा दबाव जाणवतो आणि स्वतःच्या निर्णयाविरुद्ध वागण्यास आपण प्रवृत्त होऊ शकतो. 

एवढेच काय, महाविद्यालयीन शिक्षण हा असा काळ असू शकतो की जेव्हा तुम्ही घर आणि कुटुंबापासून दूर असाल आणि तुम्हाला पूर्वीपेक्षा स्वतःचे पर्याय निवडण्याचे अधिक स्वातंत्र्य असेल. तुमची स्वतःची ओळख प्रस्थापित करण्यासाठी आणि नवीन अनुभव घेण्यासाठी तुम्हाला तुमचे कुटुंबिय ज्या गोष्टी करत नाहीत आणि त्यांचा ज्याला विरोध आहे अशा गोष्टी कराव्याशा वाटतील. या ठिकाणी तुम्ही काय विचार करता, तुमची मूल्ये काय आहेत आणि तुम्हाला कसे व्हायचे आहे याकडे तुम्ही वळून बघणे महत्त्वाचे आहे. एखाद्या कृतीच्या संभाव्य परिणामांचा विचार करणे देखील उपयोगी आहे. जर तुम्ही गर्दीबरोबर वहात गेलात आणि जे तुम्ही आधी विचारात घेतले नसेल असे काही केलेत तर काय होईल? त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो का? स्वतः च्या मूल्यांच्या व निर्णयाच्या विरूद्ध वागल्यामुळे तुम्हाला स्वतःबद्दल वाईट वाटेल का? या सर्व लक्षात घेण्यासारख्या गोष्टी आहेत.

जेव्हा तंबाखू, दारू किंवा इतर अमली पदार्थांच्या वापराचा दबाव येतो, तेव्हा किती समवयस्क लोक हे व्यसन करतात याबद्दलचा तरुणांनाचे अंदाज जास्तीच्या बाजूला झुकणारे असतात. सत्य हे आहे की लोकांना वाटते त्यापेक्षा दारू किंवा अमली पदार्थांचे सेवन करणार्‍या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. वस्तुस्थिती जाणून घेतली तर सगळेचजण व्यसन करतात त्यामुळे मी केले नाही तर मी एकटा पडेन असे वाटल्याने आलेला ताण कमी होतो.

जेव्हा व्यसन करण्याचा अप्रत्यक्ष दबाव येतो तेव्हा त्याला तोंड देण्यासाठी खालील रणनीती वापरुन बघा.

