मुले पौगंडावस्थेत असतानाची वर्षे अनेक कुटुंबांना कठीण जाऊ शकतात. तरुणांमध्ये त्यांच्या पालकांपेक्षा भिन्न कल्पना,मूल्ये आणि श्रद्धा विकसित होऊ शकतात. मुले स्वतंत्र होण्याच्या प्रक्रियेचा हा एक भाग आहे. वेगवेगळ्या वयोगटात आणि वेगवेगळ्या परिस्थितीत मुलांना किती स्वातंत्र्य द्यावे यासाठी पालकांना संघर्ष करावा लागू शकतो.
सर्व कुटुंबाना एकच सल्ला दिला जाऊ शकत नाही. कारण प्रत्येक व्यक्ती आणि परिस्थिती वेगवेगळी असते. किशोरांशी संवाद साधणे लहान मुलांशी संवाद साधण्यापेक्षा वेगळे असते. किशोरांशी संवाद साधताना समान पद्धत वापरली तर वाद आणि तणाव निर्माण होण्याची शक्यता असते.
आपण काही सध्या सोप्प्या सल्ल्यांचे अनुसरण केल्ले तर किशोरवयीन मुलाशी संवाद साधने सोपे होऊ शकेल. तथापि,कौटुंबिक संबंधांबद्दल तुम्हाला काळजी असल्यास तज्ञांचा सल्ला घ्या.
पौगंडावस्थेमध्ये असताना मुलांमध्ये झपाट्याने बदल घडतो फक्त तरुणांसाठीच नव्हे तर पालकांसाठी देखील त्या बदलला तोंड देणे कठीण असू शकते,परंतु पालकांनी हे ओळखणे आवश्यक आहे की:
- मोठे होऊन स्वतंत्र व्यक्ती बनणे सर्वच मुलांमध्ये घडणारी क्रिया आहे. पालक म्हणून आपण या प्रकीयेमध्ये तरुणांना मदत करणे गरजेचे आहे.
- कुटुंबाने एकत्र निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. तुमचे किशोरवयीन मुलं व तुम्ही एकत्र चर्चा करून समस्येवर वर दोघांना मान्य असलेला मार्ग काढण्याचा प्रयत्न करा.
- तरुणांचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन हा आपल्यापेक्षा वेगळा असू शकतो. तुमची मुले तुम्हाला समजू शकणार नाहीत अशा गोष्टी या वयात करू शकतात. याच्याकडे चांगल्या नजरेने बघण्याचा प्रयत्न करा. व्यक्ती म्हणून घडत असताना मुले शिकत असतात.
- मुलं कितीही मोठी झाली तरी आपण स्वतःला त्यांच्या सुरक्षिततेसाठी व कल्याणासाठी जबाबदार धरत असतो. मुलं जेव्हा पौगंडावस्थेत पोहोचतात तेव्हा ती स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागतात. कधी कधी मुले चुकीचे निर्णय घेतात. अशा वेळी त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करा व टीका करणे टाळा. मुले त्यांच्या चुकांमधून महत्व पूर्ण गोष्टी शिकतील अशी अशा ठेवा.
- या वयात पालक व तरुण मुलं दोघांनीही स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळ दिला पाहिजे.
- पालकांनी त्यांच्या तरुण मुलांना व त्यांच्यातल्या वेगळेपणाला महत्व दिलं पाहिजे मुलांना पालकांचे बिनशर्त प्रेम दिसायला हवे.
संवादासाठीचे मार्ग मोकळे ठेवणे सगळ्यात महत्वाचे आहे. त्यासाठी काही सूचना खालीलप्रमाणे:
- स्वतः बोलण्यापेक्षा मुलांचे ऐका – आपण स्वतः बोलण्यापेक्षा, मुलांचे ऐकण्यात जास्त वेळ घालवला पाहिजे. विशेषतः तरूणांशी बोलताना ऐकणे खूप महत्वाचे आहे. आपण शांत असू तर तरुणांना बोलायची संधी मिळेल आणि ते मोकळेपणाने बोलू शकतील.
