Search

कलंक- मानसिक आजारांशी संबंधित पूर्वाग्रह

मानसिक आजारांविषयी समाजात अनेक चुकीचे समज व पूर्वग्रह आहेत. मानसिक आजाराचे निदान करण्याच्या आणि मानसिक विकारग्रस्त लोक बरे होऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या प्रक्रियेत; असे चुकीचे समाज आणि पूर्वग्रह मोठा अडथळा ठरतात.

मानसिक आजाराबद्दलचे अज्ञान, आजाराची आणि मृत्यूची भीती, आपल्या आयुष्यात जे वाईट घडते त्याबद्दल कोणाला तरी दोषी ठरवण्याची गरज, गावगप्पा, मिथके आणि अफवा इत्यादींमुळे ह्या चुकीच्या समजाला खतपाणी मिळाले आहे. समाजामध्ये मानसिक आजारांविषयी चुकीचा समज असण्यामागे तीन संकल्पना आहेत. 

  • पुरेसे ज्ञान नसणे (अज्ञान)
  • नकारात्मक दृष्टीकोन असणे (पूर्वग्रह)
  • समस्याजन्य वर्तन (भेदभाव करणे)
  • समाजामध्ये असलेला मानसिक आजारांविषयीचा चुकीचा समज अशा आजाराशी संघर्ष करत असणाऱ्या व्यक्तीच्या क्षमता कमी करतो आणि कुटुंबातील सदस्यांवर देखील परिणाम करतो. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे असल्याने, तुमच्यात काही वेगळी वैशिष्ट्ये असल्याने जेव्हा लोक तुमच्याकडे नकारात्मक नजरेने बघतात (a negative stereotype) तेव्हा त्याला चुकीचा समज असे म्हणतात. दुर्दैवाने, मानसिक विकार असलेल्या लोकांकडे नकारात्मक भावनेने बघणे हे आपल्या समाजात सर्वसामान्य आहे!

    असा चुकीचा समाज, समाजात पसरला असेल तर माणसामाणसांमध्ये भेदभाव केला जाऊ शकतो. हा भेदभाव, लोकांनी एखाद्याच्या मानसिक आजाराबद्दल किंवा उपचाराबद्दल नकारात्मक टिप्पणी करण्या इतका सहेतुक, स्पष्ट आणि थेट असतो. तर कधीकधी हा भेदभाव अहेतुक असतो आणि चुकून घडतो. उदाहरणार्थ, मानसिक आजारामुळेएखादी व्यक्ती अस्थिर, हिंसक किंवा धोकादायक असू शकते असे गृहीत धरले जाणे व अशा व्यक्तींना टाळणे. अशाप्रकारे वागवले गेल्याने अनेकांच्या मनात स्वतःविषयी न्यूनगंड निर्माण होऊ शकतो.

    चुकीच्या समजामुळे होणारे हानिकारक परिणाम :

    • मदत किंवा उपचार घेण्यास अनिच्छा निर्माण होणे.
    • कुटुंब, मित्र, सहकारी किंवा इतर लोक समजून न घेणे.
    • काम, शाळा किंवा सामाजिक उपक्रम या ठिकाणी मिळणाऱ्या संधी कमी होणे.
    • गुंडगिरी, शारीरिक हिंसा किंवा छळ होणे.
    • आरोग्य विम्यामध्ये मानसिक आजाराच्या उपचारांना पुरेशा प्रमाणात समाविष्ट करून न घेणे.
    • आपण आपल्या समोरच्या आव्हानांमध्ये कधीही यशस्वी होणार नाही किंवा आयुष्यात काहीही करू शकत नाही असे वाटत राहाणे.

    चुकीच्या समजाचा सामना कसा करावा?

