दारू आणि मादक पदार्थांबद्दल बोलत असताना वापर, गैरवापर आणि अवलंबित्व (किंवा काहीवेळा व्यसन) या संज्ञा वारंवार वापरल्या जातात - आणि काहीवेळा आलटून पालटून वापरल्या जातात. पण त्यांचा नेमका अर्थ काय?
वापर: दारू किंवा मादक पदार्थांचे सेवन करणे म्हणजे वापर करणे. रात्रीच्या जेवणादरम्यान मित्रांसोबत बियर घेणे ही काही ठिकाणी सामान्य बाब समजली जाते. मादक पदार्थांचा वापर ही काही लोकांसाठी समस्या नसते, त्यामुळे ते गैरवर्तन करत नाहीत किंवा त्याचे त्यांना व्यसन लागत नाही.
गैरवापर: मादक पदार्थांच्या वापरामुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काम, कुटुंब किंवा आरोग्य यावर परिणाम होऊन काही समस्या निर्माण व्हायला सुरवात झाली तरी ती व्यक्ती जेव्हा अशा पदार्थांचा वापर चालूच ठेवते तेव्हा त्याला गैर वापर असे म्हणतात. तुम्हाला दारू पिऊन गाडी चालवू नये हे माहीत असूनसुद्धा दारू पिऊन गाडी चालवणे, हे देखील गैरवर्तनाचेच लक्षण आहे.
अवलंबित्व: कोणत्याही मादक पदार्थावर, दारूवर अवलंबून असणे म्हणजे व्यसन. तुम्ही दारू पिणे किंवा मादक पदार्थांचे सेवन करणे थांबवू शकत नाही आणि ते थांबवण्याचा प्रयत्न केल्यास शारीरिक वियोग लक्षणे ( withdrawls) दिसायला लागतात.
मादक पदार्थांच्या सेवनामुळे होणार्या आजाराची लक्षणे खालील प्रमाणे:
- जे ठरवलं आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणात जास्त काळ मादक पदार्थांचं सेवन करणे.
- थांबविण्याचा प्रयत्न करणे, परंतु तसे न करू शकणे.
- पदार्थ मिळवणे, घेणे आणि त्यातून बाहेर पडणे हे करण्यात जास्त वेळ घालवणे.
- मादक पदार्थ घेण्याची इच्छा आणि तल्लफ येणे.
- सामाजिक आणि नातेसंबंधामधील समस्या निर्माण व्हायला सुरवात झाली असली तरीही त्या पदार्थाचे सेवन सुरूच ठेवणे.
- या मादक पदार्थामुळे सामाजिक उपक्रम, काम आणि छंद याकडे दुर्लक्ष होणे.
- मादक पदार्थाशी निगडीत धोके पत्करणे.
- मानसिक किंवा शारीरिक समस्या निर्माण होत आहेत ह्याची जाणीव झाली तरी त्याचे सेवन चालू ठेवणे.
- पहिल्यांदा घेतल्यानंतर जाणवलेला प्रभाव अनुभविण्यासाठी अधिक प्रमाणात घेण्याची आवश्यकता असणे.
- मादक पदार्थाचे सेवन थांबविल्यानंतर शारीरिक वियोग लक्षणे जाणवणे.
ही चिन्हे किंवा लक्षणे जितकी अधिक तितकी त्या व्यक्तीचे मादक पदार्थाचे सेवन ही गंभीर बाब असू शकते. एखाद्या व्यक्तीला यापैकी जर कोणताही निकष लागू पडत नसेल तर त्या व्यक्तीला मादक पदार्थ किंवा दारू याची समस्या असू शकत नाही, तसेच एखाद्या व्यक्तीला यातील सहा किंवा त्यापेक्षा जास्त निकष लागू पडत असतील तर त्या व्यक्तीला व्यसनाचा आजार झाला आहे.