  • ज्यांच्याबरोबर तुम्हाला अस्वस्थ वाटते असे लोक व अशी परिस्थिती टाळा. स्वतःच्या मर्यादा निश्चित करण्यावर काम करा. तुम्ही स्वतःच्या सर्वाधिक हिताची गोष्ट करणे ही योग्य बाब आहे.
  • स्वतःच्या मनाला विचारून बघा. "मला याबद्दल कसे वाटते?" "हे मला योग्य वाटते का?" "हा निर्णय घेण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत?"
  • अस्वास्थ्यकर परिस्थिती ओळखा: तुम्हाला जे करायचे नाहीये ते करण्यासाठी इतरांनी तुमच्यावर दबाव आणणे, जबरदस्ती करणे किंवा तुम्हाला फसवणे योग्य नाहीये. तुमच्या निवडीबद्दल तुमच्यावर टीका करणे, तुम्हाला लाजिरवाणे वाटेल असे वागवणे किंवा तुम्हाला कमीपणा दाखवणेदेखील योग्य नाहीये. तुम्ही इतरांना ही वागणूक थांबवण्यास सांगू शकता किंवा या मार्गाने वागणाऱ्या लोकांसोबत वेळ घालवणे टाळण्याची निवड करू शकता.
  • तुमच्या निर्णयाचा आदर करणार्‍या आणि तुमच्यावर त्यांच्या मतानुसार वागण्याचा दबाव न टाकणार्‍या लोकांसोबत वेळ घालवा.
  • लक्षात ठेवा की तुम्ही प्रत्येकाला खुश करू शकत नाही आणि तसे करण्याची काही गरज देखील नाही. हे स्वीकारणे कठीण असू शकते, परंतु प्रयत्न केल्यास फायदा होतो.
  • जेव्हा दबाव निर्माण करणारे लोक किंवा परिस्थिती टाळता येत नाही, तेव्हा "विलंब तंत्र " वापरून पहा: त्वरित उत्तर देण्याऐवजी स्वतःला स्वतःच्या निर्णयाबद्दल विचार करायला वेळ द्या: "मला जरा विचार करू दे," " तुला थोड्या वेळाने कळवू का? किंवा " तासाभरात बोलू" असे सांगा.
  • जेव्हा तुम्ही दबाव निर्माण करणारी परिस्थिती टाळू शकत नाही किंवा किंवा निर्णय घेणे पुढे धाकलू शकत नाही तेव्हा फक्त "नाही!" असे म्हणण्याचा सराव करा. जर फक्त "नाही" म्हणणे कठीण वाटत असेल तर इतर प्रतिसाद वापरून सराव करा, जसे की "धन्यवाद पण नाही", "आज नाही," "कदाचित परत कधी तरी " किंवा "धन्यवाद, पण मी करू शकत नाही."
  • जर परिस्थिती खूप आव्हानात्मक असेल तर निमित्त सांगणे ठीक आहे. उदाहरणार्थ, जर कोणी तुम्हाला दारू देत असेल आणि तुम्हाला ‘नाही’ म्हणायचे असेल पण कठीण वाटत असेल, तर तुम्ही औषध घेत आहात किंवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी लवकर उठायाचे आहे असे सांगू म्हणा.
  • जर तुम्ही दबावाने भरलेल्या परिस्थितीत असाल तर तुम्हाला पाठिंबा देणारा मित्र सोबत घ्या आणि तुमचे हेतू काय आहेत ते त्यांना सांगा (उदा., "मला पिण्याची इच्छा नाही, म्हणून जर मी दारू पिण्याकडे चाललोय असे तुला वाटले तर मला दारू प्यायची नाहीये याची आठवण करून दे.").
  • जेव्हा कोणीतरी इतरांवर दबाव टाकत असल्याचे तुमच्या लक्षात येते तेव्हा त्यांना आधार देण्यासाठी पुढे व्हा. "बायस्टेंडर इंटरव्हेन्शन" (जेव्हा तुम्ही एखाद्याला अडचणीत पाहता तेव्हा मदतीसाठी पाऊल टाकणे) हा इतरांना पाठिंबा देण्याचा आणि समाजाला संदेश देण्याचा एक प्रभावी मार्ग असू शकतो. जर तुम्हाला दबाव आणणाऱ्या व्यक्तीशी थेट सामना करणे सोयीचे वाटत नसेल, तर त्यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करा किंवा ज्या व्यक्तीवर दबाव आणला जात आहे तिला तेथून बाहेर काढा (उदा. "जरा माझ्याबरोबर लेडीज रूममध्ये येतेस का?" किंवा "चल तिथे जाऊन एक सेल्फी घेऊ.").
  • आवश्यकता वाटल्यास पालक, कुटुंबातील इतर विश्वासू सदस्य, मार्गदर्शक किंवा समुपदेशककडून सल्ला किंवा आधार मागा.

https://caps.ucsc.edu/counseling/aod/peer-pressure.html

पुरेसे पैसे न कमवू शकणे, हातखर्चाला पुरेसे पैसे नसणे, कर्ज असणे यामुळे आर्थिक ताण उद्भवू शकतो.

जर तुम्ही तुमच्या आर्थिक ताणाची चिंता कमी करू शकला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील इतर महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करता येते आणि तुमची आर्थिक परिस्थिती हाताळण्याची योजना तयार करता येते. तुमच्या आर्थिक ताण दूर करण्यासाठी आणि दररोज काम करणे सोपे करण्यासाठी तुम्ही खालील काही गोष्टी करू शकता.

खर्चाचे अंदाजपत्रक तयार करा

खर्चाचे अंदाजपत्रक किंवा बजेट तयार करणे हे तुमच्या आर्थिक ताणात भर घालणार आहे असे तुम्हाला वाटू शकते, परंतु तुमच्या वित्तपुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याचे आणि पैशाची चिंता करणे थांबविण्याचे हे सर्वोत्तम साधन आहे.