    चुकीच्या समज हाताळण्याचे काही मार्ग येथे आहेत:

    • उपचार घ्या. आपल्याला उपचाराची गरज आहे हे मान्य करा. ‘लोक काय म्हणतील?’, ‘आपण उपचार घेतले तर लोक आपल्याला मनोरुग्ण ठरवतील’ अशा विचाराने अनेक लोका मदत घेण्याचे टाळतात. ती चूक करू नका. उपचारांमुळे आपल्या दैनंदिन कामात आणि वैयक्तिक जीवनात व्यत्यय आणणाऱ्या समस्या ओळखता येतात. समस्यानिदान केल्यावर स्वतःवर काम करणे सोपे जाते.
    • समाजामध्ये असलेल्या मानसिक आजारांविषयीच्या चुकीच्या समजुतींमुळे स्वतःविषयी मनात शंका वा लाज निर्माण होऊ देऊ नका. अशा चुकीच्या समजुती केवळ इतरांकडून येत नाहीत. आपल्याला चुकून असे वाटू शकते की आपली सध्याची स्थिती हे वैयक्तिक कमकुवतपणाचे लक्षण आहे किंवा आपण कोणाच्याही मदतीशिवाय होणार्या त्रासावर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम असले पाहिज. समुपदेशन घेणे, स्वतःच्या स्थितीबद्दल जाणून घेणे करणे आणि मानसिक आजार असलेल्या इतरांशी संपर्क साधणे इत्यादी आपल्याला आत्मसन्मान प्राप्त करण्यास मदत करू शकतात.
    • स्वतःला वेगळे करू नका. जर तुम्हाला मानसिक आजार असेल तर तुम्ही त्याबद्दल कोणालाही सांगण्यास नाखूष असू शकता. तुमचे कुटुंब, मित्र, पालक किंवा तुमच्या समुदायाचे सदस्य इत्यादींना तुमच्या मानसिक आजाराबद्दल माहिती असल्यास ते तुम्हाला मदत देऊ शकतात. तुमचा ज्यांच्यावर विश्वास आहे, ज्यांच्यामुळे तुम्हाला आधार वाटतो अशा लोकांची मदत घ्या.
    • स्वतःला वेगळे करू नका. जर तुम्हाला मानसिक आजार असेल तर तुम्ही त्याबद्दल कोणालाही सांगण्यास नाखूष असू शकता. तुमचे कुटुंब, मित्र, पालक किंवा तुमच्या समुदायाचे सदस्य इत्यादींना तुमच्या मानसिक आजाराबद्दल माहिती असल्यास ते तुम्हाला मदत देऊ शकतात. तुमचा ज्यांच्यावर विश्वास आहे, ज्यांच्यामुळे तुम्हाला आधार वाटतो अशा लोकांची मदत घ्या.
    • आपल्या आजाराशी स्वतःची तुलना करू नका. आपण स्वतः काही एक आजार नाही आहोत. म्हणून "मी एक स्किझोफ्रेनिक आहे " असे म्हणण्या ऐवजी "मला स्किझोफ्रेनिया हा आजार आहे." असे म्हणा. आधार गटामध्ये सामील व्हा. काही स्थानिक आणि राष्ट्रीय गट उदाहरणार्थ, नॅशनल अलायन्स ऑन मेंटल इलनेस (NAMI), लोकांसाठी स्थानिक कार्यक्रम आणि इंटरनेट संसाधने उपलब्ध देतात. त्या मार्फत मानसिक आजार असलेल्या लोकांना, त्यांच्या कुटुंबियांना आणि सर्वसामान्य लोकांना सुशिक्षित करून, समाजामध्ये असलेल्या मानसिक आजारांविषयीच्या चुकीच्या समजुतीं कमी करण्यास मदत केली जाते. काही राज्य आणि केंद्र पातळीवरच्या यंत्रणासुद्धा, मानसिक आजार असलेल्या लोकांना आधार देण्याचे काम करतात आणि त्यांचे व्यावसायिक पुनर्वसन करतात.
    • शाळेकडून मदत मिळवा. जर तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला/मुलीला मानसिक आजार असेल आणि त्यामुळे तिच्या/त्याच्या शिक्षणावर परिणाम होत असेल, तर कोणत्या योजना आणि कार्यक्रम त्यांची मदत करू शकतात ते शोधा. विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आजारावर आधारित भेदभाव करणे कायद्याने गुन्हा आहे. प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावरील शिक्षकांनी मानसिक विकारग्रस्त विद्यार्थ्यांना वर्गात शक्य तितक्या चांगल्या प्रकारे सामावून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणती संसाधने वापरली पाहिजेत, काय दृष्टिकोन बाळगला पाहिजे याबाबत शिक्षक, प्राध्यापक किंवा प्रशासकांशी चर्चा करा. एखाद्या शिक्षकाला विद्यार्थ्याच्या मानसिक आरोग्याशी संबंधित स्थिती बद्दल माहिती नसेल तर त्यातून भेदभाव होऊ शकतो, विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ शकतात किंवा त्याला/तिला अतिशय कमी गुण दिले जाऊ शकतात.
    • समाजामध्ये असलेल्या मानसिक आजारांविषयीच्या चुकीच्या समजुतींविरुद्ध बोला. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, एखाद्या वृत्तपत्र वा मासिकाच्या संपादकाला पत्र लिहून किंवा इंटरनेटवर आपली मते व्यक्त करा. असे केल्याने, आजाराचा सामना करणाऱ्या रुग्ण मित्र-मैत्रिणीना आव्हानांना सामोरे जाण्याचे धैर्य मिळू शकते आणि मानसिक आजारांबद्दल लोक त्यांची चुकीची मते बदलायला लागू शकतात.