- एकमेकांबरोबर एकत्र राहण्यासाठी वेळ काढा. - किशोरवयीन मुले सहसा शाळा,मित्रमैत्रिणी आणि इतर आवडींमध्ये व्यस्त असतात, परंतु आपण त्यांच्याबरोबर नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळी संवाद करू शकता. त्यांना एखाद्या ठिकाणी सोडण्याची किंवा आणण्याची तयारी दर्शवा ज्यामुळे तुम्हाला त्यांच्याशी संवाद साधण्याची आणखी एक संधी मिळेल.
- त्यांना एकांत द्या – तरुणांना त्यांची स्वतःची जागा हवी असते. उदा. त्यांच्या खोलीमध्ये जाण्याआधी दरवाजा वाजवा.
- त्यांच्या आवडी विचारात घ्या – त्यांच्या आवडीची गाणी ऐका, त्यांच्याबरोबर त्यांच्या आवडीचे टि.व्हीचे कार्यक्रम बघा आणि खेळाचा सराव करण्यासाठी त्यांच्या बरोबर जा. त्यांच्या आयुष्यात सक्रिय सहभाग घ्या.
- एक प्रेमळ पालक व्हा – पौगंडावस्थेमध्ये होणार्या बदलांबरोबर जुळवून घेताना संघर्ष करत असतात आणि कोणीतरी आपल्यावर बिनशर्त प्रेम करावे अशी त्यांची भावना असते. शारिरीक स्पर्शतून तुमचे प्रेम दर्शवा. त्यांनी एखादी गोष्ट साध्य केली तर ते साजरे करा, त्यांच्या चुका माफ करा, त्यांना अडचण असेल तेव्हा त्यांचे ऐका आणि त्यांनी समस्या कशी सोडवायची या विषयी जे नियोजन केले असेल त्यामध्ये सहभागी व्हा. समस्या सोडविण्यामध्ये त्यांना आधार द्या. प्रत्येक तरुण व्यक्ती मधील सकारात्मक स्व-प्रतिमा तयार होण्यासाठी हे गरजेचे असते त्यासाठी मदत करा.
- मजा करा- विश्रांती घेण्यासाठी व हसण्यासाठी वेळ काढा. चांगल्या भावना चांगले नाते तयार करण्यासाठी मदत करतात.
वेगवेगळी मते असणारी लोकं एकत्र आली की भांडणे होणे स्वाभाविक आहे त्यामुळे तुमच्या तरुण मुलांशी तुमचे वाद होणं सामान्य आणि अपेक्षित आहे. तथापि पालक व तरुण मुलांमध्ये होणारा संघर्ष त्यांचे नाते कमकुवत करू शकतो.
अनेकदा नकारात्मक संवाद हे भांडणाचे कारण असते. कठोरपणा, दोषारोप करणे, सतत टीका, सक्तीने ओरडणे.
नेहमीच नकारात्मक संभाषण ओळखणे सोपे नाही. उदा. नीतिनियम पाळणारे पालक टीका करू शकतात कारण त्यांच्या मुलाने अधिक प्रयत्न करावे अशी त्यांची इच्छा असते. जर तुम्ही नकारात्मक संवाद करत असाल तर:
- संभाषण वेगाने बिघडते ओरडणे किंचाळणे, भांडणे
- तुम्हाला राग येतो, उदास नाकारले पणा, दोषारोपन किंवा अप्रिय वाटते.
- भांडंनामध्ये प्रश्न कधीच सुटत नाहीत.
तुम्ही नकारात्मक संवादाला सकारात्मक संवादामध्ये बदलू शकता. त्यासाठीच्या सूचना:
- एकमेकांशी कसा संवाद साधावा याविषयी बोला. संभाषण सुधारण्यासाठी रणनीती बनवा. मंथन करा किंवा एकत्र चर्चा करा.
- वाद घालण्यासाठी काय महत्वाचे आहे ते ठरवा. स्वतःची सुरक्षितता महत्वाची आहे, जसे की दारू पिऊन गाडी चालविणार्या चालकच्या गाडीमध्ये न बसणे, हे भांडण्याचे कारण असू शकते. इतर गोष्टी जशा की खोली नीटनेटकी ठेवणे यावर भांडण्यापेक्षा दुर्लक्ष केलेले चांगले.