केवळ मानसिक आरोग्य व्यावसायिक किंवा व्यसनमुक्ती कामातील तज्ञ व्यक्तीच व्यसनाच्या आजारचे निदान करू शकते. तुम्हाला दारू किंवा मादक पदार्थ सेवनाची समस्या आहे असे जर तुम्हाला वाटत असेल, तर मदत मिळवण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी बोलणे महत्वाचे आहे.
मादक पदार्थांचा वापर युवकांमध्ये नुसतं ' एकदा करून बघूया ' पासून ते गंभीर वापराच्या आजारपर्यंत नेणारा आहे. घेऊन बघूया असं म्हणून जरी कोणत्याही मादक पदार्थांचा वापर, केला असला तरी त्यामुळे किशोरवयीन मुलांमध्ये अपघात, मारामारी, अवांछित लैंगिक संबंध, अतिसेवन यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. मादक पदार्थाच्या वापरामुळे पौगंडावस्थेतील मुलांच्या मेंदूच्या विकासात अडथळा निर्माण होऊ शकतो. पौगंडावस्थेतील मुलांवर मादक पदार्थांचा सहज परिणाम होऊ शकतो आणि त्यांच्यामध्ये दीर्घकालीन परिणाम जसे की मानसिक आजार, शाळेतील प्रगती कमी होणे, मादक पदार्थांचे व्यसन लागणे हा धोका वाढतो. nicotine, or other drugs during adolescence.
थोडक्यात, मादक पदार्थ आणि दारू यामुळे तुमच्या मेंदूचे आणि शरीराचे कार्य यामध्ये बदल होतात. मेंदुमधील ज्या रसायनांमुळे विचार करणे, जाणीव होणे, मत तयार करणे किंवा निर्णय घेणे ह्या क्रिया होतात त्या रसायनांचे संतुलन बिघडते.
जर तुम्ही कठीण काळातून जात असाल, तर समस्या सोडविण्यासाठीचा मार्ग म्हणून मादक पदार्थ आणि दारू याचे सेवन केले जाऊ शकते. तथापि, हे व्यसन लागणारे जे पदार्थ आहेत जे उदासीनता किंवा चिंतेची लक्षणे निर्माण करू शकतात किंवा असलेली समस्या अधिक गंभीर बनवू शकतात आणि त्यातून बाहेर पडणे अधिक कठीण होऊ शकते. उदासीनता आणि/किंवा चिंता असलेल्या लोकांमध्ये व्यसनाची समस्या निर्माण होऊ शकते आणि त्यासाठी देखील उपचारांची आवश्यकता असू शकते.
मादक पदार्थ आणि दारूची सवय बदलण्यास वेळ लागू शकतो, परंतु योग्य आधार घेतल्यास आणि चिकाटीने प्रयत्न केल्यास तुम्हाला तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यामध्ये सकारात्मक बदल दिसतील.
दारू किंवा मादक पदार्थाच्या वापराचा मेंदूतील रासायनिक संदेश प्रक्रियेवर परिणाम होतो, त्यामुळे त्याला आपण कसा प्रतिसाद देऊ हे सांगणे कठीण असते. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. प्रत्येक मादक पदार्थ वेगळा असतो. बेकायदेशीर मादक पदार्थामध्ये काय आहे हे तुम्हाला कधीच ठाऊक नसते.
काही लोक मादक पदार्थ किंवा दारू घेतात कारण त्यांना असे वाटते की त्यामुळे त्यांना बरे वाटते, परंतु त्यामुळे तुम्ही अधिक आजारी - चिंताग्रस्त, चिडलेले किंवा अस्वस्थ आणि मूडी बनवता. तुमच्या वास्तवाच्या जाणीवेवर देखील त्याचा प्रभाव पडतो.
