दादागिरींशी प्रतिकार कसे करायचे?
कोणी जर आपल्यावर दादागिरी केली जात्येय, आपली टर उडवली जात्येय अशी तक्रार करत असेल तर त्याच्याकडे वेळीच लक्ष द्या. त्यात विशेष काही नाही असे म्हणून उडवून लावू नका.
एखाद्या व्यक्तीचे मनःस्वास्थ्य हरवेल इतकी वरचेवर त्याची किंवा तिची टर उडवणे याला दादागिरी करणे म्हणता येईल. ज्या व्यक्ती अशी टर उडवत असतील त्या दादागिरी करत असतात. त्यांचे आपापसात पटत नाही, मतभेद आहेत किंवा एक व्यक्ती दुसर्याला आवडत नाही या नावाखाली हे वागणे नजरेआड करता येणार नाही. दुसऱ्या व्यक्तीवर ताबा असलेल्या किंवा हुकमत गाजवणार्या व्यक्तीकडून असे वर्तन वारंवार घडते.
दादागिरीचे वर्तन कसे ओळखायचे?
अशी दादागिरी कुठेही आणि सगळीकडे केली जाऊ शकते: शाळा, घर, कामाचे ठिकाण किंवा सहज कोणालाही वाचता येतील असे टेक्स्ट मेसेजेस, इमेल, इन्स्टाग्रॅम, फेसबुक यासारखी समाज माध्यमे अशा कोणत्याही ठिकाणी दादागिरी करता येते. ही दादागिरी शारीरिक, शाब्दिक आणि / किंवा भावनिक स्वरूपाची असू शकते.
एखाद्याला भीती बसावी किंवा स्वतःची लाज वाटण्याइतकी आपली दहशत बसावी किंवा त्याच्यावर हुकमत गाजवता यावी यासाठी हा प्रकार केला जातो.
संगणकाद्वारे केली जाणारी दादागिरी
जगाच्या कानाकोपऱ्यात इंटरनेटचा अतिशय वेगाने प्रसार झाला आहे आणि इंटरनेटशी जोडणे सहज शक्य झाले आहे. त्याच्या प्रभावीपणामुळे होणारे नुकसान आता आपल्याला दिसायला लागले आहे.
ऑनलाईन दादागिरी म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून केलेली दादागिरी- उदा. इंटरनेट किंवा मोबाईल फोनवरून एखाद्याला इजा पोचवणे,छळ करणे किंवा लाजिरवाणे वाटायला लावणे.
संगणकाद्वारे करण्यात येणार्या दादागिरीमध्ये संगणक, मोबाइल फोन किंवा टॅबलेटसच्या साहाय्याने दादागिरी करण्याचा समावेश होतो. संदेश पाठवून, अॅप्सवरून, समाज माध्यमांवरून इतर लोक वाचू व पाहू शकतील अशा अवमानकारक मजकुराची देवाणघेवाण करून ही दादागिरी केली जाते. यात एखाद्याबद्दल नकारात्मक, घातक किंवा चुकीची माहिती पाठवली (पोस्ट केली) जाते. यात आंतरराष्ट्रीय स्तरावर एखाद्याला शरमिंदे, लाजिरवाणे वाटायला लावणारी त्याच्याबद्दलची वैयक्तिक किंवा खासगी माहिती पसरवली जाते. याचे काही प्रकार हे बेकायदेशीर किंवा गुन्हेगारी या स्वरूपाचेही असतात आणि असे करताना जे सापडतात त्यांना अटक होते.
खालील ठिकाणी अशी दादागिरी होताना आढळली आहे:
- फेसबुक, इन्स्टाग्रॅम, स्नॅपचॅट आणि टिकटॉक यासारखी ठिकाणे
- मोबाईल किंवा टॅब्लेटवरून लिखित संदेश आणि मेसेजिंग अॅप्स वापरुन
- इंटरनेटवरून तत्काळ, थेट ऑनलाईन चॅटिंग करून
- रेडीटसारख्या ऑनलाईन फोरम्स, चॅटरूम्स आणि मेसेज बोर्ड्स वरून
- ईमेलद्वारा
- ऑन लाईन गेमिंग प्लॅटफॉर्मवरुन
सोशल मीडिया आणि डीजीटल फोरम्सच्या प्राबल्यामुळे कॉमेंट्स, फोटो, पोस्ट्स आणि इतर मजकूर ओळखीच्या लोकांबरोबरच कोणत्याही परक्या व्यक्तीला देखील पाहता येतात. ऑनलाईन उपलब्ध असलेली एखाद्याबद्दलची वैयक्तिक माहिती तसेच कोणतीही नकारात्मक, संकुचित किंवा नुकसानकारक माहिती याची सार्वजनिकरीत्या कायमची नोंद होते. ही माहिती ही त्या व्यक्तीची ओळख समजली जाते. शाळा, कॉलेजेस, त्या व्यक्तीला नोकरीवर ठेवू इच्छिणारा मालक असे कोणीही आत्ता किंवा भविष्यात त्याच्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी ही माहिती पाहू शकते. अशी दादागिरी ज्याच्यावर केली जाते ती व्यक्ती आणि जे ती करतात किंवा त्यात भाग घेतात त्या दोघांचेही नाव खराब होते. या दादागिरीचे विशिष्ट चिंताजनक परिणाम होतात त्यातील काही पुढीलप्रमाणे
सतत राहणारे परिणाम: ह्या डिजिटल उपकरणांच्या साहाय्याने दिवसाचे चोवीस तास कायम आणि ताबडतोब संपर्क साधता येतो त्यामुळे ज्या मुलांवर अशी दादागिरी केली जाते ती सतत दहशतीखाली राहतात.