- विधायक चर्चा करा. कबूल करा आणि त्यांचे विजय साजरा करा. त्यांना समजेल जेव्हा त्यांना कळेल की ते चुकीचे होते आणि त्यमुळे त्यांना आठवण करून देण्याची गरज पडणार नाही.
- तुम्ही चुकीचे असाल तेव्हा माफी मागून चांगले उदाहरण दाखवून द्या.
जेव्हा किशोरवयीन जबाबदारीने वागायला तयार असतील तेव्हा आपल्याला स्वेच्छेने अधिक स्वातंत्र्याचा हक्क देण्याची आवश्यकता आहे. त्यांना मिळालेल्या प्रत्येक हक्का सोबत एक जबाबदारी पण येते, सूचनांचा समावेश:
- तुमच्या किशोर वयीन मुलाशी बोलावून घरातील नियम ठरवा. उदा. सध्याकाळी मित्रांबरोबर बाहेर जायचे असेल तर त्यासाठीची वेळ दोघे मिळून ठरवा.
- किशोरवयीन व्यक्तींशी घरगुती नियमांची चर्चा करताना तडजोड करण्यास तयार रहा. (कमी महत्त्वाच्या मुद्द्यांना सोडून देण्याचा प्रयत्न करा.)
- नाही म्हणण्या अदोगर थांबा आणि विचार करा. यावेळी हो म्हणण्यसाठी किशोरवयीन जबाबदारी घेण्यास तयार आहे का?
- जर तुम्ही नाही म्हणालात तर का हे स्पष्ट करा – पण पालकांची भूमिका लक्षात ठेवा त्यामुळे वाद होऊ शकतात. चांगली कारणे द्या जसे की सुरक्षितता.
- स्वतः ची काळजी व जबाबदारी घेण्यासाठी त्यांना मदत करा. उदा. मद्यपान किंवा सुरक्षित लैंगिक संबंध यासारख्या विषयावर चर्चा करा आणि तुम्हाला वाटणारी काळजी याविषयी बोला.
ऐकण्यासाठी वेळ द्या – तुम्हाला आश्चर्य वाटेल की किशोरवयीन तुमचावर विश्वास ठेवतील जर त्यांना तुम्ही त्यांचे ऐकून घेताय हे लक्षात येईल. सुचना:
- जेव्हा ते तुमच्याशी बोलतील तेव्हा खरोखर ऐका. उदा. तुम्ही जे काही करत असाल ते थांबवा, डोळ्यामध्ये बघा आणि बोलणे मध्येच तोडू नका.
- रागावणे टाळा किंवा उतावळी देह बोली. उदा. डोळे फिरवू नका किंवा उसासा टाकू नका.
- तुमच्या किशोरवयीनचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोण वेगळा आहे त्याचे कौतुक करा. त्यांचे मित्र असल्यासारखे वागा आणि त्यांच्या मतांचा आदर करा. त्यांचे विचार मते ही तुमच्या पेक्षा वेगळी असू शकतात.
- ‘तु’ ऐवजी ‘मी’ वापरा. उदा. ‘तू खूप निष्ठुर आहेस, तू कुठे जाणार आहे हे कधीच सांगत नाही’. त्याऐवजी असे म्हणा: ‘ तू कुठे आहेस हे मला माहीत नसेल, तर मला तुझी काळजी वाटते’.
- उपहास, टीका आणि आरडाओरडा टाळा
- गृहीत धरू नका किंवा मनातलं वाचू नका. ऐका.
- तुम्ही आदरपूर्वक ऐकले नाही तर तरुण मुलं बोलण्याचे थांबतात.
किशोरांच्या मते तुम्ही आणि तुमचे किशोरवयीन मुलांमध्ये गैरसमज होण्याची काही सामान्य कारणे आहेत आणि पालक किशोरवयीन मुलांशी प्रभावीपणे संवाद कसा साधू शकतात याबद्दलची काही मते.
1. किशोरवयीन वर्तमानात जगतात. - हे समजून घेणे आवश्यक आहे की येथे जे काही चालू आहे त्यापैकी काही विकासात्मक गोष्टी आहेत. किशोरवयीन मुलांचा पुढचा मेंदू ज्याच्या संबंध नियोजन आणि वेळापत्रक तयार करणे याच्याशी असतो तो यावयात पूर्ण विकसित झालेला नसतो.