These reactions may be short term but they can still affect the way you think, make decisions and behave. There is a risk that while intoxicated you might या प्रतिक्रिया थोड्या काळासाठी असू शकतात परंतु तरीही त्यांचा तुमच्या विचार करण्यावर, निर्णय घेण्याच्या क्षमतेवर आणि वागण्यावर परिणाम होऊ शकतो. नशा केल्यानंतर तुम्ही गैरमार्ग वापरण्याचा धोका असतो, नंतर त्याचा तुम्हाला खेद वाटू शकतो. तुम्ही आक्रमकपणे वागू शकता, अनावश्यक धोका घेऊ शकता किंवा स्वत: ला इजा करण्याचा प्रयत्न करू शकता. मादक पदार्थाच्या नियमित सेवनाने आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्याचा तुमच्या मित्र आणि कुटुंबासोबतच्या नात्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच घरी आणि कामाच्या ठिकाणीही मोठा परिणाम होऊ शकतो.
जर तुम्ही चिंता किंवा नैराश्यासाठी दिली जाणारी औषधे घेत असाल, तर दारू आणि बहुतेक बेकायदेशीर मादक पदार्थ तुमच्या औषधांचा प्रभाव कमी करू शकतात किंवा दुष्परिणामांची शक्यता वाढवू शकतात हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्ही मोठ्या प्रमाणात दारू पीत असाल किंवा इतर मादक पदार्थ घेत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा जेणेकरून ते तुम्हाला योग्य उपचार मिळवण्यासाठी मदत करतील.
मादक पदार्थांचे तीन मुख्य प्रकार आहेत - उदासीकारक पदार्थ, उत्तेजक पदार्थ आणि भ्रमकारक पदार्थ. ह्या प्रत्येकाला तुमचे मन आणि शरीर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतात.
१) उदासीनता आणणारे पदार्थ (डिप्रेसंटस्) तुमचे शरीर मंद करतात. तुमचा श्वास आणि हृदयाचे ठोके मंदावू शकतात, तुम्हाला मळमळ आणि उलट्यांचा अनुभव येऊ शकतो आणि तुमच्या आजूबाजूला जे घडत आहे त्यावर विचार करण्याच्या आणि त्याला प्रतिसाद देण्याच्या तुमच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. दारू, हेरोइन, गांजा, सिडेटिव्ह आणि इनहेलेंट्स हे सर्व उदासीनता आणणारे पदार्थ आहेत. यामुळे तुम्हाला थोड्या काळासाठी आनंद अनुभवता येऊ शकतो आणि तुम्हाला ठराविक काळासाठी चांगले वाटू शकते, परंतु बरेच लोक उदासीनता आणणारे पदार्थ घेतल्यानंतर नैराश्याची भावना अनुभवतात. त्यामुळे तुमचा स्वतःवरील ताबा सुटून तुम्ही धोके पत्करण्याची शक्यता वाढते. उदासीनता आणणाऱ्या पदार्थाचा दीर्घकाळासाठी केलेला वापर तुमच्या मनःस्थितीवर परिणाम करू शकतो, ज्यामुळे त्या पदार्थावरील अवलंबित्वाचा सामना करणे आणखी कठीण होते आणि उदासीनता आलेल्या व्यक्तीमध्ये आत्महत्त्येचा धोका वाढू शकतो.
२) गांजा मुळे उदासीनता, भीतीचे तीव्र झटके किंवा सतत चिंता आणि संशय निर्माण होऊ शकतो. पूर्वी कधीही मानसिक आजाराची लक्षणे न आढळलेल्या व्यक्तींमध्ये देखील गांजा सेवनामुळे वरील आजारांची लक्षणे दिसून येतात. गांजाच्या वापराची कोणतीही 'सुरक्षित' पातळी नाही.