तुम्ही तुमचे पैसे कधी आणि कसे खर्च करणार आहात हे बजेट करताना तुम्ही ठरवू शकता. तुमचे दैनंदिन खर्च ते बचत असा सर्वांगीण विचार त्यात करता येतो. पहिल्या काही महिन्यांमध्ये नियोजन करणे आणि बजेटला चिकटून राहणे हे आव्हानात्मक असू शकते , परंतु एकदा आपण काय करावे हे समजून घेतल्यानंतर आपल्याला त्यात फार लक्ष घालावे लागत नाही आणि तुमची आर्थिक चिंता देखील आटोक्यात येते. 

आपत्कालीन निधी

अनपेक्षित खर्च आणि आर्थिक आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी केलेली बचत म्हणजे आपत्कालीन निधी. प्रत्येक महिन्याच्या खर्चाची तोंडमिळवणी करणे तुम्हाला कठीण जात असेल तर आपत्कालीन निधी उभारणे तुम्हाला सुरुवातीला कठीण वाटू शकते. थोडी रक्कम बाजूला ठेवून प्रारंभ करा, मग ती प्रत्येक महिन्यात 100 असली तरी तुम्ही तुमचा आपत्कालीन निधी उभारू शकता. 

बाहेरून मदत मिळवा

जर तुम्ही खरोखरच तुमचे बजेट आणि खर्चाचे मुद्दे हाताळण्यासाठी संघर्ष करत असाल तर बाहेरून मदत मिळवण्यास घाबरू नका. पैशाचे व्यवस्थापन आणि गुंतवणूकीची माहिती देणारे वर्ग तुम्ही घेऊ शकता. ते तुम्हाला अर्थसंकल्पाची योजना आखण्यास आणिमदत करतील. 

तुम्ही काय बदलू शकता ते ठरवा

जर तुम्हाला आर्थिक समस्या येत असतील, तर तुम्हाला एकतर उत्पन्नाशी निगडित किंवा खर्चाशी निगडित किंवा उत्पन्न व खर्च या दोन्ही बाबींशी निगडीत समस्या असू शकतात. जर तुम्हाला खर्चाइतके पैसे मिळत नाहीयेत हे टूमहाला माहित असेल तर परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही काय करू शकता ते ठरवा. यामध्ये परत शिक्षणाकडे वळणे, नवीन कौशल्ये शिकणे हा देखील पर्याय असू शकतो. situation. It may include options such as going back to studying to qualify for a higher paying job.

जर तुम्हाला अति खर्चाची सवय लागली आहे असे तुम्हाला जाणवत असेल तर त्यातून बाहेर पाडण्यासाठी तुम्ही एखादा आधार गट शोधू शकता किंवा व्यावसायिक मदत घेऊ शकता. तुमची परिस्थिती कायमस्वरूपी बदलण्यास मदत करेल असे नियोजन तुमचा ताण कमी करण्यासाठीमदत करेल. 

तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या

हा जरी तुमच्या आर्थिक समस्येवरील उपाय नाही असे वाटत असले तरी असा नियमित मागोवा घेण्यामुळे तुम्हाला दररोज जाणवणार्‍या ताणतणावात मोठा फरक पडू शकतो.

आपल्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीचे सकारात्मक पैलू पाहणे देखील तणाव कमी करण्यास मदत करू शकते. 

लक्षात ठेवा, तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती बदलू शकता आणि तुम्ही सतत चिंताग्रस्त अवस्थेत राहत नसल्यास तुम्हाला हे करणे सोपे जाईल.

संदर्भ:

What Is Resilience? Definition, Types, Building Resiliency, Benefits …

Profiles of Coping Strategies in Resilient Adolescents – SAGE Journals

Resilience and coping strategies in adolescents – ResearchGate

संबंधित लेख

मुले दिवसातील बराच वेळ शाळेत घालवतात. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. गैरवर्तन आणि...

मराठी
Search