मुलांचे दोन आठवडया पूर्वीचे वागणे हे प्रोढांसाठी लक्ष देण्यासारखे असते. परंतु किशोरवयीन ते लक्षात ठेवत नाहीत ते पुढे जात राहतात.
तसेच आपण जेव्हा त्यांचा भविष्या बद्दल बोलतो, जसे की, “अशा स्वरुपाच्या श्रेणीमुळे तुला कॉलेजला कसा प्रवेश मिळेल?” हे ते ऐकत नाहीत. जेव्हा आपण एखाद्या किशोरांना त्यांचे भविष्य कसे सुधारता येईल याचा संदर्भ देऊन प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा भविष्याचा विचार करा किंवा मागे वळून बघा असे सांगायला हवे.
जर तुम्हाला चांगला संवाद साधायचा असेल तर हे लक्षात घ्या की तुम्ही ज्याकाळात वाढलात त्याच काळात तुमची मुलं वाढत नाहीयेत.त्यांच्यातील चैतन्य पाहण्याची व त्यांच्या बरोबर वर्तमानात जगण्याची आवश्यकता आहे.
असे नसेल तर संमती देण्यासाठी आत्ता व नंतर गोष्टींवर लक्ष ठेवा. ह्या आठवडया बद्दल किंवा पुढच्या आठवडया बद्दल बोला.
2. किशोरांवर भावनांनी नियंत्रण केले जाते - पौगंडावस्थेतील वर्षांमध्ये, कुमारवयीन मुलांवर मेंदूच्या मध्ये असलेल्या अमिगडाला या भावनिक संरचने द्वारे नियंत्रण ठेवले जाते. अॅमिगडाला कायम ठेवण्यासाठी अविकसित पुढच्या मेंदूला नियंत्रण ठेवावे लागते.
Without a developed, rational prefrontal cortex to keep the amygdala in check, emotions run high.
Brain scans show us the impact that this “voice” has on teens. When presented with a stimulus that is unremarkable in both children and adults, the teen amygdala lights up. Where we hear a chime, they hear a gong.
3. किशोर अविश्वसनीय असे निरीक्षक आणि दुभाषे असतात - किशोरांना सूक्ष्म देहबोली लक्षात येते आणि स्वर बदललेला समजतो, परंतु त्यांचा मेंदू जास्त सतर्क असल्याने त्यांचा चुकीचा अर्थ घेतात.
एका पालकांनी आपल्या मुलीला काळजीने विचारले की, “कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी कोण गाडी चालवत आहे?” आणि तिच्या मुलीने उत्तर दिले, "तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाही ?!" तिला तिच्या आईच्या स्वरात काहीतरी वाटले, पण तिने त्याचा सर्वात वाईट निष्कर्ष काढला
प्रशंसे पेक्षा पूर्व ग्रह दूषित नसणे चांगले असते. पूर्वीच्या अनुभवांवर आधारित न बोलता संवाद साधला तर किशोरवयीन बरोबर चांगला संवाद होऊ शकतो.
4. काळजी वाहू व्यक्ती या भूमिकेतून प्रशिक्षक या भूमिकेत जाण्यामध्ये पालक अयशस्वी होतात. - मुले लहान असतात तो पर्यंत अधिकाराने संवाद करणे सोपे असते. आपण काळजी वाहू व्यक्ती म्हणून त्यांचे संरक्षण करतो व जगात कसे वागायचे हे शिकवत असतो.
पण पौगंडावस्थेत नातेसंबंधातील बदलाची सुरूवात होते, जिथे आपल्या मुलांना स्वातंत्र्य आणि समानता पाहिजे असते. जेव्हा आपण किशोरवयीन मुलांबरोबर संवाद साधतो तेव्हा ते कदाचित असे म्हणू शकतात की, “तू असा माझ्यावर नियंत्रण ठेवत आहेस!” किंवा ते आपल्याशी बोलणे थांबवू शकतात.
संवादामधील गोंधळ टाळण्यासाठी स्वतःला तपासा. त्यांना न विचारता तुम्ही काही गृहीत धरत आहात का ते बघा.