३) उत्तेजक पदार्थ (स्टिमुलंट्स) आपल्या शरीराची गती वाढवतात. ते तुमच्या हृदयाचे ठोके, शरीराचे तापमान आणि रक्तदाब वाढवतात. उत्तेजक पदार्थ वापरणाऱ्या लोकांना आत्मविश्वास, प्रेरणा आणि उर्जा वाढलेली जाणवू शकते, आणि झोपेची गरज कमी झाल्यासारखे वाटू शकते. काही जण असे म्हणू शकतात की त्यांना ही झिंग आवडते. उत्तेजक पदार्थमुळे आपण उत्तेजित, चिंताग्रस्त, विचलित, आक्रमक आणि हिंसक होऊ शकतो. तीव्र पोटदुखी, डोकेदुखी, चक्कर येणे अशा शारीरिक दुष्परिणामांचाही सामना करायला लागू शकतो. मेथाम्फेटामाईन्स - जसे की स्पीड आणि आइस -कोकेन आणि एक्स्टसी हे काही सामान्यतः वापरले जाणारे उत्तेजक पदार्थ आहेत.
४) भ्रमकारके (हेलुसिनोजेन्स) तुमच्या वेळेच्या जाणिवेवर आणि तुमच्या भावनिक स्थितीवर परिणाम करतात आणि त्यामुळे तुम्हाला श्रवण किंवा दृश्य विभ्रम जाणवू शकतात (ज्या गोष्टी नसतात त्या ऐकणे किंवा पाहणे). हॅल्युसिनोजेन्स वापरल्यामुळे अनेक लोकांना त्यांच्या वास्तवात अप्रिय किंवा भीतीदायक बदल जाणवतात. मागील चित्रे डोळ्यासमोर तरळू लागली तर हे नकारात्मक परिणाम पुन्हा अनुभवास येतात. हॅल्युसीनोजेन्समध्ये एलएसडी, केटामाइन आणि मॅजिक मशरूम समाविष्ट आहेत. गांजा मध्ये हॅल्युसीनोजेनिक प्रभाव देखील असू शकतो.
लोक मादक पदार्थ आणि दारूला कसा प्रतिसाद देतात हे त्या व्यक्तीचा आकार, मादक पदार्थाचा किंवा दारूचा प्रकार आणि प्रमाण तसेच सेवनाची वारंवारिता यावर अवलंबून असते.
तुम्ही कोणता मादक पदार्थ घेत आहात आणि तुम्ही किती दारू पीत आहात याची तुम्हाला जाणीव असणे आवश्यक आहे. नोंद ठेवण्यासाठी एक आठवडा डायरी ठेवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला मादक पदार्थाचे सेवन करावे वाटेल अशी कोणतीही विशिष्ट कारणे किंवा ट्रिगर लिहा. तुम्ही स्वतःला खालील प्रश्न देखील विचारू शकता:
- तुम्ही मादक पदार्थ आणि दारू का घेता?
- तुम्ही तुमच्या आयुष्यात कशातून तरी पळवाट काढण्याचा प्रयत्न करीत आहात का?
- तुम्ही किती वेळा मादक पदार्थ किंवा दारू घेता?
- मादक पदार्थ किंवा दारू तुम्ही नियमितपणे घेत आहात का? तुम्ही किती घेता यावर नियंत्रण ठेवणे तुम्हाला कठीण वाटत आहे का?
- तुम्हाला विसरळूपणा, काम अर्धवट राहणे किंवा न करणे यासारख्या समस्या येऊ लागल्या आहेत का?
- तुम्हाला झोपण्यात, खाण्यात किंवा साधी साधी कामे करण्यात अडचण येत आहे का?
- तुमच्या ऊर्जेच्या पातळीतील बदल तुमच्या लक्षात आला आहे का? अधिक थकल्यासारखे वाटते का ?
- तुम्ही नियमितपणे ब्लॅकआउट अनुभवत आहात का?
- तुम्ही आपल्या मूडमध्ये बदल अनुभवत आहात का? नेहमीपेक्षा अधिक चिंताग्रस्त किंवा नाखूष वाटत आहे का?
- तुम्हाला एकाग्रता साधण्यात किंवा निर्णय घेण्यात अडचण येत आहे का?
- तुमचे मित्र किंवा कुटुंबिय तुम्हाला ते धीराने घ्यायला सांगत आहेत का?
