Search

आमच्या विषयी

‘परिवर्तन’ विषयी

परिवर्तन ट्रस्टची स्थापना डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि डॉ. शैला दाभोळकर यांनी १९९१ मध्ये केली. महाराष्ट्रामधील, सातारा जिल्ह्यात व्यसनाधीन लोकांसाठी सुरू केलेल्या एका छोट्या समुपदेशन केंद्रापासून ह्या वाटचालीची सुरुवात झाली. गेल्या तीन दशकात, मानसिक आरोग्य आणि व्यसन समस्या असलेल्या लोकांची काळजी घेण्याच्या विविध मॉडेल्सच्या विकासातील आणि वैज्ञानिक चाचणी करण्यातील, ‘परिवर्तन’ ही एक अग्रेसर संस्था बनली आहे. मानसिक आरोग्याच्या समस्या असलेल्या लोकांसाठी जीवनावश्यक सेवा निर्माण करणे आणि त्यांचे विविध शास्त्रीय पद्धतींनी मूल्यमापन करुन उपयोजन संशोधनाचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य आम्ही स्वीकारले आहे. उपेक्षित समुदायांना उच्च दर्जाच्या सर्वसमावेशक मानसिक आरोग्य सेवा कमी किमतीत उपलब्ध करुन देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

आमच्या विषयी

‘इमोशनल फर्स्ट-एड’ हे तुमच्या मानसिक स्वास्थ्याच्या वाटचालीवर एक विश्वासु मार्गदर्शक बनण्याचे ध्येय ठेवते. जसे सक्षम होण्यासाठी ज्ञान तसेच वैयक्तिक विकास व सहनशीलता जोपासण्यासाठी मानसिक स्वास्थ्य हे आवश्यक आहे असे आम्ही मानतो. निवडक संसाधने, माहितीपूर्ण लेख आणि सामूहिक आधारामार्फत, तुम्हाला भावनिक आणि मानसिकरित्या सक्षम जगण्यासाठी पाठिंबा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आपण एकत्र येऊन मानसिक स्वास्थ्याविषयी असलेले पूर्वग्रह दूर करुन एक सज्ञान व संवेदनशील जग तयार करू शकतो!

मानसिक स्वास्थ्याची संसाधने सर्वांसाठी उपलब्ध करण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या आमच्या संस्थेच्या सदस्यांना भेटा.

डॉ. हमीद दाभोळकर

मानसोपचारतज्ज्ञ, वरिष्ठ सदस्य

डॉ. हमीद दाभोळकर हे एक प्रक्षित मानसोपचारतज्ज्ञ असून परिवर्तनमध्ये ते मेंटल हेल्थ कोचना प्रशिक्षण देतात. बिकट आर्थिक परिस्थिती असलेल्या लोकांसाठी किफायतशीर मानसिक आरोग्य सुविधा तसेच व्यसनमुक्तीसाठी उपचार उपलब्ध करुन देण्याकडे प्रामुख्याने त्यांचा कल आहे. ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’मध्ये ते क्रियाशील सभासद आहेत.

रुपाली भोसले

मास्टर्स इन सोशल वर्क, प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर, सातारा

परिवर्तमध्ये गेल्या १३ वर्षांपासून रुपाली भोसले ह्या विविध समाजातील मानसिक समस्या सोडवण्यास उत्सुक असणाऱ्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता वाढवणे, समुपदेशन करणे आणि सायको-सोशल सपोर्ट देणे ह्यात प्रविण आहेत. तसेच त्या समजात मानसिक स्वास्थ्याविषयी जागरूकता निर्माण करतात.

दिलीप गावकर

मास्टर्स इन सोशल वर्क, प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर, तेजपूर

टी आय एस एस मधून ग्रॅज्यूएट असलेले दिलीप गावकर हे इटानगर येथील परिवर्तनच्या व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचे नेतृत्व करतात. तंत्रज्ञानाने मानसिक आरोग्याची संसाधने मोबाईल द्वारे वापरता यावी ह्यासाठी सहाय्य करतात.