तसे असेल तर या पद्धतीने त्यांच्या बरोबर संवाद करण्याचा प्रयत्न करा, “तुझं यावरच मत जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे.” किंवा त्यांना अभ्यास करण्यामध्ये तुमच्या मदतीची आवश्यकता आहे असे गृहीत धरण्यापेक्षा तुम्ही असे विचारू शकता, “काही करण्यासाठी तुला माझ्या मदतीची गरज आहे का?”
5. पालक चुकीचे प्रश्न विचारतात – काही किशोरवयीन मुलांची तक्रार असते की त्यांच्या आयुष्यातील प्रौढ लोक त्यांच्या पालकांपासून ते मार्गदर्शन करणार्या समुपदेशकांपर्यंत वारंवार विचारतात, “तू ठीक आहेस ना?” त्यांना वाटते की त्यांच्यात आणि त्याच्या मित्रांमध्ये काहीतरी चुकीचे आहे जे त्यांना दिसत नाहीये.
पालकांना ताणतणाव असतो तो त्यांच्या मुलांवर दिला जातो हे त्यांना कळत नाही
पालकत्वासाठी: जेव्हा किशोरांच्या एका गटाला त्यांना कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले पाहिजेत असं विचारलं गेलं तेव्हा एक चांगले उत्तर मिळाले: “जेव्हा मी माझ्या आईला तिच्या मित्रांशी बोलताना ऐकतो तेव्हा ती तिच्या मित्राच्या बोलण्याशी संबंधित असे प्रश्न विचारते.”
पौगंडावस्थेतील मुलांना त्यांची तपासणी करण्या ऐवजी संवाद करावा असे वाटते. योग्य प्रश्न विचारल्यास पालकांना किशोरवयीन मुलांनुसार अधिक चांगले संवाद साधण्यास मदत होईल असे वाटते.
6. किशोरवयीन असताना काय वाटते हे पालक विसरतात- ज्या पालकांना मुलांना संरक्षण द्यायचे असते त्यांना मदत करणे आणि समस्येचे निराकरण करण्याची इच्छा असते. परंतु किशोरवयीन मुलांकडून त्यांच्यावर विश्वास नाही असे घेतले जाते.
पालकत्वासाठी: जर तुमची किशोरवयीन मुले पुरेसे चांगले करीत आहेत, परंतु त्याच्या क्षमते पेक्षा कमी असेल तर, त्याकडे दुर्लक्ष करा. आपण हे कबूल केले पाहिजे की सध्या त्याचा दृष्टीकोन त्याच्यासाठी उपयोगी आहे.
आता आपल्याला पालक आणि किशोरवयीन मुलांमध्ये संवाद करण्यामध्ये येणार्या आडचणी साठी काय कारणीभूत हे समजले समजल्या आहेत, आपण यापैकी एखादी सवय बदलू शकता. आपले किशोरवयीन मुलं ही घडण्याच्या प्रक्रियेमधे आहेत म्हणूनच त्यांचे वर्तन मनाला लावून घेऊ नका.
आत्ताच्या क्षणात जगण्याच्या किशोरवयीनांच्या क्षमतेचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करा. चुकीच्या संवादाबद्दल तुम्हाला अपराधी वाटत असेल तर तो बदलण्यासाठी जास्त उशीर करू नका. आतापासून दोन आठवड्यांनंतर त्यांना आपले जुने संवाद आठवणार नाहीत!
तज्ञांची मदत/समुपदेशन
तुम्हाला व तुमच्या किशोरवयीन मुलांना कठीण परिस्थितीमध्ये मदत करण्यासाठी सेवा उपलब्ध आहेत. तुमचे डॉक्टर हे संदर्भ सेवा व माहिती घेण्यासाठी सुरवातीला उपयोगी पडतील.
लक्षात ठेवण्यासाठीच्या गोष्टी
- नकारात्मक संवाद हे पालक व किशोरवयीन यांच्यातील वादाचे प्रमुख कारण आहे.
- तुमच्या किशोरवयीन मुलाचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोण वेगळा असू शकतो हे स्विकारा व त्यांच्या मतांचा आदर करा.
- तुमच्या किशोरवयीनशी बोलून घरातील नियम बनवा.