यापैकी अनेक प्रश्नांची होय उत्तरे होय असतील तर त्याचा अर्थ असा होऊ शकतो की तुम्हाला मादक पदार्थ किंवा दारू याचे व्यसन लागायला सुरुवात झाली आहे.
मादक पदार्थ आणि दारूच्या वापराबद्दल एक गोष्ट निश्चितपणे माहित आहे की ते मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. जर तुम्हाला तुमची चिंता किंवा नैराश्यामुळे मादक पदार्थ किंवा दारू पिण्याची समस्या निर्माण झाली असेल तर तुम्हाला पूर्ण बरे होण्यासाठी दोन्ही समस्या सोडवाव्या लागतील. मादक पदार्थ आणि दारूचा वापर बंद किंवा कमी केल्याने आरोग्य सुधारते. चिंता किंवा नैराश्याचा अनुभव येणार्या व्यक्तींच्या बरे होण्याच्या प्रक्रीयेत त्यामुळे मोठा फरक पडू शकतो. व्यसन सोडणे नेहमीच सोपे नसते आणि बर्याच लोकांना व्यसन सोडताना त्रास होतो. परंतु तो त्रास सोसणे देखील अंतिमतः फायद्याचे असते.
जर तुम्हाला वाटत असेल की मादक पदार्थ किंवा दारू तुमच्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्यावर परिणाम करत आहेत, तर तुमच्या वापराचे/ सेवनाचे प्रमाण कमी करणे ही खरोखर चांगली सुरुवात आहे.
मादक पदार्थ किंवा दारूची सवय सोडण्यास वेळ लागू शकतो. त्यापासून दूर राहण्यासाठी आपण खालील धोरणे अंगिकारु शकतो.
- जेव्हा तुम्ही निराश किंवा चिंताग्रस्त असाल तेव्हा मादक पदार्थ किंवा दारू न घेण्याचा प्रयत्न करा.
- घरात मादक पदार्थ किंवा दारू ठेवणे टाळा.
- मादक पदार्थ किंवा दारू न घेणार्या मित्र आणि कुटुंबियांबरोबर वेळ घालवा.
- जेथे तुम्ही मादक पदार्थ किंवा दारूचे सेवन कराल हे तुम्हाला माहीत आहे अशा ठिकाणी जाऊ नका.
- एकट्याने मद्यपान करू नका.
- अल्कोहोल कमी असलेले किंवा नॉन-अल्कोहोलिक पेय निवडा.
- हळूहळू प्या - स्वत: ला एका तासाला एका ड्रिंकपर्यंत मर्यादित करा.
- तुम्ही दारू कमी करण्याचा प्रयत्न करत आहात हे तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला कळू द्या. त्यांचा आधार मागा.
- तणाव हाताळण्यासाठी दारूचा वापर करण्यापेक्षा व्यायाम, ध्यान किंवा तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा.
- चांगले खाणे, आवश्यक तेवढे पाणी पिणे आणि नियमित व्यायाम करून आपल्या शारीरिक आरोग्याची काळजी घ्या.
स्वतःवर विश्वास ठेवा. सवयी बदलण्यास वेळ लागतो आणि वाटेत अडखळणे ही अतिशय सामान्य बाब आहे याची स्वतःला आठवण करून द्या.
सेवन कमी करण्याची योजना आखा. त्यामुळे तुम्हाला एक निश्चित ध्येय मिळेल. उदाहरणार्थ:
- तुमच्यासाठी प्रत्येक आठवड्यात किती मादक पदार्थ किंवा दारू मुक्त दिवस असतील हे ठरवा. (प्रत्येक आठवड्यात किमान दोन दारूमुक्त दिवस आणि शक्य तितके मादक पदार्थ मुक्त दिवस निश्चित करा.)
- पिण्याच्या दिवशी तुम्ही किती ड्रिंक्सच्या पुढे जाणार नाही? स्वतःवर कोणती मर्यादा घालाल?
- दर आठवड्याला तुम्ही किती पेग घ्याल ते ठरवा.