कायमचे परिणाम: इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या साहाय्याने मिळणारी माहिती जर त्याबद्दल तक्रार केली नाही किंवा ती पुसून टाकली नाही तर ती सार्वजनिक आणि कायमची होते. असे करणाऱ्यांचेही नाव खराब होते आणि कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यावर, नोकरी मिळवण्यावर आणि आयुष्यात इतर ठिकाणीही त्याचा परिणाम होतो.
सहजपणे लक्षात न येणारा परिणाम: शिक्षक आणि पालक यांच्यासमोर ह्या गोष्टी घडत नाहीत त्यामुळे त्यांना ते समजणे कठीण असते.
दादागिरी ही प्रत्यक्ष समोर येऊन किंवा कॉम्प्युटरद्वारा केलेली असते. पण कॉम्प्यूटरद्वारा केलेल्या दादागिरीची डिजिटल खूण राहते- आणि असा छळ रोखण्यासाठी पुरावा म्हणून त्याचा उपयोग होतो.
सायबर धमकीचे काय परिणाम होतात?
ऑनलाईन दादागिरी केली जाते तेव्हा असे वाटते की कुठेही तुमच्यावर हल्ला होऊ शकतो, अगदी तुमच्या घरातसुद्धा. यातून सुटकाच नाही असे वाटते. याचे त्या व्यक्तीवर खूप वेगवेगळ्या तऱ्हेचे परिणाम होतात आणि ते दीर्घकाळ टिकून राहतात.
- मानसिक – अस्वस्थ वाटणे, लाजिरवाणे वाटणे, निर्बुद्ध आहोत असे वाटणे किंवा अगदी संताप येणे.
- भावनिकदृष्ट्या – शरमिंदेपणा वाटणे किंवा आपल्या आवडत्या गोष्टीतील रस कमी होणे.
- शारीरिकदृष्ट्या – थकवा (झोप न येणे), किंवा पोटदुखी आणि डोकेदुखीसारखी लक्षणे दिसणे.
आपली टर उडवली जात्येय ह्या जाणिवेने ह्या समस्येबद्दल बोलणं टाळणे किंवा त्याला सामोरे जाणे टाळणे .अगदी टोकाचा परिणाम म्हणजे दादागिरीला कंटाळून किंवा घाबरून आत्महत्येचा विचार करणे.
ह्या दादागिरीचा आपल्यावर अनेक प्रकारे परिणाम होतो. पण त्यातून बाहेर पडता येते आणि आपण आपला आत्मविश्वास आणि आरोग्य परत मिळवू शकतो.
माझी ऑनलाइन टर उडवली जात आहे का? विनोद / चेष्टा आणि टर यात काय फरक आहे?
मित्रांच्यात चेष्टामस्करी चालतेच, पण कधीकधी हे निव्वळ गंमत म्हणून केले जात आहे की तुम्हाला दुखावण्याचा हेतू आहे हे सांगणे कठीण असते. काहीवेळा ते हसण्यावारी नेतात किंवा ‘जाऊ दे रे, तू मनावर घेऊ नको.’ असे म्हणतात. पण तुम्ही दुखावले जात असाल आणि समोरचा निव्वळ गंमत म्हणून नाही तर मुद्दाम तुम्हाला दुखावण्यासाठीच असे करतोय असे तुम्हाला वाटत असेल तर तो विनोदाच्या मर्यादा ओलांडत आहे. तुम्ही हे थांबवण्याची विनंती करूनही थांबत नसेल आणि तुम्ही अस्वस्थ होत असाल तर ह्याला टर उडवणे म्हणता येईल.
हा प्रकार जर ऑनलाईन केला जात असेल तर त्यामुळे खूप मोठ्या संख्येने आणि अनोळखी लोकांचेही लक्ष वेधले जाते. हे कुठेही घडू दे, तुम्हाला जर आवडत नसेल तर सहन करत राहण्याचे कारण नाही. तुम्ही त्याला काहीही नाव द्या, पण तुम्हाला ते आवडत नाहीय आणि तरीही थांबत नसेल तर तुम्ही कोणाची तरी मदत घेतली पाहिजे. टर उडवणे थांबवणे याचा फक्त हे कृत्य करणाऱ्यांविरुद्ध मदत मिळवणे एवढाच उद्देश नाही तर ऑन लाईन असो की प्रत्यक्षात- व्यक्ती म्हणून प्रत्येकाचा आदर राखला गेला पाहिजे हे दाखवून देणे हा देखील या पाठचा उद्देश आहे.