    अनेकदा लोक जे बोलतात ते अज्ञानावर आधारित असते. त्यांना त्यांच्या बोलण्यातील सत्यासत्यता माहिती नसते. आपण आपली स्थिती स्वीकारण्यास शिकणे, त्यावर उपचार करण्यासाठी आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे हे ओळखणे, आधार मिळवणे आणि इतरांना शिक्षित करणे या चार गोष्टी आपण स्वताहून केल्यास मोठा फरक पडू शकतो.

    https://www.mayoclinic.org/diseases-conditions/mental-illness/in-depth/mental-health/art-20046477

    मानसिक दृष्ट्या आजारी असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांनासुद्धा रुग्णांसारखाच, मानसिक आजारांविषयीच्या चुकीच्या समजुती आणि भेदभावाचा त्रास सहन करावा लागतो. विशेषत: स्किझोफ्रेनियासारख्या दीर्घकालीन विकारांच्या बाबतीत हे मोठ्या प्रमाणावर घडते. चुकीच्या समजुतींमुळे झालेला त्रास आणि भेदभावाच्या भावना रूग्णांच्या आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मनामध्ये खोलवर अडकलेल्या असतात ज्यामुळे त्यांच्या जीवनाच्या विवाह, व्यवसाय, शिक्षण, नातेसंबंध इ. अनेक अंगांवर वाईट परिणाम होऊ शकतो.समाजामध्ये असलेल्या मानसिक आजारांविषयीच्या चुकीच्या समजुतीं हा गंभीर प्रश्न आहे. विशेषतः आशियाई देशांमध्ये हा प्रश्न संपूर्ण कुटुंबाशी जोडला गेलेला असतो.

    समाजामध्ये असलेल्या मानसिक आजारांविषयीच्या चुकीच्या समजुतीं कमी करण्यासाठी खालील उपाय करता येऊ शकतात

    • स्पीकर ब्युरो. (speaker bureaus) 
    • संवाद आधारित शैक्षणिक कार्यक्रम. 
    • निषेध-आधारित कार्यक्रम, 
    • दूरदर्शन किंवा रेडिओ आणि कादंबरी द्वारे अनेक लोकांपर्यंत पोहोचण्याचा फोटो लिहून ठेवणे. नाटक आणि कला यांचा वापर करून जनजागृती करणे.

    जागरूकता वाढवण्यासाठी काही साधे उपक्रम करता येऊ शकतात ते पुढीलप्रमाणे-:

    • दुधाच्या पॅकेटवर संदेश छापणे,
    •  रुग्णालये, शॉपिंग मॉल इत्यादी ठिकाणी पत्रकांचे वितरण करणे. 
    • वृत्तपत्र, मासिके इ. वापर जनजागृती करण्यासाठी करणे. 
    • शाळांमध्ये मानसिक आजारांवर माहिती देणारे उपक्रम राबवणे. 
    • सरकारी अधिकारी, सामान्य प्रॅक्टिशनर्स आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी विशिष्ट कार्यक्रम विकसित करणे जेणेकरून ते सुद्धा मानसिक आजारांविषयीच्या चुकीच्या समजुतीं कमी करण्यासाठी मदत करू शकतात. 