तुम्हाला मदतीची आवश्यकता असल्यास, तुमचे डॉक्टर तुमच्या सवयी कशा बदलायच्या याबद्दल अधिक चांगला सल्ला देऊ शकतात किंवा मदतीसाठी तुम्हाला मानसशास्त्रज्ञ किंवा इतर सल्लागारांकडे पाठवू शकतात. आवश्यक असल्यास, दारू पिणे थांबवण्यासाठी ते तुम्हाला औषधे लिहून देऊ शकतात.
मादक पदार्थ घेणे किंवा मद्यपान पूर्णपणे थांबवणे कठीण असू शकते. तथापि, फक्त कमी करण्याऐवजी पूर्णपणे थांबणे चांगले आहे जेव्हा:
- तुम्ही मादक पदार्थ किंवा दारूवर अवलंबून आहात.
- तुमची चिंता किंवा नैराश्य गंभीर आहे
- तुमच्या मनात आत्महत्त्येचे विचार येत आहेत.
- तुम्हाला आरोग्य विषयक, वैयक्तिक, आर्थिक किंवा कायदेशीर अडचणी येत आहेत.
जर तुम्ही नैराश्य विरोधी औषधे (एंटिडिप्रेसंट) घेत असाल तर तुम्ही घेत असलेले मादक पदार्थ किंवा दारू यांचा काय परिणाम होऊ शकतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. मादक पदार्थ किंवा दारू कमी केल्यामुळे किंवा बंद केल्यामुळे तुम्हाला बरे होण्यास मदत होईल आणि संभाव्य दुष्परिणाम कमी होतील. तुमच्या औषधोपचार व्यवस्थापनाबद्दल बोलण्यासाठी तुमचे डॉक्टर ही एक योग्य व्यक्ती आहे.
आधार मिळवण्यासाठीचे नेटवर्क::
जर तुम्ही तुमच्या मादक पदार्थ आणि दारूच्या सवयी बदलण्यासाठी काही कृती करण्याचा निर्णय घेतला असेल तर तुमच्या सभोवताली एक मजबूत आधार देणारे नेटवर्क असणे खरोखर महत्वाचे आहे. मित्र आणि कुटुंबाचा आधार आवश्यक आहे; तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा ते आश्वासन आणि प्रोत्साहन देतील.
तुमचा मादक पदार्थ किंवा दारूचा वापर कमी करण्यासाठी तुम्हाला व्यावसायिक मदतीची आवश्यकता असू शकते. डॉक्टर तुम्हाला माहिती देऊ शकतात आणि उपचारासाठी इतर सेवांकडे देखील पाठवू शकतात. समुपदेशन किंवा व्यसनमुक्ती सारख्या सेवा उपलब्ध आहेत. तुम्ही स्वतःसुद्धा या सेवा घेऊ शकता.
मादक पदार्थ आणि दारू सोडण्यासाठी मदत करणार्या सेवा ऑनलाईन, फोनवर किंवा वैयक्तिकरित्या उपलब्ध आहेत. तुम्हाला सोयीस्कर वाटेल अशा प्रकारे तुम्ही त्यांचा आधार घेऊ शकता. बर्याच लोकांना त्यांचे अनुभव इतरांबरोबर शेअर करणे उपयुक्त वाटते, म्हणून आपण आपल्या स्थानिक क्षेत्रातील स्वमदत गटात सामील होण्याचा विचार करू शकता.
मादक पदार्थ आणि दारू घेत असलेल्या एखाद्यास आधार देणे खरोखर कठीण असू शकते. बऱ्याचदा व्यसन करणार्या व्यक्तीच्या लक्षात न येणार्या अनेक गोष्टी त्यांच्या कुटुंबियांच्या किंवा मित्रांच्या लक्षात येतात. उदा. त्यांच्या विचारात झालेले बदल, त्यांचा मूड आणि ते तुमच्यासोबत आणि इतर मित्रांसोबत किंवा सहकाऱ्यांशी कसे वागतात हे तुम्हाला दिसू शकते. तुम्ही कदाचित त्यांना व्यसन थांबवा असे सांगू शकता. तुम्ही कदाचित हा प्रयत्न केला असेल, परंतु तुम्ही त्यांना बदलण्यास भाग पाडू शकला नाही. त्यांनी स्वतः हा निर्णय घेणे आवश्यक आहे.