ऑनलाइन / सायबर दादगिरी तक्रार नोंदवा
CyberB.A.A.P: तुम्हाला मदत व मार्गदर्शन करते. तुम्ही प्रथम www.cybercrime.gov.in इथे औपचारिकरीत्या ऑनलाईन तक्रार नोंदवा. जर शाळेत हा प्रकार घडत असेल तर तुम्ही शाळेतील समुपदेशकाला किंवा शिक्षकांना सांगा. तुम्ही तुमच्या पालकांनाही वेळोवेळी सांगितले पाहिजे. घटनेची तारीख आणि वेळ, कॉल्स, पोस्ट्स, ईमेल्स किंवा टेक्स्ट मॅसेजेस हे डिलीट न करता तसेच ठेवा.
संदर्भ: युनिसेफ | सायबर बुलिइंग कसे थांबवावे?
स्टॉप बुलिंग | सायबर बुलिइंग म्हणजे काय?
कामाच्या ठिकाणी होणारी दादागिरी
दादागिरी ही विशिष्ट जागी किंवा विशिष्ट वयापुरती मर्यादित नाही.एखादी व्यक्ती किंवा व्यक्तीसमूह कामाच्या ठिकाणी सातत्याने दादागिरी, मानसिक छळ करत असेल तर ते तुमच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरते
हे करणारी व्यक्ती किंवा समूह तुमची वरिष्ठ किंवा ज्याच्या हातात अधिकार आहेत अशीच असण्याची गरज नाही. हे कुठल्याही कामाच्या जागी घडू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांइतकाच सहकाऱ्यांकडूनही त्रास दिला जाऊ शकतो. कामाच्या ठिकाणी असा छळ आणि त्रास कधीच चालवून घेतला जाऊ नये.
कामाच्या ठिकाणी त्रास देण्याचे काही प्रकार:
- उपमर्द करणे, ओरडणे, अपमानकारक भाषा वापरणे.
- मनाला लागेल असे बोलणे, चारचौघात तुमचे हसे होईल असे बोलणे.
- अफवा पसरविणे, कुटाळक्या करणे किंवा छुपी टीका करणे.
- कामाच्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमातून तुम्हाला वगळणे किंवा तुमच्याशी न बोलणे.
- Playing mind games or ‘ganging up’
- Giving you pointless or demeaning tasks that don’t help you do your job
- Making impossible demands; setting you up to fail
- Using your roster to deliberately make things difficult for you
- Withholding important information
- Physical violence, from pushing and tripping to outright attacks
- Threatening phone calls or texts, including threatening you with workplace equipment like knives or drills
- Blackmailing you
- Where you have to do something unacceptable or humiliating or illegal
कामाच्या ठिकाणी होणार्या दादागिरीत समाविष्ट "नसलेल्या" गोष्टी
हे लक्षात घेतले पाहिजे की काही गोष्टी तुमच्या दृष्टीने अयोग्य वाटल्या तरी त्याला दादागिरी म्हणता येत नाही. एखाद्या योग्य कारणासाठी तुमचे वरिष्ठ तुम्हाला कामावरून काढून टाकू शकतात, पदावनती करू शकतात किंवा तुम्हाला शिस्त लावू शकतात. तुमच्या वरिष्ठांना तुमच्या कामगिरीचा फेरविचार करावासा वाटला, किंवा तुम्ही तुमचे काम नीट करत नाही असे त्यांना वाटत असेल तर त्याबद्दल तुमच्यावर टीका करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. तुमच्या कामाचा दर्जा योग्य त्या पातळीवर राखणे हे त्यांचे कामच आहे.
कामाच्या ठिकाणी होणारी दादागिरी थांबवण्याची जबाबदारी कोणाची आहे?
कामाच्या ठिकाणी तुम्हाला सुरक्षित वाटले पाहिजे, म्हणजेच तिथे दादागिरी होत नाही ना याची काळजी घेणे ही तुम्हाला कामावर ठेवणाऱ्यांची जबाबदारी आहे. याचा अर्थ असा की तुम्ही असे काही घडत असल्याची कायदेशीररीत्या तक्रार केलीत तर तुम्हाला कामावर ठेवणाऱ्यानी त्याच्यावर योग्य ती कारवाई करणे हे त्यांचे काम आहे.
कोणावर अशी दादागिरी होत असल्याचे तुम्ही पाहिले तर तुम्ही त्यांना मदत करू शकता. तुम्ही त्या व्यक्तीला आधार, पाठिंबा देऊ शकता आणि गरज असेल तर त्याबद्दल तक्रारही नोंदवू शकता.