योगिनी मगार

वैद्यकीय मानसोपचारतज्ज्ञ, वरिष्ठ समुपदेशक, सातारा

योगिनी मगार ह्या गेली १५ वर्षे मानसिक स्वास्थ्य क्षेत्रात कार्यरत आहेत. मानसिक समस्या असलेल्या लोकांना व कुटुंबीयांना समुपदेशन देणे, स्वयंसेवकांना प्रशिक्षण देणे आणि विविध समुदायात भावनिक प्रथमोपचार कार्यशाळा घेण्याचे काम त्या करतात.

रेश्मा कचरे

क्लिनिकल साइकोलॉजिस्ट, प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर, पुणे

रेश्मा काचरे ह्या गेली १३ वर्ष परिवर्तन सोबत कार्यरत असून त्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देतात. पुण्याच्या झोपडपट्टीत सुद्धा त्या समुपदेशन आणि मानसिक आरोग्य सेवा पुरवतात. त्या किमया कॅफे सांभाळतात. हा कॅफे सामाजिक व मानसिक अक्षमता असणाऱ्या व्यक्ती चालवतात.

ब्रम्हनाथ निळकंठ

काउन्सेलर व एम्प्लॉयमेंट सपोर्ट ऑफिसर, पुणे

ग्रामीण व नागरी समाज कल्याण विषयात ब्रम्हानंद निळकंठ ह्यांचे विशेष कौशल्य आहे. परिवर्तनमध्ये ते समुपदेशक व नोकरी व्यवस्थापन अधिकारी म्हणून काम करतात. त्यांच्या शांत चित्तामुळे लोकांना त्यांच्याशी सहजेतेने संबंध प्रस्थापित करता येतात.

राणी बाबर

काउन्सेलर, सातारा

राणी बाबर गेल्या दशकाहून अधिक परिवर्तनच्या संस्थापक डॉ. शैला दाभोळकर ह्यांच्या बरोबर काम करत आहेत. त्या मानसिक समस्याग्रस्त लोक आणि त्यांच्या कुटुंबीयांना समुपदेशन तसेच सामाजिक व मानसिक आधार देतात.

डॉ. आरती अजयकुमार

मास्टर्स इन पब्लिक हेल्थ, रिसर्च को-ऑर्डिनेटर

डॉ. आरती ह्या दंतचिकित्सा पदव्युत्तर असून व्यावसायिक दृष्ट्या संशोधक आहेत. त्या संशोधन प्रकल्पांच्या संकल्पना तसेच निरीक्षण प्रणालींची निर्मिती करतात. मानसिक समस्याग्रस्त लोकांचे राहणीमान सुधारावे आणि समाजात असलेल्या गैरसमजुती दूर होण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात.

डॉ. नागेश राजोपाध्ये

पीएच.डी इन फिजिक्स, रिसर्चर, टेक्निकल अड्व्हायसर

मानस शास्त्रीय परीक्षणासाठी लागणारा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करून परिवर्तन च्या कार्यात योगदान. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे मानस शास्त्रीय स्क्रीनिंग सत्र आयोजित करतात. एक भौतिकशास्त्रज्ञ असूनही, मानसशास्त्रातील उत्कट संशोधक.

श्रीकांत जोशी

एम.टेक (आय आय टी बॉम्बे), टेक्निकल अड्व्हायसर

सॉफ्टवेअर क्षेत्रातील गूगल, फेसबुक आणि विविध सिलिकॉन व्हॅली स्टार्ट-अप्स मध्ये कार्य केले आहे. नाविन्यपूर्ण, वापरण्यास सोपे आणि सुरक्षित असे सॉफ्टवेअर निर्माण करुन डॉ. नरेंद्र दाभोळकरांचे स्वप्न पूर्ण करण्यात खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न आहे.
मराठी
Search