- आधार द्या आणि आदर दाखवा: मादक पदार्थ किंवा दारूचे सेवन करण्यासाठी त्यांना समर्थन द्यावे असा याचा अर्थ नाही. तुम्ही त्यांना भावनिक आधार द्या. त्यांचे ऐकून घ्या, त्यांचे कसे चालले आहे याबद्दल बोला आणि ते एकटे नाहीयेत हे त्यांच्यापर्यंत पोचवा.
- मित्रांशी जोडलेले राहण्यासाठी त्यांना मदत करा.
- सुधारण्यासाठी उपयोगी पडणार्या गोष्टी करत राहण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा. खेळ, संगीत, नवीन कौशल्य शिकणे, स्वयंसेवक म्हणून काम करणे किंवा बाहेर जाणे या गोष्टींचा व्यसनमुक्त होण्यासाठी उपयोग होऊ शकतो.
- तुम्ही त्यांना कशाप्रकारे मदत करू शकता ते त्यांना विचारा. बर्याचदा त्यांच्या दैनंदिन कामात मदत करून तुम्ही त्यांचा ताण हलका करू शकता.
- तुमच्याशी किंवा इतर विश्वासू व्यक्तीशी त्यांच्या चिंतेविषयी बोलण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. त्या चिंताच खरंतर त्यांच्या मादक पदार्थ वापराचे ट्रिगर पॉईंट असू शकतात.
- मादक पदार्थ आणि दारूच्या वापराविषयी माहिती आणि सल्ला देणार्या ऑनलाईन, फोनवरील किंवा प्रत्यक्ष भेटून घेण्याच्या सेवा शोधण्यासाठी त्यांना मदत करा. त्यांना स्वारस्य नसेल तर एखाद्यावेळेस पुन्हा सुचवा, परंतु त्यांना त्रास होईल इतके सल्ले देऊ नका. आपण त्यांना आधारासाठी बियॉन्ड ब्लू सपोर्ट सर्व्हिसशी संपर्क साधण्यास प्रोत्साहित करू शकता.
- स्वतःला दुखापत न होण्याची खबरदारी घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. त्यांनी कोणती खबरदारी घ्यावी याची तुम्हाला खात्री नसल्यास तुम्ही एकत्र ऑनलाइन माहिती मिळवू शकता.
- लक्षात ठेवा की बदलासाठी वेळ लागतो. धीर धरा आणि त्यांच्या छोट्या छोट्या चांगल्या सवयीचे कौतुक करा.
मादक पदार्थ आणि दारू घेत असलेल्या एखाद्यास आधार देणे थकवणारे असू शकते. या काळात आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. तुमच्या शारीरिक आरोग्याची काळजी घ्या, तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी वेळ काढा आणि तुम्हाला आधार देतील असे मित्र जवळपास असू द्या. तुम्हालाही कधीकधी सुट्टी घ्यावीशी वाटेल आणि ते स्वीकारार्ह आहे. फक्त तुम्ही मदत करत असणाऱ्या व्यक्तीला ते सांगा म्हणजे त्याला एकटे सोडल्यासारखे वाटणार नाही.
तंबाखू, सिगारेट, गुटका यांचे व्यसन सोडणे.
तुमचे आरोग्य नीट राहण्यासाठी हे अतिशय महत्वाचे आहे. या पदार्थांचे सेवन सोडल्याने नक्कीच तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य ठणठणीत राहील.
तंबाखू चे व्यसन सोडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
नवज्योति व्यसनमुक्ती हेल्पलाईन | |
शरण ड्रग ड्रॉप हेल्पलाईन सेंटर |