    मानसिक आजारांविषयीच्या चुकीच्या समजुतीं कमी करण्यासाठी कोणताही सोपा उपाय नाही. ह्या चुकीच्या समजुती तयार होण्याची आणि चालू राहण्याची कारणे बरीच गुंतागुंतीची आहेत. ती कारणे समाजाच्या सामाजिक-सांस्कृतिक निकषांमध्ये अंतर्भूत आहेत. आरोग्यसेवेमध्ये काम करणाऱ्या लोकांशिवाय, असे चुकीचे समज दूर करण्यासाठी माध्यमे, सामाजिक सेवा, शिक्षण व्यवस्था, कायदेव्यवस्था इत्यादीसारख्या इतर सर्वच महत्त्वाच्या सामाज्घाताकानी पूल उचलणे गरजेचे आहे.

    कुष्ठरोगासारख्या शारीरिक आजारांच्या बाबतीत, प्रभावी उपचारांची उपलब्धता झाल्यामुळे त्याबाबत असणारे गैरसमज कमी करण्यास मदत झाली आहे. तसेच मानसिक विकारांवर असलेल्या उपचाराच्या उपलब्धतेमुळे अनेक सकारात्मक परिणाम झाले आहेत. विशेषत: रूग्णांना त्यांच्या घरापासून लांब संस्थांमध्ये ठेवण्यापेक्षा आपण सारे ‘समुदाय-आधारित काळजी’कडे वाटचाल करत आहोत. मात्र तरीही मानसिक आजारांवर संसर्गजन्य आजारांसारखे उपचार करून ते कायमसाठी पूर्ण बरे होतीलच असे नाही. बऱ्याच मानसिक विकारांवरच्या उपचारांमध्ये त्या विकाराची लक्षणे कमी करण्यावर भर दिला जातो आणि तरीही काही लक्षणांवर पूर्णपणे मात करता येईलच असे नाही. मानसिक विकारांवरच्या उपचारांमध्ये औषधे कधीकधी दीर्घकाळापर्यंत चालू राहण्याची शक्यता असते. उपचारांकडे मदत म्हणून पाहण्याऐवजी कलंक म्हणून पाहिले जाते. बहुतेक रुग्ण त्यांचे दैनंदिन औषध त्यांच्या मित्र, नातेवाईक किंवा सहकाऱ्यांपासून लपवतात.

    मानसिक आजारांविषयीच्या चुकीच्या समजुतींमुळे अनेक लोकांना भेदभावाला सामोरे जावे लागते. हा भेदभाव कोणत्याही स्वरूपाचा असू शकतो.

    • इतर लोकांनी टाळणे किंवा नाकारणे.
    • आरोग्यसेवा, शिक्षण, निवास, रोजगार इ. उपलब्ध होण्यास अडचणी येणे.
    • शाब्दिक गैरवर्तन किंवा
    • शारीरिक हिंसा.

    मानसिक आजारांविषयीच्या चुकीच्या समजुती, मानसिक दृष्ट्या आजारी व्यक्तीच्या भावनिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात. अशा त्रासातून जाणाऱ्या व्यक्ती अलगाव, नैराश्य, अती चिंता किंवा सर्वांसमोर पाणउतारा केला जाणे इ. ल सामोरे जायला लागू शकते. संपूर्ण समाज आणि समाजातील सदस्यांना सुरक्षित तसेच सुदृढ बनवण्यासाठी मानसिक आजारांविषयीच्या चुकीच्या समजुतींचा नायनाट करणे महत्वाचे आहे.

    संबंधित लेख

    मुले दिवसातील बराच वेळ शाळेत घालवतात. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. गैरवर्तन आणि...

    मराठी
    Search